AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानात उभारणार कृष्णाचे भव्य मंदिर; इम्रान खान सरकारकडून 20 हजार स्क्वेअर फूट भूखंड मंजूर

राजधानी विकास प्राधिकरणाने सोमवारी लाहोरमध्ये एक अधिसूचना जारी केली. त्यानुसार एच-9/2 येथे हिंदू स्मशानभूमीच्या कामकाजासाठी देखील परवानगी देण्यात आली आहे. | Lord Krishna Temple in Islamabad

पाकिस्तानात उभारणार कृष्णाचे भव्य मंदिर; इम्रान खान सरकारकडून 20 हजार स्क्वेअर फूट भूखंड मंजूर
| Updated on: Dec 22, 2020 | 7:46 PM
Share

लाहोर: पाकिस्तान सरकारने (Pakistan) इस्लामाबादमध्ये हिंदू मंदिर (Hindu Temple) उभारण्यास परवानगी दिली आहे. काही दिवसांपूर्वी या मंदिराचे काम थांबवण्यात आले होते. पाकिस्तानातील काही कट्टरतावाद्यांच्या विरोधामुळे मंदिराच्या निर्माणात अडथळा येत होता. मात्र, सरकारने आता पुन्हा या मंदिराच्या निर्माणाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. (Pakistan Govt approves plot for Lord Krishna Temple)

यासाठी राजधानी विकास प्राधिकरणाने सोमवारी लाहोरमध्ये एक अधिसूचना जारी केली. त्यानुसार एच-9/2 येथे हिंदू स्मशानभूमीच्या कामकाजासाठी देखील परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे स्मशानभूमीच्या चारी बाजूंनी भिंतीचे कुंपण उभारता येणार आहे.

मंदिराच्या निर्माणावर कोणताही बंदी नाही

पाकिस्तानातील धार्मिक मंत्री पीर नुरुल हक कादरी यांनी मंदिराच्या निर्माणाचा विषय इस्लामी धार्मिक परिषदेकडे विचारविनिमयासाठी पाठवला होता. ऑक्टोबरमध्ये धार्मिक परिषदेने इस्लाम किंवा देशाच्या अन्य भागात मंदिर निर्माणावर शरिया कायद्यानुसार कोणतीही बंदी नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार मंदिर निर्माणाला आणि स्मशानभूमीच्या कामकाजाला परवानगी देण्यात आली.

20 हजार स्क्वेअर फुटांवर मंदिराचे बांधकाम

इस्लामाबादच्या एच-9 भागात कृष्ण मंदिरासाठी 20 हजार स्क्वेअर फुटांचा भूखंड मंजूर करण्यात आला. साईट मॅप आणि कागदपत्रांची प्रक्रिया रखडल्यामुळे मंदिराच्या कामकाजाला उशीर झाला होता. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या काळात मंदिरासाठी हा भूखंड निश्चित करण्यात आला होता. मंदिराच्या जवळच स्मशानभूमीही असणार आहे. याशिवाय, अन्य धार्मिक विधींसाठीही जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. हिंदू समाज हा पाकिस्तानातील सर्वात मोठा अल्पसंख्याक समूदाय आहे. पाकिस्तानात साधारण 75 लाख हिंदू राहतात. सिंध प्रांतात हिंदू लोकांची संख्या लक्षणीय आहे.

संबंधित बातम्या:

अयोध्येतील राम मंदिर 3 वर्षांत उभं राहणार, विहिंपला विश्वास

(Pakistan Govt approves plot for Lord Krishna Temple)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.