Pakistani Army : प्रत्येक युद्धात हरले…मग छातीवर कुठले मेडल्स लावून फिरतात पाकिस्तानी सैन्याचे अधिकारी?
Pakistani Army Medals : तुम्ही पाकिस्तानी सैन्याच्या अधिकाऱ्यांना पाहिलं असेल. त्यांच्या सैन्य गणवेशावर तुम्हाला अनेक मेडल्स दिसतील. भारताबरोबर प्रत्येक युद्धात पाकिस्तानचा पराभव झाला. मग त्यांच्या अधिकाऱ्यांच्या युनिफॉर्मवर हे मेडल्स कुठून येतात हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तेच उत्तर जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.

पाकिस्तान भारतासोबत एकदा नाही, तर आतापर्यंत अनेक युद्ध लढला आहे. प्रत्येकवेळी रिझल्ट तोच असतो. पाकिस्तानला भारताकडून सणसणीत प्रत्युत्तर मिळतं. पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागतो. फक्त भारतच नाही, अन्य देशांसोबत पाकिस्तानी सैन्याचा सामना झाला, त्यावेळी सुद्धा त्यांचा पराभव झाला. पण जेव्हा, कधी तुम्ही पाकिस्तानी सैन्याचे अधिकारी पाहता, त्यावेळी त्यांच्या युनिफॉर्मवर तुम्हाला अनेक मेडल लटकवलेले दिसतात. मग, प्रश्न हा निर्माण होतो, की पाकिस्तानी सैन्याला नेहमी पराभवाचा सामना करावा लागतो. मग, त्यांचे जवान, अधिकारी छातीवर कुठले मेडल लावून फिरत असतात? पाकिस्तानी आर्मीच्या या मेडल्सची गोष्ट जाणून घेऊया.
पाकिस्तानने भारतासोबत आतापर्यंत चार युद्ध लढली आहेत. भारत-पाक युद्ध (1947-48), भारत-पाक युद्ध (1965), भारत-पाक युद्ध (1971) आणि करगिल युद्ध (1999) या चारही युद्धात पाकिस्तानचा पराभव झालाय. पाकिस्तानला सैन्य पराभवासह कूटनितीक स्तरावरही पराभवाचा सामना करावा लागला.
म्हणूनच पराभवानंतरही पाकिस्तानात अनेक सैनिकांना मेडल्स
प्रत्येक देशाची आर्मी आपल्या सैन्याच्या जवानांना त्यांची सेवा आणि शौर्य लक्षात घेऊन मेडल देते. युद्धातील सहभाग, शौर्य आणि विशेष ऑपरेशन्समधील योगदानासाठी मेडल दिलं जातं. म्हणूनच पराभवानंतरही पाकिस्तानात अनेक सैनिकांना मेडल्स देण्यात आले आहेत. फक्त युद्ध नाही, अंतर्गत ऑपरेशन्ससाठी सुद्धा मेडल दिलं जातं. प्रत्येक देशाच्या सैन्यासाठी मेडल्स एका परंपरेचा भाग आहे.
भारत अनेक वर्षांपासून एकही युद्ध लढलेला नाही. पण तरीही सैन्याकडून जवानांना पीस टाइमशी संबंधित मेडल्स दिले जातात. पाकिस्तानात सुद्धा असच होतं. पाकिस्तानी सैन्याने आपल्या सैनिकांना 1948, 1965, 1971 ची लढाई त्याशिवाय 1970 साली बलूचिस्तानमध्ये ऑपरेशन, सियाचीन वाद शिया इनसर्जेंसी,… अशा अंतर्गत मुद्यांसाठी मेडल्स दिले आहेत.
पाकिस्तानात किती प्रकारची मेडल्स दिली जातात?
निशान-ए-हैदर हा पाकिस्तानातील सर्वोच्च वीरता पुरस्कार आहे. फक्त पाकिस्तानी सशस्त्र बलाच्या सदस्यांना हा पुरस्कार मिळतो. त्याशिवाय हिलाल-ए-जुरात, सितारा-ए-जुरात, तमगा-ए-जुरात, इम्तियाजी सनद हे पुरस्कार सुद्धा दिले जातात.
नॉन ऑपरेशनल अवॉर्डमध्ये सितारा-ए-बिसालत, तमगा-ए-बिसालत, तमगा-ए-खिद्मत क्लास-1, तमगा-ए-खिद्मत क्लास-2, तमगा-ए-खिद्मत क्लास-3 हे मेडल्स आहेत.
सिविल मिलिट्री अवॉर्ड्समध्ये निशान-ए-इम्तियाज, हिलाल-ए-इम्तियाज, सितारा-ए-इम्तियाज, तमगा-ए-इम्तियाज, तमगा-ए-खिद्मत या मेडल्सचा समावेश होतो.