त्या मिसाईलनं तर दोन्ही देशांच्या लोकांचा जीव धोक्यात आणला, अपघातानं पाकिस्तानवर फायर झालेल्या मिसाईलवर पाकची पहिली प्रतिक्रिय
बुधवारी भारताकडून तांत्रिक बिघाडामुळे एक मिसाईल (Indian Missile) सुटले आणि पाकिस्तानचे धाबे दणाणले. पाकिस्तानने यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या मिसाईलने दोन्ही देशांच्या लोकांचे जीव धोक्यात आणल्याची प्रतिक्रिया पाकिस्तानच्या संरक्षण प्रवक्तत्याने दिली आहे.
नवी दिल्ली : जगात रशिया युक्रेन युद्ध (Russia ukraine war) पेटले असताना भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) संघर्षही पुन्हा चर्चेत आला आहे. कारण बुधवारी भारताकडून तांत्रिक बिघाडामुळे एक मिसाईल (Indian Missile) सुटले आणि पाकिस्तानचे धाबे दणाणले. पाकिस्तानने यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या मिसाईलने दोन्ही देशांच्या लोकांचे जीव धोक्यात आणल्याची प्रतिक्रिया पाकिस्तानच्या संरक्षण प्रवक्तत्याने दिली आहे. तर भारताने 9 मार्च रोजी नियमित देखभाल करताना, तांत्रिक बिघाडामुळे क्षेपणास्त्र अपघाती फायर झाल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. याबाबत हे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या एका भागात पडल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना अत्यंत खेदजनक असली तरी या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही ही देखील दिलासादायक बाब आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की सरकारने या घटनेवर “गांभीर्याने विचार केला आहे आणि उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत”. असे भारताच्या संरक्षण विभागाने सांगितले आहे.
भारताचे वेळीच स्पष्टीकरण
It is learnt that the missile landed in an area of Pakistan. While the incident is deeply regrettable, it is also a matter of relief that there has been no loss of life due to the accident: Ministry of Defence
— ANI (@ANI) March 11, 2022
पाकिस्तानचे भारतावर गंभीर आरोप
इस्लामाबादच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारताच्या ‘सुपर-सॉनिक फ्लाइंग ऑब्जेक्ट’द्वारे त्यांच्या हवाई क्षेत्राचे विनाकारण उल्लंघन” केल्याचा निषेध केल्यानंतर भारताने हे स्पष्टीकरण जारी केले आहे. तर भारताने अविवेकी पद्धतीने मिसाईल डागले आणि मालमत्तेचे नुकसान केले आणि पाकिस्तानी हवाई हद्दीतील नागरिकांचा जीव आणि विमाने धोक्यात आणली, असा आरोप पाकिस्तानने केला आहे. पाकिस्तानच्या संरक्षण तज्ज्ञांनी भारताकडून धोक्याची सूचना आधीच दिली होती असा आरोपही पाकिस्तानेने केला आहे. आतापर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्या तीनवेळा टोकाचा संघर्ष झाला आहेत. तर मागे केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचाही उल्लेख पाकिस्तानकडून करण्यात आला आहे.
पाकिस्तान काय म्हणाला ?
पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर-जनरल बाबर इफ्तिखार यांनी गुरुवारी संध्याकाळी उशिरा पत्रकार परिषदेत सांगितले की, एक “हाय-स्पीड फ्लाइंग ऑब्जेक्ट” पूर्वेकडील मियां चन्नू शहराजवळ क्रॅश झाला आणि नवी दिल्लीजवळील हरियाणा राज्यातील उत्तर भारतीय शहर सिरसा येथून हा फायर झाला.या मार्गामुळे भारतीय आणि पाकिस्तानी हवाई क्षेत्रात अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणे तसेच मानवी जीवन आणि संपत्ती धोक्यात आली. असे म्हणत पाकिस्तानने नेहमीप्रमाणे कंगावा करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र भारताने वेळीच स्पष्टीकरण दिल्याने पाकिस्तानच्या या कंगाव्याची कुणी गाभीर्याने दखल घेईल असे वाटत नाही.
पेटीएम पेमेंट्स बँक RBI च्या रडारवर! नवीन ग्राहक नोंदणीला बंदी; अर्थजगतात खळबळ
5 पैकी 4 राज्यात मोदींची हवा! आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विजयी रॅली गुजरातमध्ये