इंडो-जर्मन पार्टनरशीपवर पंतप्रधान मोदी यांचं ऐतिहासिक भाषण; भारताला विकासाच्या शिखरावर नेण्याचं आवाहन

जर्मनी भारताचा एक विश्वासू भागिदार आहे. सध्या जर्मनीच्या भारतात 1800 हून अधिक कंपन्या सक्रिय आहेत. जवळपास तीन लाख भारतीय जर्मनीत राहतात. आणि 50 हजार विद्यार्थी जर्मनीच्या विद्यापीठांमधून शिक्षण घेत आहेत.

इंडो-जर्मन पार्टनरशीपवर पंतप्रधान मोदी यांचं ऐतिहासिक भाषण; भारताला विकासाच्या शिखरावर नेण्याचं आवाहन
PM ModiImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 22, 2024 | 11:16 PM

न्यूज9 ग्लोबल समिटच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडो-जर्मन पार्टनरशीपवर ऐतिहासिक भाषण दिलं. भारत आणि जर्मनीची भागिदारी म्हणजे नव्या युगाची सुरुवात आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. इंडो जर्मन पार्टनरशीपची प्रासंगिकता आणि त्याच्या व्यापक शक्यतांवरही त्यांनी चर्चा केली. दोन्ही देश आर्थिक, तांत्रिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील नव्या शिखरावर जाण्यास दोन्ही देश अग्रेसर असतानाच मोदींनी हे विधान केल्याने त्याला अधिक महत्त्व आलं आहे.

इंडो-जर्मन पार्टनरशीपमध्ये आज एक नवा अध्याय जोडलागेला आहे. ही भागीदारी म्हणजे दोन्ही देशांची जबाबदारी आणि दीर्घकालिक सहभागाचं प्रतिक आहे. या भागिदारीला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. दोन्ही देशाचं नातं ऐतिहासिक आणि स्थिर असल्याचंच यातून दिसून येतं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

तेलुगू आणि तमिळ भाषेतील पुस्तके प्रकाशित करणारा जर्मनी हा यूरोपातील पहिला देश आहे. आमचं सांस्कृतिक नातं अनेक शतकांपूर्वीचं आहे. यूरोपातील पहिलं संस्कृत ग्रामर सुद्धा एका जर्मन विद्वानाने लिहिलं होतं, याकडेही मोदी यांनी लक्ष वेधलं.

विश्वासाची भागिदारी

जर्मनी भारताचा एक विश्वासू भागिदार आहे. सध्या जर्मनीच्या भारतात 1800 हून अधिक कंपन्या सक्रिय आहेत. जवळपास तीन लाख भारतीय जर्मनीत राहतात. आणि 50 हजार विद्यार्थी जर्मनीच्या विद्यापीठांमधून शिक्षण घेत आहेत. जर्मनीने फोकस ऑन इंडिया डॉक्यूमेंट्स प्रकाशित केलं आहे. त्यावरून जग भारताकडे स्ट्रॅटेजिक आणि टेक्नॉलॉजिकल हब म्हणून पाहत असल्याचं दिसून येत आहे, असंही मोदी म्हणाले.

रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म

पंतप्रधानांनी गेल्या दहा वर्षातील भारतातील विकासावर प्रकाश टाकला. आम्ही रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्मच्या मंत्रानुसार प्रत्येक क्षेत्रात धोरणात्मक बदल घडवून आणले आहेत. 30 हजाराहून अधिक अनुपालनांना रद्द केलं आहे. जीएसटीच्या माध्यमातून टॅक्स सिस्टिम सुटसुटीत केली आहे. आम्ही भारतातील बँकिंग सिस्टिम मजबूत केली आहे. बिझनेससाठी प्रोग्रेसिव्ह आणि स्टेबल पॉलिसी मेकिंग वातावरण तयार केलं आहे. ही सुधारणा भारताला विकसित राष्ट्र करण्यासाठी अत्यंत मैलाचा दगड ठरला आहे, असंही त्यांनी सांगितलं.

उद्योग… भारताची ताकद

भारताच्या विनिर्माण क्षेत्रातील प्रगतीचाही त्यांनी आढावा घेतला. भारत जगातील सर्वात मोठा टू व्हिलर निर्माता आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा स्टिल आणि सिमेंट निर्मिती करणारा देश आहे. चौथा सर्वात मोठा फोर व्हिलर निर्मिती करणारा देश आहे. भारतातील सेमी कंडक्टर इंडस्ट्रीही जागतिक पटलावर दखल घेण्याजोगी होणार आहे, असं ते म्हणाले.

डिजिटल क्षेत्रातील गुंवतणूक

भारत भौतिक, सामाजिक आणि डिजिटल संरचनेत वेगाने गुंतवणूक करत आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा आणि अत्यंत अनोखा असा डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर असणारा देश आहे, असंही मोदींनी स्पष्ट केलं. या सर्व प्रयत्नांमुळेच भारत आज गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचं केंद्र बनल्याचंही ते म्हणाले.

या व्यवसाय सुरू करा

यावेळी मोदींनी जर्मनीच्या कंपन्यांना भारतात गुंतवणूक आणि व्यवसाय करण्याचं आमंत्रण दिलं. ज्या जर्मन कंपन्या भारतात आल्या नाहीत, त्यांना मी भारतात येण्याचं आमंत्रण देत आहे, असं सांगतानाच त्यांनी भारतातील धोरणं आणि वाणिज्यिक स्थिरतेवरही जोर दिला.

मॅन्युफॅक्चरिंग आणि टेक्नॉलॉजी सहकार्य

भारत आणि जर्मनी दरम्यान मॅन्युफॅक्चरिंग, इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंगचच्या क्षेत्रात सहकार्याची मोठी शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं. आम्ही जर्मनीसोबत मिळून जगाच्या समृद्ध भविष्यासाठी योगदान देणार आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Non Stop LIVE Update
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.