हायड्रॉक्सीक्लोरोक्विन आम्हालाही द्या, पाकिस्तानची भारतापुढे याचना

पाकिस्तानात कोरोना प्रचंड गतीने वाढत आहे. कोरोनामुळे दगावणाऱ्यांची टक्केवारीदेखील अधिक आहे. या भीषण परिस्थितीत पाकिस्तानला भारताकडून मदतीची आशा आहे (Pakistan PM request India).

हायड्रॉक्सीक्लोरोक्विन आम्हालाही द्या, पाकिस्तानची भारतापुढे याचना
Follow us
| Updated on: Apr 15, 2020 | 9:24 PM

लाहोर : कोरोनाचा सामना करण्यासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषध आम्हालाही द्या, अशी विनंती पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan PM request India) यांनी भारताकडे केली आहे. जगभरात थैमान घालणारा कोरोना पाकिस्तानातही फोफावत चालला आहे. पाकिस्तानात आतापर्यंत 6 हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 113 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे या महामारीला रोखण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतापुढे मदतीची याचना केली आहे (Pakistan PM request India).

पाकिस्तानात कोरोना प्रचंड गतीने वाढत आहे. कोरोनामुळे दगावणाऱ्यांची टक्केवारीदेखील अधिक आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात तर कोरोनामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पंजाबमध्ये 2,945 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 28 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सिंध प्रांतात 1,688 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या भागात कोरोनाबळींची संख्या 41 वर पोहोचली आहे. या भीषण परिस्थितीत पाकिस्तानला भारताकडून मदतची आशा आहे.

या औषधाबाबत पाकिस्तानासोबतच जगभरातील अनेक देशांना भारताकडे आशा आहे. यामध्ये इटली आणि ब्रिटनसारख्या बलाढ्य देशांचाही समावेश आहे. कोरोनाचं संकट लक्षात घेऊन भारताने सुरुवातीला या औषधाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. मात्र, भारताकडे आवश्यकतेपेक्षा अतिरिक्त साठा उपलब्ध असल्याने सरकारने यावरील बंदी उठवली आहे.

खरंतर कोरोनावर आतापर्यंत कोणतंही औषध किंवा लस निघालेली नाही. मात्र, कोरोनावर हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषधाचा सकारात्मक परिणाम पडत असल्याचं समोर आलं आहे. या औषधात इतर काही औषधं मिळवल्यास रुग्णावर आणखी चांगले परिणाम होतात, अशी माहिती एका संशोधनातून समोर आली आहे. त्यामुळे जगभरात अचानक हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषधाची मागणी वाढली आहे.

हायड्रॉक्सीक्लोरोक्विन काय आहे?

हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे मूळ मलेरियावरील औषध आहे. मलेरियाच्या रुग्णावर उपचार करण्यासाठी या गोळ्या दिल्या जातात. पण सध्या कोरोना व्हायरसवरील उपचारात हे औषध अत्यंत प्रभावी ठरत आहे. भारतात मोठया प्रमाणावर या औषधाची निर्मिती केली जाते. कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे अमेरिकेला तातडीने या औषधांची गरज आहे. मागच्या महिन्यात भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या औषधाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. मात्र, आता ही बंदी उठवली आहे.

संबंधित बातम्या :

भारतात वटवाघळामुळे कोरोना पसरला का? ICMR चे मराठमोळे संशोधक म्हणतात…..

देशात 1 कोटी हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या गोळ्यांची गरज, आपल्याकडे उपलब्ध… : केंद्रीय आरोग्य मंत्रालय

Maharashtra corona update | रुग्णांची संख्या 3 हजारांजवळ, कुठे किती कोरोना रुग्ण?

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.