फक्त बल्ब बदलण्याची नोकरी, 1 कोटी रुपये पगार, तरीही अर्ज नाही, काय आहे कारण
JOB : नोकरीची एक जाहिरात सध्या चांगली चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर लाखो लोकांनी ही जाहिरात पाहिली आहे. त्या जाहिरातीनुसार नोकरी बल्ब बदलण्याची आहे अन् त्यासाठी पगार वर्षाला १ कोटी रुपये आहे.
न्यूयार्क : तुम्हाला कोणी सांगितले की, फक्त लाइट बल्ब बदलण्याची नोकरी आहे आणि 1 कोटी रुपये पगार देणार आहे…नोकरी विदेशात आहे…नोकरीसाठी जास्त अनुभवाची गरज नाही…फक्त वर्षभराचा अनुभव पुरेसा आहे. तर तुमचे उत्तर काय असणार? सध्या एक नोकरीची ऑफर सोशल मीडियावर चर्चेत आहे. मात्र, त्यात भरघोस पगार देऊनही नोकरीसाठी अर्ज करत नाहीत. कारण काय असणार जाणून घेऊ या…
काय आहे नोकरी
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या नोकरीच्या जाहिरातीनुसार, ही नोकरी टॉवर लँटर्न चेंजरची आहे. अमेरिकेतील साउथ डकोटा येथे ही नोकरी आहे. यामध्ये तुम्हाला 600 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या सिग्नल टॉवरवर चढून त्याचा बल्ब बदलावा लागणार आहे. हे टॉवर सामान्य टॉवर्सपेक्षा वेगळे आहेत. या टॉवरच्या माथ्यावर पोहोचणे आणि बल्ब बदलण्यासाठी उभे राहणे खूप कठीण काम आहे. त्यावर चढण्यासाठी सुरक्षितता म्हणून सेफ्टी केबलचा वापर केला जातो.
Every six months this man in South Dakota climbs this communication tower to change the light bulb. He is paid $20,000 per climb. pic.twitter.com/z9xmGqyUDd
— Historic Vids (@historyinmemes) December 2, 2022
नोकरीसाठी काय आहे अट
नोकरीची सर्वात आवश्यक अट म्हणजे अर्जदाराला उंचीची भीती वाटू नये. तो शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असावा. एक वर्षापेक्षा कमी अनुभव असलेले लोक देखील अर्ज करू शकतात. वेतन अनुभवावर आधारित असेल. पण सुरुवातीचा पगार देखील खूप जास्त असेल.
किती वेळ लागतो
जमिनीपासून 600 मीटरवर असलेल्या टॉवरच्या माथ्यावर चढण्यासाठी सुमारे 3 तास लागतात, असे सांगण्यात आले. उतरायला तेवढाच वेळ लागेल. म्हणजे काम 6-7 तासांचे असेल. याशिवाय टॉवरच्या वरच्या बाजूला १०० किमी प्रतितास वेगाने वारा वाहत असतो, ज्यामुळे लाइट बल्ब बदलण्याचे काम आणखी आव्हानात्मक होते.
किती आहे पॅकेज
हे काम करणार्या व्यक्तीला 100000 पौंड म्हणजेच सुमारे 1 कोटी रुपये वार्षिक वेतन पॅकेज मिळेल. टॉवरचा बल्ब दर 6 महिन्यांत एकदा किंवा दोनदा बदलावा लागतो. टॉवरवर चढून हे काम त्या व्यक्तीला एकट्याने करावे लागेल.
जाहिरात व्हायरल
टिकटॉकवर या नोकरीची जाहिरात व्हायरल झाली आहे. परंतु गलेलठ्ठ पगार असूनही अर्जदारांची संख्या खूपच कमी आहे. कारण हे काम अतिशय जोखमीचे आहे. सर्वप्रथम, ही जाहिरात Science8888 नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आली होती, जी आतापर्यंत लाखो वेळा पाहिली गेली आहे. जाहिरातीच्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती उंच खांबावर चढताना दिसत आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे – प्रत्येकजण ते करू शकत नाही.
कामात धोका
एवढा भरघोस पगार देऊनही या नोकरीसाठी फारसे लोक अर्ज करत नाहीत. कारण या कामात खूप धोका आहे. वास्तविक, हे काम टॉवर लँटर्न चेंजरचे आहे. यामध्ये तुम्हाला 600 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या सिग्नल टॉवरवर चढून त्याचा बल्ब बदलावा लागेल.