Myanmar : आधी 19 वर्षांच्या मुलीची डोक्यात गोळी झाडून हत्या, नंतर रात्री अंधारात मृतदेह उकरुन सिमेंट भरलं

म्यानमार सैन्याने (Myanmar Army) लोकशाहीच्या आग्रहासाठी सुरु असलेलं आंदोलन दडपण्यासाठी टोकाचा मार्ग निवडण्यास सुरुवात केलीय.

Myanmar : आधी 19 वर्षांच्या मुलीची डोक्यात गोळी झाडून हत्या, नंतर रात्री अंधारात मृतदेह उकरुन सिमेंट भरलं
Follow us
| Updated on: Mar 14, 2021 | 5:16 PM

Myanmar Army Dug Up Angel’s Grave नेप्यिडॉ : म्यानमार सैन्याने (Myanmar Army) लोकशाहीच्या आग्रहासाठी सुरु असलेलं आंदोलन दडपण्यासाठी टोकाचा मार्ग निवडण्यास सुरुवात केलीय. विरोधी आवाज बंद करण्यासाठी क्रुरपणे आंदोलकांवर हल्ले होत आहेत. सैन्याकडून आंदोलन करणाऱ्यांपैकी काहींच्या डोक्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीय. इतकंच नाही तर सैन्याने आता या मृतदेहांची विटंबना करण्याचाही प्रकार सुरु केलाय. आंदोलना दरम्यान डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आलेल्या 19 वर्षीय तरुणीचा मृतदेह रात्रीच्या अंधारात उकरुन सिमेंट भरण्यात आलं. विशेष म्हणजे पीडित मुलगी एंजेलच्या कुटुंबाने तिचा मृतदेह पुरल्यानंतर काही काळातच सैन्याने हे अमानुष कृत्य केल्याचा आरोप होतोय (Myanmar army dug up dead body of girl who shot dead during protest).

म्यानमार सैन्याने कबरीवरील फुलांचे गुच्छ आणि हार फेकून देण्यात आले. तसेच मृतदेह खोदण्यात आला. सीएनएन वृत्तवाहिनीने याबाबतचं एक फुटेज शेअर केलंय. या घटनेच्या प्रत्यक्ष साक्षीदारांनी दिलेल्या माहितीनुसार, एंजेलच्या कबरीपाशी रबराचे बूट, रेझर ब्लेड, सर्जिकल मास्क, फावडे (खोरं) आणि रक्त लागलेले प्लास्टिकचे मोजे (ग्लोज) सापडले.

एंजलच्या कबरीवर लोकांनी फुलं वाहून आदरांजली वाहिली होती. त्यावरच सैन्याने सिमेंट ओतून जाड स्लॅब टाकला. यानंतर नागरिकांमध्ये सैन्याविरुद्ध असंतोष पसरला आहे. एंजेलचं (Angel) खरं नाव मा क्याल सिन (Ma Kyal Sin) असं आहे. 3 मार्च रोजी सैन्याने एंजलच्या डोक्यात गोळ्या झाडून हत्या केली होती. यानंतर नागरिकांनी तिलाच म्यानमारमधील लोकशाही आंदोलाचं प्रतिक म्हणून स्वीकारलंय.

मृत्यूच्यावेळी एंजेलच्या टी-शर्टवरील मेसेज व्हायरल

म्यानमारमध्ये 1 फेब्रुवारी रोजी सैन्याने लोकशाही सरकार उलथून टाकत सत्ता काबिज केली. याविरोधातच म्यानमारचे नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. यानंतर सैन्याने आंदोलन दडपण्यासाठी आणीबाणीची घोषणा केली. म्यानमारच्या प्रमुख राजकीय नेत्या आंग सान सू कीसह (Aung San Suu Kyi) अनेक वरिष्ठ राजकीय नेत्यांना अटक करण्यात आलंय.

याशिवाय सैन्याने नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांमध्येही गैरप्रकार झाल्याचा आरोप केलाय. मात्र, निवडणूक आयोगाने हे आरोप फेटाळले आहेत. दुसरीकडे सैन्याने एंजलची हत्या केल्यानंतर ती आंदोलनाचा चेहरा झालीय. तिचा फोटो व्हायरल होतोय. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर झालेल्या एंजलच्या फोटोत तिच्या शर्टवर लिहिलं आहे ‘सर्व काही ठिक होईल’. तिचं हे आशावादी वाक्यच आंदोलाची घोषणा झालंय.

हेही वाचा :

आंग सान सू की यांच्यावर म्यानमार सैन्याकडून सर्वात मोठा आरोप, 11 किलो सोनं आणि कोट्यावधींच्या लाचेचा दावा

Special Story | म्यानमारमध्ये लोकशाहीला सुरुंग! लष्कराचा उठाव, भारतावर काय परिणाम?

26 वर्षांची हुकूमशाही ते एका महिलेनं आणलेली लोकशाही, पुन्हा सैन्यअधिपत्याखाली गेलेल्या म्यानमारची सगळी कहाणी!

व्हिडीओ पाहा :

Myanmar army dug up dead body of girl who shot dead during protest

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.