विश्वासदर्शक ठराव हरुनही नेपाळच्या पंतप्रधानपदी केपी शर्मा ओलीच! जाणून घ्या कसं घडलं?

विरोधकांनी अनेक प्रयत्न करुनही त्यांना बहुमत सिद्ध करता आलं नाही. त्यामुळे नेपाळच्या संविधानाप्रमाणे सर्वात मोठ्या पक्षाचे नेते केपी शर्मा ओली यांची पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

विश्वासदर्शक ठराव हरुनही नेपाळच्या पंतप्रधानपदी केपी शर्मा ओलीच! जाणून घ्या कसं घडलं?
Follow us
| Updated on: May 14, 2021 | 5:23 PM

नवी दिल्ली : नेपाळमधील राजकारणानं मोठा यू-टर्न घेतला आहे. विश्वासदर्शक ठराव हरुनही नेपाळच्या पंतप्रधानपदी पुन्हा एकदा केपी शर्मा ओलीच विराजमान झाले आहेत. केपी शर्मा ओली विश्वासदर्शक ठराव हरल्यानंतर राष्ट्रपतींनी विरोधकांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी 3 दिवसांचा कालावधी दिला होता. पण विरोधकांनी अनेक प्रयत्न करुनही त्यांना बहुमत सिद्ध करता आलं नाही. त्यामुळे नेपाळच्या संविधानाप्रमाणे सर्वात मोठ्या पक्षाचे नेते केपी शर्मा ओली यांची पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे. (KP Sharma Oli re-elected as Nepal’s Prime Minister)

ओली पंतप्रधान पदावरुन पायउतार झाल्यानंतर विरोधकांना दिलेला वेळ गुरुवारी रात्री 9 वाजता संपला. त्यानंतर नेपाळचे राष्ट्रपती भंडारी यांनी संविधानानुसार कलम 76(3) नुसार सर्वात मोठ्या पक्षाच्या नेत्याच्या रुपात ओली यांची पुन्हा एकदा पंतप्रधानपदी नियुक्ती केली आहे. ओली यांनी शुक्रवारी दुपारी अडीच वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेत पुन्हा एकदा नेपाळचा कार्यभार आपल्या हाती घेतला आहे. ओली यांना सदनात विश्वासमत सिद्ध करण्यासाठी 30 दिवसांचा वेळ मिळणार आहे.

मोर्चे बांधणीत विरोधक अपयशी

केपी शर्मा ओली यांच्याविरोधात मोर्चेबांधणी करत आघाडी बनवू इच्छिणाऱ्या विरोधकांच्या पदरात निशारा पडली. तीन दिवसांपूर्वी संसदेत ओली यांच्याबाजून 93 तर विरोधात 124 मतं मिळाली होती. मात्र बहुमत सिद्ध करण्यासाठी विरोधकांना अजून 12 मतांची गरज होती. पण तीन दिवसांच्या कालावधीत विरोधकांना बहुमत मिळवता आलं नाही. नेपाळचा प्रमुख विरोधी पक्ष नेपाळी काँग्रेस, माओवादी आणि जनता समाजवादी पार्टी एकत्र आले असते तर ओली यांच्याविरोधात विरोधकांना बहुमत मिळवता आलं असतं. पण ओली यांनी फेकलेल्या जाळात विरोधक अशाप्रकारे अडकले की त्यांनी बहुमतही सिद्ध करता आलं नाही आणि ओली यांचा सत्तेपासून दूर ठेवू शकले नाहीत.

समर्थन काढल्यानं ओली सरकार अल्पमतात

पुष्पकमल दहल यांच्या नेतृत्वातील नेपाळ कम्युनिस्ट पार्टीने सरकारचं समर्थन काढून घेतलं. त्यानंतर ओली सरकार अलपमतात आलं होतं. त्यामुळे नेपाळमध्ये मोठं राजकीय संकट निर्माण झालं आहे. नेपाळमधील राजकीय अस्थिरतेची चर्चा जगभरात सुरु होती. इतकंच नाही तर चीनने या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचाही प्रयत्न केला होता.

ओली यांची बहुमताची अपेक्षा फोल

दरम्यान विश्वासदर्शक ठरावादरम्यान संसदेत कार्यवाही सुरु होण्यापूर्वी केपी शर्मा ओली यांनी आपल्या आपल्या पार्टीतील सदस्यांना मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. त्यांनी एक ट्वीट करुन आपण विश्वासदर्शक ठराव जिंकू असा दावा केला होता. जर काही अंतर्गत असहमती किंवा असंतोष असेल तर तो चर्चा करुन सोडवला जाऊ शकतो. त्यांनी पक्षातील सदस्यांना कुठलाही निर्णय विचारपूर्वक करण्याचंही आवाहन केलं होतं.

संबंधित बातम्या :

नेपाळमध्ये मोठं राजकीय संकट! पंतप्रधान केपी शर्मा ओली विश्वासदर्शक ठराव हरले

नेपाळमध्ये राजकीय संकट वाढलं, पंतप्रधान ओलींकडून संसद बरखास्त, आता पुढे काय?

KP Sharma Oli re-elected as Nepal’s Prime Minister

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....