Imran Khan: अखेर इमरान खान यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल, 31 मार्च रोजी चर्चा; पाकिस्तानात इम’रान’ राहणार की जाणार?
पंतप्रधान इमरान खान यांच्या सरकारला महागाई रोखण्यात अपयश आल्याने सत्ताधारी आघाडीतील पक्षांनी बंड पुकारलं आहे. त्यामुळे इमरान खान सरकारवर संकटाचं वादळ घोंघावत असतानाच आज अखेर पाकिस्तानच्या नॅशनल असेंबलीतील कनिष्ठ सभागृहात इमरान खान यांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडला गेला आहे.
लाहोर: पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) यांच्या सरकारला महागाई रोखण्यात अपयश आल्याने सत्ताधारी आघाडीतील पक्षांनी बंड पुकारलं आहे. त्यामुळे इमरान खान सरकारवर संकटाचं वादळ घोंघावत असतानाच आज अखेर पाकिस्तानच्या (Pakistan) नॅशनल असेंबलीतील कनिष्ठ सभागृहात इमरान खान यांच्या विरोधात अविश्वास ठराव (no-trust motion) मांडला गेला आहे. नॅशनल असेंबलीतील विरोधी पक्षनेते आणि पीएमएल-एनचे अध्यक्ष शाहबाज शरीफ यांनी हा अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. त्यावर येत्या 31 मार्च रोजी चर्चा होणार असून या अविश्वास प्रस्तावावर 1 ते 4 एप्रिल दरम्यान मतदान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे इमरान खान पंतप्रधान पदावर की राहणार याचा फैसला एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात लागण्याची चिन्हे आहेत. मात्र, या कालावधीत इमरान खान यांच्याकडून सत्ता टिकवण्यासाठी जोरदार लॉबिंग होण्याची शक्यता असून बहुमतासाठीचं आवश्यक संख्याबळ जुळवण्यात इमरान यांना यश येतं की नाही याकडे सर्व जगाचं लक्ष लागलं आहे.
पाकिस्तानच्या संसदेने विरोधी पक्षाने मांडलेला अविश्वास प्रस्ताव दाखल करून घेतला आहे. शाहबाज शरीफ यांनी या अविश्वास प्रस्तावावर आज चर्चाही सुरू केली. त्यानंतर 31 मार्चपर्यंत पाकिस्तानची संसद स्थगित करण्यात आली आहे. आता या अविश्वास प्रस्तावावर 31 मार्च रोजी संध्याकाळी 4 वाजता सविस्तर चर्चा होणार आहे.
अन् अविश्वास प्रस्ताव दाखल झाला
पाकिस्तानच्या संविधानानुसार नॅशनल असेंबलीतील उपस्थित असलेल्या 20 टक्के खासदारांचं प्रस्तावाला समर्थन हवं असतं. अविश्वास प्रस्ताव मांडला गेल्यानंतर असेंबलीच्या उपाध्यक्षांनी अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने असलेल्यांना उभं राहण्यास सांगितलं. त्यानंतर त्यांची मोजणी करून प्रस्तावावर चर्चा करण्यास मंजुरी दिली.
1 ते 4 एप्रिल दरम्यान चर्चा
आता या अविश्वास प्रस्तावावर 1 ते 4 एप्रिल दरम्यान चर्चा होण्याची शक्यता आहे. नॅशनल असेंबलीच्या नियमानुसार अविश्वास प्रस्ताव सादर केल्या जाण्याच्या तीन दिवस आधी आणि सात दिवसानंतर मतदान घेतलं जात नाही.
अविश्वास प्रस्ताव जिंकण्यासाठीचं गणित काय?
पाकिस्तानच्या नॅशनल असेंबलीतील सदस्य संख्या 342 आहे. अविश्वास प्रस्ताव जिंकण्यासाठी विरोधकांना 172 मतांची गरज आहे. विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल करून घेण्याच्या प्रक्रियेत विजय मिळवला असला तरी प्रत्यक्ष मतदानावेळी 172 मते मिळवू शकतात का? याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
Leader of the Opposition in the National Assembly Shehbaz Sharif has tabled the no-confidence motion against Prime Minister Imran Khan: Pakistan media
(File photo) pic.twitter.com/0NqQC6hsph
— ANI (@ANI) March 28, 2022
संबंधित बातम्या:
पाकिस्तानात इमरान खान सरकारच्या अडचणी वाढल्या, अविश्वास ठराव मांडला जाण्याची शक्यता
Pakistan : इम्रान खान राजीनामा देण्याची शक्यता, अचानक 50 मंत्री गायब, पाकिस्तानात राजकीय भूकंप?