AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

North Korea Corona : किम जोंग ऊनच्या दक्षिण कोरीयात कोरोनाचा कहर, तापाने फणफणलेल्या 6 जणांचा मृत्यू

जवळपास 1 लाख 87 हजार लोकांना आयसोलेट करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचारही सुरु आहे.

North Korea Corona : किम जोंग ऊनच्या दक्षिण कोरीयात कोरोनाचा कहर, तापाने फणफणलेल्या 6 जणांचा मृत्यू
किम जोंग ऊनImage Credit source: twitter
| Updated on: May 13, 2022 | 8:23 AM
Share

दिल्ली : दक्षिण कोरीयातून (North Korea) कोरोनाबाबतची (Corona) महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे. कोरोनामुळे दक्षिण कोरीयामध्ये लॉकडाऊन (Lockdown) लावण्याची घोषणा किम जोंगनं घेतली होती. त्यानंतर आता दुसऱ्याच दिवशी दक्षिण कोरीयात कोरोनामुळे सहा जणांचा जीव गेल्याची माहिती समोर आली आहे. एएफपीनं स्थानिक माध्यमांच्या हवाल्यानं याबाबतं वृत्त दिलंय. सहा जणांना कोरोनाचा ताप येऊन त्यांचा मृत्यू झाला असल्याचं सांगितलं जातंय. तर असंख्य जणांना कोरोनाची लक्षण दिसून आल्यानं त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आलंय. कोरोनाच्या वाढत्या पाश्वभूमीवर दक्षिण कोरीयातील प्रशासना अलर्ट झालंय. जवळपास 1 लाख 87 हजार लोकांना आयसोलेट करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचारही सुरु आहे. जवळपास दोन लाख लोकांना कोरोना सदृश्य लक्षणं दिसून आल्यानंतरत त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आलेत. सहा जणांपैकी एकाचा मृत्यू हा ओमिक्रॉनमुळे झाला असल्याचंही सांगण्यात आलं आहे. कोरीयन सेंट्रल न्यूज एजेन्सीनं याबाबतची माहिती दिली आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटापासून दक्षिण कोरीयामध्ये कोरोना रुग्णवाढीचा भडका उडाल्याचंही या वृत्त संस्थेनं म्हटलंय. तर पहिल्यांदाच कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली असल्याचंही सांगितलं जातंय.

वृत्तसंस्थेची धक्कादायक माहिती

कडक नियम जाहीर

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर आता दोन वर्षांनी प्योंगयांगमध्ये पहिला कोरोना बाधित आढळून आला असल्याचं सांगितंल जात होतं. त्यानंतर खबरदारी म्हणून कडक नियम जाहीर करण्यात आले. गुरुवारी पहिल्या कोरोना रूग्णाची नोंद करण्यात आली होती त्यानंतर तत्काळ लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. प्योंगयांग शहरात ओमिक्रॉन विषाणूचे उप-प्रकार आढळून आले असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर कोरीयातील संपूर्ण प्रशासन खडबडून जागं झालं होतं.

एकाला ओमायक्रॉनची लागण

प्योंगयांगमधील लोकांना ओमायक्रॉन या कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग झाल्याचं पाहण्यात आलंय. 8 मे रोजी लक्षणं जाणवणाऱ्या लोकांचे नमुने गोळा करण्यात आलेले. त्यांचा आता रिपोर्ट समोर आलाय. या रिपोर्टनुसार सध्या एकाला ओमायक्रॉनची लागण झाल्याचं निदर्शनास आलं. उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उनने या संदर्भात वर्कर्स पार्टीची एक बैठक बोलावली होती. या बैठकीत आपत्कालीन परिस्थितीविषयी चर्चा करण्यात आली. त्यानंतर लगेचच लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती.

कोरोनाची धास्ती पुन्हा वाढलीय

किमने वर्कर्स पार्टीच्या बैठकीत बऱ्याच मुद्द्यांवर चर्चा केली. यात कोरोनाचा पहिला रूग्ण आढळल्यानंतर कोणती खबरदारी घ्यावी? प्रशासनाने कोणत्या कामांकडे लक्ष द्यावं? कोणत्या उपाय योजनांमुळे हा संसर्ग आटोक्यात राहिल? शिवाय संक्रमण वाढल्यास कोणत्या उपाय योजना कराव्यात? यावर चर्चा करण्यात आल्याचं सांगितलं जात होतं. दरम्यान, आता तापाने फणफणलेल्या सहा जणांच्या मृत्यूनं दक्षिण कोरीयामध्ये कोरोनाची धास्ती पुन्हा वाढलीय.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.