AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pakistan : श्रीलंकन नागरिकाची जमावाकडून हत्या, लिंचिंग प्रकरणात 800 लोकांविरोधात दहशतवादाचा गुन्हा, 13 संशयित अटकेत

मॉब लिंचिंग (Mob lynching) प्रकरणात आतापर्यंत 800 पेक्षा अधिक लोकांविरोधात दहशतवादाच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर 118 जणांना अटक करण्यात आली असून त्यातील 13 प्रमुख संशयित आहेत. या घटनेनंतर पाकिस्तान सरकारवर दोषींना कठोर शिक्षा देण्यासाठी दबाव वाढत आहे.

Pakistan : श्रीलंकन नागरिकाची जमावाकडून हत्या, लिंचिंग प्रकरणात 800 लोकांविरोधात दहशतवादाचा गुन्हा, 13 संशयित अटकेत
पाकिस्तान मॉब लिंचिंग
Follow us
| Updated on: Dec 04, 2021 | 10:30 PM

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या (Pakistan) पंजाब प्रांतात मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका श्रीलंकन नागरिकाला अमानुष मारहाण करत रस्त्यावरच जाळून मारल्याची घटना घडली आहे. या अमानवी प्रकाराचा व्हिडीओ वाऱ्यासारखा सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. त्यानंतर या मॉब लिंचिंग (Mob lynching) प्रकरणात आतापर्यंत 800 पेक्षा अधिक लोकांविरोधात दहशतवादाच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर 118 जणांना अटक करण्यात आली असून त्यातील 13 प्रमुख संशयित आहेत. या घटनेनंतर पाकिस्तान सरकारवर दोषींना कठोर शिक्षा देण्यासाठी दबाव वाढत आहे.

शुक्रवारी घडलेल्या या धक्कादायक घटनेत कट्टरपंखी इस्लामी पार्टी तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तानच्या नाराज समर्थकांनी एका कपड्याच्या कारखान्यावर हल्ला चढवला. या कारखान्याचे महाप्रबंधक प्रितंता कुमारा दियावदना यांना अमानुषपणे लाथा-बुक्क्या आणि काठीने मारहाण करुन त्यांची हत्या केली. त्यानंतर त्यांचा मृतदेह रस्त्यावरच जाळून टाकण्यात आला. दियावदना हे श्रीलंकेतील कँडी शहरातील रहिवासी होती. ते मागील सात वर्षापासून लाहोरपासून जवळपास 100 किलोमीटर दूर सियालकोट जिल्ह्यातील राजको उद्योक कारखान्यात जनरल मॅनेजर म्हणून काम करत होते.

800 लोकांविरोधात एफआयआर दाखल

पंजाब प्रांताचे पोलीस महानिरीक्षक राव सरदार अली खान आणि पंजाब सरकारचे प्रवक्ते हसन खरवार यांनी शनिवारी लिंचिंग प्रकरणाचा एक प्राथमिक अहवाल माध्यमांसमोर सादर केला. खान यांनी सांगितलं की, पोलिसांनी आतापर्यंत लिंचिंग प्रकरणात सहभागी असलेल्या 118 लोकांना अटक केली आहे. त्यात 13 मुख्य संशयितांचा समावेश आहे. त्यांनी सांगितलं की 800 पेक्षा अधिक लोकांविरोधात दहशतवादाच्या आरोपाखाली एफआयआर दाखल केला आहे.

नेमकं काय घडलं ?

मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानमधील सियालकोट भागातील वझिराबाद रोडवर एका कंपनीमध्ये प्रियंता कुमारा यांच्यावर हल्ला करण्यात आला. ते या कंपनीत एक्सपोर्ट मॅनेजर म्हणून काम करत होते. तहरिक-ए- लब्बैक या कट्टरतावादी संघटनेचे एक पोस्टर फाडून ते कचरा कुंडीत टाकल्याचा आरोप कुमारा यांच्यावर आलाय. या पोस्टरवर कुरानमधील पवित्र वचने लिहिलेली होती. कुमारा यांना हे पोस्टर फाडताना कारखान्यातील काही लोकांनी पाहिले होते. याच कारणामुळे त्यांना जमावाने भर रस्त्यात अमानुषपणे मारहाण केली. तसेच नंतर रस्त्यावरच त्यांचे प्रेत जाळले.

उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश

दरम्यान, मुख्यमंत्री बुजदार यांनी या प्रकारणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी या हत्याकांडाची उच्च स्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पोलीस महासंचालकांकडून त्यांनी तपासाचा अहवाल मागितला आहे. अशाच प्रकारची घटना सियालकोट येते 2010 मध्ये घडली होती. यावेली दोन सख्या भावांचा पोलिसांसमोरच खून करण्यात आला होता.

इतर बातम्या :

राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव, लॉकडाऊन लागणार का? काय खबरदारी घ्यावी, टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती

दारुसाठी पैसे न दिल्याच्या रागातून एकाची हत्या, 12 तासांत आरोपींना बेड्या; वाहनांना लुटणारी टोळीही गजाआड

पहलगाम हल्ल्यानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक
पहलगाम हल्ल्यानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक.
पाकिस्तान सुधरेना! कुरघोड्या सुरूच, सलग पाचव्या दिवशी गोळीबार
पाकिस्तान सुधरेना! कुरघोड्या सुरूच, सलग पाचव्या दिवशी गोळीबार.
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं.
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी.