मुंबई हल्ल्यामागचा सूत्रधार हाफिज सईदला 10 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

पाकिस्तानमधील कोर्टाने मुंबई हल्ल्यामगचा सूत्रधार आणि जमात उद दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईद याला 10 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

मुंबई हल्ल्यामागचा सूत्रधार हाफिज सईदला 10 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा
Follow us
| Updated on: Nov 19, 2020 | 5:40 PM

इस्लामाबाद : पाकिस्तानमधील (Pakistan) कोर्टाने मुंबई हल्ल्यामगचा (26/11 Mumbai Attack) सूत्रधार आणि जमात उद दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईदला (Hafiz Saeed) 10 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत पुरवल्याप्रकरणी आणि त्यामधील सहभागामुळे लाहोरमधील दहशतवादविरोधी न्यायालयाकडून (Anti Terrorism Court) ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. यावेळी दहशतवादी हाफिज सईदसमवेत जमात-उद-दावा (Jamat-ud-Dawa) या दहशतवादी संघटनेच्या चार अन्य सदस्यांनाही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. (Pakistan court Sentenced 10 years jail to Mumbai Attack mastermind and JUD Chief Terrorist Hafiz Saeed)

संयुक्त राष्ट्रांनी हाफिज सईदला मोस्ट वाँटेड दहशतवादी घोषित केल्यानंतर गेल्या वर्षी 17 जुलै रोजी त्याला अटक करण्यात आली होती. हाफिज सईदसह त्याचे दोन साथीदार जफर इकबाल आणि याह्या मुजाहिद या दोघांना 10 वर्ष सहा महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर हाफिजचा नातेवाईक असलेल्या अब्दुल रहमान मक्की याला सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

हाफिज सईदला यापूर्वीदेखील कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. लष्कर ए तोयबाची फ्रंट ऑर्गनायझेशन Jamaat-ud-Dawa चा प्रमुख असलेल्या हाफिज सईदला आणि त्याच्या सहकार्‍यांना दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत पुरवल्याप्रकरणी (terror-financing case) फेब्रुवारी 2020 मध्ये 11 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

पाकिस्तानमध्ये 26/11 बाबत चाललेल्या खटल्यात हाफिज सईदला इतके दिवस अटकच होत नव्हती. या हल्ल्यातील दुसरा आरोपी डेव्हिड हेडलीची साक्ष आणि भारताने दिलेल्या अनेक पुराव्यानंतरही पाकिस्तान हाफिज सईदवर कारवाई करत नव्हतं. मात्र आंतरराष्ट्रीय दबाव आणि भारताच्या कूटनीतीनंतर अखेर हाफिज सईदला बेड्या ठोकण्यात आल्या आणि आता शिक्षादेखील सुनावण्यात आली आहे.

मुंबईत 26/11 च्या हल्ल्यातील हाफिज सईद हा मास्टरमाईंड आहे. या हल्ल्यात 6 अमेरिकन नागरिकांसह 166 लोकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात कसाब आणि इतर दहशतवाद्यांना हाफिजने फोनद्वारे माहिती पुरवली होती. पाकिस्तान सरकारने हाफिजचे नाव एक्झिट कंट्रोल लिस्टमध्ये समाविष्ट केले आहे. त्यामुळे तो पाकिस्तान सोडून जाऊ शकत नाही.

कोण आहे हाफिज सईद?

  • हाफिज सईद हा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे
  • मुंबईवरील 26/11 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात त्याचा प्रमुख हात होता.
  • दहशतवादी कसाब आणि त्याच्या सहकाऱ्यांना पाकिस्तानातून मार्गदर्शन करणारा हाफिज सईदच होता
  • हाफिज सईद जमात-उल-दावा आणि लष्कर ए तोएबा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे.
  • भारतामध्ये अनेक दहशतवादी कारवायांमध्ये या दोन्ही संघटनांचा प्रामुख्याने समावेश आहे.
  • काही वर्षांपूर्वी अमेरिकेने जाहीर केलेल्या दहशतवाद्यांच्या यादीत हाफिज सईदचे नाव दुसऱ्या क्रमांकावर होतं.
  • हाफिजसाठी एक कोटी डॉलरचे रोख रकमेचे बक्षीस घोषित करण्यात आले होते. हाफिज विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती.
  • भारतात 13 डिसेंबर 2001 मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्याचा कट रचणाऱ्यांमध्ये त्याचा समावेश होता.
  • मुंबईतील 11 जुलै 2006 साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातही त्याचा हात होता.
  • तो भारतातच नव्हे तर जगातील सर्वात मोस्ट वाँटेड दहशतवादी आहे.

संबंधित बातम्या

दहशतवादी हाफिज सईदवरील ट्वीटमुळे डोनाल्ड ट्रम्प ट्रोल

दहशतवादी हाफिज सईदला पाकिस्तानात अटक, व्हिडीओ ‘टीव्ही-9’च्या हाती

(Pakistan court Sentenced 10 years jail to Mumbai Attack mastermind and JUD Chief Terrorist Hafiz Saeed)

Non Stop LIVE Update
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.