Ban on Hijab Burqa : ‘या’ मुस्लिम देशानेच महिलांच्या बुर्खा-हिजाब घालण्यावर घातली बंदी
Ban on Hijab Burqa : एका मुस्लिम बहुल देशानेच महिलांच्या बुर्खा-हिजाब घालण्यावर बंदी घातली आहे. महिलांच्या बुर्खा-हिजाबसाठी कट्टरपंथीयांकडून अनेकदा धर्माचा दाखला दिला जातो. या मुस्लिम देशाने बुर्खा-हिजाब बंदी करताना शरिया कायद्यात काय म्हटलय ते सुद्धा सांगितलं आहे.

एका मुस्लिम देशानेच महिला, मुलींच्या बुर्खा घालण्यावर बंदी घातली आहे. किर्गिस्तान हे मुस्लिम बहुल राष्ट्र आहे. किर्गिस्तानमध्ये महिलांच्या बुर्खा, हिजाब परिधान करण्यावर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलाय. बुर्खा-हिजाबच्या आड दहशतवादी लपलेले असू शकतात, असा किर्गिस्तान सरकारचा दावा आहे. म्हणून महिलांनी हिजाब घालून रस्त्यावर चालू नये असं किर्गिस्तान सरकारने निर्णय घेतला आहे. नियमांच उल्लंघन केल्यास दंडाची तरतूद केली आहे. हिजाबमध्ये संपूर्ण शरीर झाकलं जातं.
किर्गिस्तानमधील मुस्लिमांच्या अध्यात्मिक प्रशासनाने (मुफ्तयात) सरकारच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. स्थानिक मीडिया AKI प्रेसने हे वृत्त दिलय. महिला संपूर्ण शरीर झाकाणारा नकाब किंवा बुर्खा घालू शकत नाही, असं आदेशात म्हटलं आहे. ज्या महिला संपूर्ण शरीर झाकून चालतात, त्या एलियन वाटतात असं मुफ्तीयातने म्हटलं आहे. म्हणून महिलांनी फक्त चेहरा झाकून चालावं असं आम्हाला वाटतं.
शरिया कायद्याबद्दल काय म्हटलय?
शरिया कायद्याचा हवाला देत मुफ्तीयतने म्हटलय की, शरिया कायद्यात डोक्यापासून पायापर्यंत शरीर झाकणं अनिवार्य केलं नसल्याच म्हटलं आहे. त्यामुळे अशा निर्णयाविरोधात फतवा जारी होऊ शकत नाही. सर्व लोकांनी सरकाराचा आदेश तात्काळ मान्य करावा. सरकारने सुरक्षा कारणांमुळे असा निर्णय घेतला आहे. सरकारचं म्हणणं सुद्धा ऐकलं पाहिजे. कारण नकाब आणि बुर्खा बंदी केली नाही, तर गुन्हेगारी वाढू शकते असं मुफ्तीयतने म्हटलं आहे.
नियम मोडणाऱ्यांना काय शिक्षा?
गुन्हेगार याचा दुरुपयोग करत आहेत. आम्ही याची उदहारण पाहिली आहेत. त्यानंतर बॅन लावण्याचा निर्णय घेतल्याच सरकारच म्हणणं आहे. बुर्खा, हिजाब बंदीच उल्लंघन करणाऱ्यांना तुरुंगवासाची शिक्षा तसेच 20 हजार सोम (स्थानिक मुद्रा) दंड ठोठावण्याची तरतूद आहे. जानेवारी 2025 मध्ये सरकारने हा कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला होता. देशाच्या राष्ट्रपतींनी नकाब घालणाऱ्यांविरोधात विशेष अभियान चालवण्याच सूतोवाच केलं आहे. किर्गिस्तानात 90 टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे. इथे सुन्नी मुस्लिमांची संख्या जास्त आहे. मुस्लिमानंतर इथे ख्रिश्नच धर्मीयांची संख्या जास्त आहे.