कंधार विमान अपहरणातील दहशतवाद्याची सुटका, पाकिस्तान न्यायालयाच्या आदेशाचं कारण काय?

भारताच्या विमानाचं कंधार येथे अपहरण करुन त्या बदल्यात ब्लॅकमेल करुन सोडवण्यात आलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्याला पाकिस्तानमधील (Pakistan) सिंध उच्च न्यायालयाने गुरुवारी (24 डिसेंबर) सोडून देण्याचे आदेश दिले.

कंधार विमान अपहरणातील दहशतवाद्याची सुटका, पाकिस्तान न्यायालयाच्या आदेशाचं कारण काय?
Follow us
| Updated on: Dec 24, 2020 | 6:41 PM

इस्लामाबाद : भारताच्या विमानाचं कंधार येथे अपहरण करुन त्या बदल्यात ब्लॅकमेल करुन सोडवण्यात आलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्याला पाकिस्तानमधील (Pakistan) सिंध उच्च न्यायालयाने गुरुवारी (24 डिसेंबर) सोडून देण्याचे आदेश दिले. उमर सईद शेख (Omar Saeed Sheikh) असं या दहशतवाद्याचं नाव आहे. या आदेशाने आंतरराष्ट्रीय स्तरावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे (Pakistan court orders to release of Kandhar Plan Hijack terrorist Omar Sheikh).

1999 मध्ये कंधार येथे भारताचं एअर इंडियाचं विमान हायजॅक केलं होतं. विमानातील प्रवाशांना सुरक्षित सोडण्यासाठी त्यावेळी 3 घातक दहशतवाद्यांची सुटका करण्यात आली होती. उमर शेख यापैकीच एक आहे. त्यांच्यावर पाकिस्तानमध्ये अमेरिकेचे पत्रकार डॅनिअल पर्ल (US Journalist Daniel Pearl) यांची हत्या केल्याप्रकरणी खटला सुरु होता. यात उमर शेख, फहाद नसीम, सईद सलमान साकिब आणि शेख मोहम्मद आदिल हे मुख्य आरोपी होते. या सर्वांची सुटका करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सिंध उच्च न्यायालयाने पत्रकार डॅनियल पर्लच्या हत्येची सुनावणी करताना या चारही दहशतवाद्यांना तुरुंगात ठेवणं बेकायदेशीर असल्याचं म्हटलं. न्यायालयाने 2 एप्रिल 2020 रोजी झालेल्या सुनावणीत शेख, साकिब आणि नसीम यांना सोडण्याचे आदेश दिले होते. शेखला मृत्यूदंडाची शिक्षा झाली होती, मात्र न्यायालयाने ही शिक्षा कमी करुन 7 वर्षांच्या तुरुंगवासाची केली. तसेच त्याला 20 लाख पाकिस्तानी रुपये दंड केला होता. शेखने आतापर्यंत 18 वर्षे तुरुंगातच घालवले आहेत. त्यामुळे त्याची 7 वर्षांची शिक्षा आधीच पूर्ण झालेली आहे.

न्यायालयाने या आरोपींच्या सुटकेचे आदेश दिल्यानंतरही पाकिस्तान सरकारने उमरला दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत ताब्यातच ठेवले आहे. सिंध उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटलं, “हे आरोपी कोणत्याही गुन्ह्याशिवाय तुरुंगात बंद आहेत. त्यांना तुरुंगातून सोडावे आणि त्यांचं नाव विमान प्रवास प्रतिबंध यादीत टाकावं, जेणेकरुन ते देश सोडून जाऊ शकणार नाही.”

आदेशावर पाकिस्तानमधूनही टीका

या निर्णयावर जागतिक स्तरावरच नाही, तर पाकिस्तानमधूनही टीका होत आहे. पाकिस्तानच्या नॅशनल प्रेस क्लबने न्यायालयाकडे या निर्णयावर पुनर्विचार करण्याची मागणी केलीय. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी देखील या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलंय. पत्रकार डॅनियल पर्ल ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’चे दक्षिण आशियाचे ब्युरो चीफ होते. 2002 मध्ये दहशतवाद्यांनी त्यांचं अपहरण करुन त्यांचं शीर कलम करत हत्या केली.

हेही वाचा :

कंधारमध्ये तालिबानच्या 90 दहशतवाद्यांचा खात्मा, अफगाणिस्तान सरकारचा दावा

पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी बंकर्स उद्ध्वस्त, भारताची धडाकेबाज कारवाई

Jammu and Kashmir | पुलवाम्यात दहशतवाद्यांचा जवानांवर ग्रेनेड हल्ला, 12 नागरिक जखमी

Pakistan court orders to release of Kandhar Plan Hijack terrorist Omar Sheikh

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....