AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकव्याप्त काश्मीरचा वनवास संपणार! भारताच्या संभाव्य ॲक्शनमुळे पाकिस्तान थरथरला

Pahalgam Terrorist Attack : पहेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. कायदेशीर स्ट्राईक नंतर आता पाकव्याप्त काश्मीरची नरक यातनेतून सुटका होईल. दहशतवाद्यांसाठीची ही सुपीक भूमी लवकरच मुक्त होणार आहे.

पाकव्याप्त काश्मीरचा वनवास संपणार! भारताच्या संभाव्य ॲक्शनमुळे पाकिस्तान थरथरला
पहलगाम हल्ला, पीओकेत मोठी कारवाईImage Credit source: टीव्ही ९ नेटवर्क
| Updated on: Apr 26, 2025 | 9:29 AM
Share

पहेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार दौऱ्यादरम्यान त्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. पाकव्याप्त काश्मीरमध्ये ( PoK) थेट लष्कर घुसवून भारत कारवाई करण्याची भीती पाकिस्तानला सतावत आहे. याभागात पाकिस्तानने लष्कराची जमवा जमव सुरू केली आहे. अतिरिक्त कुमक तैनात केली आहे. नियंत्रण रेषेवर LOC वर रात्रीपासून गोळीबार सुरू होता. तर भारताने या परिसरात बॅलेस्टिक मिसाईल रेडी टू अटॅक मोडावर ठेवल्या आहेत. भारत या भागात मोठी कारवाई करणार असल्याचे संकेत मिळत असल्याने पाकिस्तान घाबरला आहे.

पाकव्याप्त काश्मीर दहशतवाद्यांचा गड

PoK हा दहशतवाद्यांचा गड झाला आहे. पाकव्याप्त काश्मीर बळकावल्यापासून हा पट्टा पाकिस्तानने दहशतवाद्यांना आंदण म्हणून दिला आहे. या भागात त्यांची घरं आहेत. या भागात दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात येते. दारुगोळा जमा करणे, तयार करण्याची कामे करण्यात येतात. येथूनच अनेक बेकायदेशीर कृत्य होतात. जगभरातील अनेक दहशतवादी संघटनांचे म्होरके येथेच एकत्र येतात. अल कायदा, इसिस, तालिबान यासह इतर सर्व दहशतवादी गटाचे नेते या भागात सातत्याने दिसतात. काश्मीरमधील तरुणांची माथी भडकवण्याचे आणि त्यांचा वापर भारताविरोधात करण्यासाठी हा भूभाग पाकिस्तानसाठी सर्वात महत्त्वाचा आहे.

PoK मध्ये दहशतवाद्यांसाठी 17 प्रशिक्षण केंद्र, 37 मोठे लॉचिंग पॅड्स आहेत. या ठिकाणी पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय दहशतवाद्यांना प्रशिक्षण देते. त्यांना धार्मिकदृष्ट्या कट्टर करते. त्यांना भारताविरोधात तयार करण्यात येते. भारतात विविध ठिकाणी हल्ला करण्यासाठी खास प्रशिक्षण याच कॅम्पमध्ये देण्यात येते.

या ठिकाणी आहेत दहशतवादाच्या शाळा

1.दुदनियाल

2.अब्दुल बिन मसूद

3.चेलाबंदी

4.मनस्ताय

5.देवलियान

6.घडी दुपट्टा

7.सफैदा

8.हलन सुलामी

9.बाग

10.अलियाबाद

11.फॉरवर्ड कहुटा

12.रावला बंदरगाह

13.डूंगी

14.तत्ता पानी

15.हजीरा

16.सेंसा

17.कोटली

18.निकल

19.पलानी

20. बरला परिसर

पाकिस्तानी सैन्यदल या ठिकाणी तरुणांना दहशतवादाचे प्रशिक्षण देते. त्यांना जन्नतमध्ये 70 हुरांचे स्वप्न दाखवण्यात येते. त्यांना धर्मासाठी बलिदान केले तर जन्नत मिळते असे बिंबवण्यात येते. कमी वयातील तरुणांना आणून त्यांना मोहोरा करण्यात येते. त्यांना कमी वयातच धर्मवेडे करण्यात येते.

रावलकोटमध्ये दहशतवादी संघटनांचे संमेलन

पहेलगाम हल्ल्यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात जगभरातील दहशतवादी संघटनांच्या प्रतिनिधींचे संमेलन झाले. PoK मधील रावलकोटमध्ये जैश ए मोहम्मद, लष्कर ए तैयबा आणि हमास या दहशतवादी संघटनांचे दहशतवादी या संमेलनात सहभागी होते. त्याचे व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. यामध्ये दहशतवादी संघटनांनी हल्ल्याची तयारी केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.