Myanmar Coup : म्यानमार सैन्याची क्रुरता, वाहिले रक्ताचे पाट, आतापर्यंत 320 आंदोलकांची हत्या

1 फेब्रुवारीला म्यानमार सैन्याने सत्ता काबिज केल्यापासून तिथल्या जनतेवर अनन्वित अत्याचार सुरु आहेत. आंदोलकांना बेदम मारहाण करण्यात येतेय. त्यांच्यावर गोळ्या झाडल्या जात आहेत.

Myanmar Coup : म्यानमार सैन्याची क्रुरता, वाहिले रक्ताचे पाट, आतापर्यंत 320 आंदोलकांची हत्या
लष्कराने सत्ता काबिज केल्यानंतर आतापर्यंत 320 आंदोलकांची लष्कराकडून हत्या करण्यात आली आहे.
Follow us
| Updated on: Mar 26, 2021 | 3:51 PM

नवी दिल्ली : म्यानमारमधील सत्ता सैन्याने आपल्या ताब्यात घेतल्यानंतर सर्वसामान्य आंदोलकांची दिवसाढवळ्या आणि भर रस्त्यात हत्या केली जातेय. 1 फेब्रुवारीला म्यानमार सैन्याने सत्ता काबिज केल्यापासून तिथल्या जनतेवर अनन्वित अत्याचार सुरु आहेत. आंदोलकांना बेदम मारहाण करण्यात येतेय. त्यांच्यावर गोळ्या झाडल्या जात आहेत. सामान्य जनता आणि सैन्यामध्ये सुरु असलेल्या या संघर्षात आतापर्यंत 300 पेक्षा अधिक आंदोलकांचा बळी गेला आहे.(320 protesters have been shot dead by the military in Myanmar)

म्यानमार लष्कराने रक्ताचे पाट वाहिले

असिस्टंट असोसिएशन फॉल पॉलिटिकल प्रिजनर्सने दिलेल्या माहितीनुसार, 1 फेब्रुवारीला म्यानमारची सत्ता सैन्याने आपल्या ताब्यात घेतल्यापासून आतापर्यंत 320 आंदोलकांची सैन्याने हत्या केलीय. तर 2 हजार 981 आंदोलकांना अटक केली आहे. आंदोलकांना जबरदस्तीने अटक करण्यात येत असून, त्यांच्यावर खटले दाखल केले जात आहेत.

आंदोलकांवर महाभियोगाचा खटला

AAPPने दिलेल्या माहितीनुसार, यंगूनच्या थिंगांग्युन टाऊनशिप, सागांर परिसरातील खिन-यू टाऊन, काचिन राज्यायातील मोहिनी टाऊन आणि शान राज्यातील ताऊंग्गी शहरात काल 9 जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्याच्या आदल्या दिवशी 23 आंदोलकांचा बळी घेण्यात आला होता. आतापर्यंत सैन्याने जेवढ्या लोकांना अटक केली आहे, त्यातील 24 जणांविरोधात आरोप सिद्ध झाले आहेत. 109 लोकांविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलंय. MAAPP दिलेल्या माहितीनुसार 2 हजार 981 लोकांच्या अटकेची पुष्टी करण्यात आली आहे. त्यात 2 हजार 418 लोक ताब्यात आहेत किंवा त्यांच्यावर अभियोगाचा खटला भरण्यात आला आहे.

म्यानमारमध्ये लष्करशाहीकडून सुरु असलेल्या हिंसक कारवाईचे पडसाद आता जगभरात उमटायला सुरुवात झाली आहे. अमेरिकेसह अन्य देशांनी म्यानमारमधील लष्कराने सुरु केलेल्या अन्यायावर नाराजी व्यक्त केली आहे.

म्यानमारमध्ये नेमकं काय घडलं?

म्यानमारमध्ये 8 नोव्हेंबर 2020 रोजी निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत आँग सान सू ची यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल लील फॉर डेमॉक्रसी अर्थात NLD या पक्षाला अभूतपूर्व यश मिळालं. सू ची यांच्या NLD या पक्षाला 476 पैकी तब्बल 396 जागा मिळाल्या. तर लष्कराने पाठिंबा दिलेल्या युनियन सॉलिडॅरिटी अँड डेव्हलपमेंट या पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. निवडणूक निकालानंतर मतदार याद्यांमध्ये मोठी अफरातफर झाल्यानं असा निकाल लागल्याचा दावा म्यानमारच्या लष्करानं केला होता. मात्र, याबाबत कुठलेही पुरावे नसल्याचं सांगत म्यानमारच्या निवडणूक आयोगाने हा दावा फेटाळून लावला होता. अशा परिस्थितीत आँग सान सू ची यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारचं संसदीय सत्र 1 फेब्रुवारीपासून सुरु होणार होतं. लष्कराने पुन्हा एकदा उठाव करुन संसदीय सत्र सुरु होण्यापूर्वीच देशाची सर्व सूत्र आपल्या हाती घेतली आहेत.

संबंधित बातम्या :

ची हुकूमशाही ते एका महिलेनं आणलेली लोकशाही, पुन्हा सैन्यअधिपत्याखाली गेलेल्या म्यानमारची सगळी कहाणी!

म्यानमारमध्ये लष्कराचा उठाव, सत्तापालट; वर्षभरासाठी आणीबाणी

320 protesters have been shot dead by the military in Myanmar

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.