AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेने गायब केल्याचा आरोप, हुकूमशाह किम जोंगचा पुतण्या हान सोल कोण आहे?

उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांचा पुतण्या किम हान सोल सध्या बेपत्ता झाल्याची माहिती समोर येतेय.

अमेरिकेने गायब केल्याचा आरोप, हुकूमशाह किम जोंगचा पुतण्या हान सोल कोण आहे?
| Updated on: Nov 23, 2020 | 4:32 PM
Share

प्याँगयांग : उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांचा पुतण्या किम हान सोल सध्या बेपत्ता झाल्याची माहिती समोर येतेय. विशेष म्हणजे किम हान सोल हाच उत्तर कोरियाचा खरा वारसदार असल्याचं बोललं जातं. त्याला अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएने (CIA) सुरक्षेच्या कारणामुळे ताब्यात घेतलं असल्याचंही वृत्त आहे. सध्या हान सोल कुठे आहे याची कुणालाही माहिती नाही. सीआयएने देखील या विषयावर बोलण्यास नकार दिला आहे (North Korea dictator Kim Jong Un nephew Kim Han Sol missing CIA and mystry).

हान सोल हा उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन (Kim Jong Un) यांचा भाऊ ‘किम जोंग नाम’ यांचा मुलगा आहे. किंम जोंग उन यांच्यावर 2017 मध्ये गुप्त एजंटमार्फत आपल्या भावाची हत्या केल्याचा आरोप आहे. यानंतर किम जोंग नाम यांचा मुलगा हान सोलने नेदरलँडची राजधानी एम्सटर्डममध्ये राजकीय आश्रय घेतला होता. त्याचं वय सध्या अवघं 25 वर्षे आहे.

हान सोलचं गर्भश्रीमंत आयुष्य

25 वर्षीय किम हान सोल नेदरलँडमध्ये गर्भश्रीमंत तरुणाचं आयुष्य जगतो. सोशल मीडियावर हान सोलचे अनेक फोटो पाहायला मिळतात. या फोटोंमध्ये तो कधी अरमानी सूटमध्ये तर, कधी महागड्या बुड आणि इतर ब्रँडेड वस्तूंसोबत दिसतो. किम जोंग-नाम यांनी आपल्या आयुष्यात खूप पैसे जमा केले होते. त्याच पैशाच्या जोरावर आता तो मजा करत असल्याचं बोललं जातं.

फेब्रुवारी 2017 मध्ये हान सोल याच्या वडिलांची हत्या झाल्यानंतर मकाऊमधील त्याच्या घराची सुरक्षा व्यवस्था काढण्यात आली होती. यानंतर हानने उत्तर कोरियाच्या सरकारविरोधात सुरु असलेल्या ‘फ्री जोसन’ या आंदोलनाकडे मदत मागितली. हे भूमिगत आंदोलन आहे आणि किम जोंग उन यांचं सरकार पाडण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत.

फ्री जोसन आंदोलनाचे प्रमुख नेते एड्रियन होंग यांनी आतापर्यंत इतका श्रीमंत तरुण पाहिला नसल्याचं म्हटलंय. हान सोल एका यूट्यूब व्हिडीओत चेलिमा सिविल डिफेंसचे (‘फ्री जोसन’) आभार मानतानाही दिसत आहे.

उत्तर कोरियाचा खरा वारसदार

हान सोलला किम जोंग उनचा खरा वारसदार मानलं जातं. ‘फ्री जोसन’ आंदोलन कव्हर करणाऱ्या पत्रकार सूकी किम यांच्यानुसार किम जोंग उनच्या पुतण्याला पूर्व उत्तर कोरियातील नेते खरा वारसदार मानतात.

हान सोलच्या कुटुंबाचं शेवटचं व्हिडीओ फुटेज

हान सोलचा शेवटचा व्हिडीओ सीआयएच्या एका एजंटसोबतचा आहे. त्यानंतर हान सोल किंवा त्यांचं कुटुंब कुठेही दिसलं नाही.

संबंधित बातम्या :

उत्‍तर कोरियाचा प्रमुख आणि जगप्रसिद्ध हुकुमशाह किम जोंग नागरिकांसमोर का रडला?

Kim Jong-Un | उत्तर कोरियाच्या सुल्तानचा मास्क सक्तीचा फर्मान, नियमांचे उल्लंघन केल्यास थेट सक्तमजुरी

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग कोमात, सत्तेची सूत्रे बहिणीकडे, भावापेक्षा बहीण जास्त क्रूर

North Korea dictator Kim Jong Un nephew Kim Han Sol missing CIA and mystry

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.