Big News : इमरान खान यांच्या घरात 30-40 दहशतवादी लपल्याची माहिती; घराला पोलिसांचा वेढा

Imran Khan house 30 40 terrorist Hidden : इमरान खान यांच्या घरात 30-40 दहशतवादी?; वाचा सविस्तर...

Big News : इमरान खान यांच्या घरात 30-40 दहशतवादी लपल्याची माहिती; घराला पोलिसांचा वेढा
Follow us
| Updated on: May 17, 2023 | 4:59 PM

कराची, पाकिस्तान : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या घरात 30-40 दहशतवादी लपल्याची माहिती समोर आली आहे. सुरक्षेसाठी इमरान खान यांच्या घराला पोलिसांनी वेढा घातला आहे. पाकिस्तानमधल्या पंजाब भागातील जमान पार्क भागात इमरान खान यांचं घर आहे. तिथे दहशतवादी लपल्याची माहिती आहे.

मागच्या काही दिवसांपासून इमरान खान यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. आता इमरान खान यांच्या घरात 30-40 दहशतवादी लपल्याची माहिती समोर आली आहे.

इमरान खान यांना इशारा

पाकिस्तानचे सूचना मंत्री आमीर मीर यांनी लाहौरमध्ये एक पत्रकार परिषद घेतली. या आतंकवाद्यांना इमरान खान यांनी तसंच पीटीआयने पोलिसांच्या हवाले केलं पाहिजे. अन्यथा पोलीस त्यांचं काम करतील, असं आमीर मीर यांनी म्हटलं. आतंकवादी इमरान खान यांच्या घरात असल्याची गुप्तचर यंत्रणांद्वारे माहिती मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं.

मागच्या काही दिवसांपासून इमरान खान हे सैन्यदलाच्या निशाण्यावर आहेत. आता आम्ही पीटीआय पक्ष आणि इमरान थान यांना ताकीद देतो की, या दहशतवाद्यांना आमच्या हवाले करा, असं आमीर मीर म्हणालेत.

पीटीआयचे वरिष्ठ नेते आणि पंजाबचे माजी मंत्री डॉ. यास्मिन रशीद आणि मियाँ महमुदूर रशीद यांच्यावर पाकिस्तानच्या पंजाब सरकारने निशाणा साधला. 9 मे रोजी जिना हाऊसवर झालेल्या हल्ल्यासाठी त्यांना जबाबदार धरण्यात आलं. पीटीआयचे नेते इबाद फारूख यांनी त्यांच्या व्हीडिओ वक्तव्यात मोठा खुलासा केला आहे. पीटीआय नेते यास्मिन रशीद, मियां महमुदूर रशीद आणि इतरांनी अनेक पक्ष कार्यकर्त्यांना लिबर्टी चौकात जाण्यासाठी बोलावलं होतं, असं इबाद फारूख यांनी म्हटलं आहे.

पीटीआयच्या नेत्यांनीही आंदोलकांना जिना हाऊस पेटवण्यास सांगितला असल्याचा आरोप इबाद फारूख यांनी केला आहे. जिना हाऊसमध्ये जे काही घडलं ते योग्य नव्हतं, असंही ते म्हणालेत.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली काल राष्ट्रीय सुरक्षा समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत हिंसक हल्ल्यात सामील असणाऱ्या लोकांवर लवकरात लवकर कारवाई व्हावी, असा मुद्दा या बैठकीत मांडण्यात आला.

देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.