Pulwama Attack : पाकची 9 तासांनंतर प्रतिक्रिया, इम्रान खान अजूनही चिडीचूप

नवी दिल्ली : पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या नऊ तासांनंतर पाकिस्तानने प्रतिक्रिया दिली. ही घटना अत्यंत गंभीर असून हा चिंतेचा विषय असल्याचं पाकिस्तानने म्हटलं आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही प्रतिक्रिया दिली. मात्र, एरव्ही उठल्या-सुटल्या जगभरातील बहुतांश घटनांवर प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून अद्याप कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. ट्विटरवर नेहेमी प्रत्येक विषयावर आपलं मत मांडणाऱ्या […]

Pulwama Attack : पाकची 9 तासांनंतर प्रतिक्रिया, इम्रान खान अजूनही चिडीचूप
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:27 PM

नवी दिल्ली : पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या नऊ तासांनंतर पाकिस्तानने प्रतिक्रिया दिली. ही घटना अत्यंत गंभीर असून हा चिंतेचा विषय असल्याचं पाकिस्तानने म्हटलं आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही प्रतिक्रिया दिली. मात्र, एरव्ही उठल्या-सुटल्या जगभरातील बहुतांश घटनांवर प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून अद्याप कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.

ट्विटरवर नेहेमी प्रत्येक विषयावर आपलं मत मांडणाऱ्या इम्रान खान यांनी भारतीय जवानांवर झालेल्या या भ्याड हल्ल्याबाबत मात्र एकही प्रतिक्रिया दिलेली नाही. गेल्या वर्षी पंतप्रधान झाल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून ते वारंवार भारताला फुकटचे सल्ले देत असत, मात्र पाकिस्तानची दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी घेतल्यानंतर इम्रान खान यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.

पाकिस्तानकडून आलेल्या प्रतिक्रियेत म्हटले की, “जगातील कुठल्याही कोपऱ्यात झालेल्या हिंसंक कारवाईचा पाकिस्तानने निषेधच केला आहे. कुठलाही तपास न करता भारतीय मीडिया आणि सरकारने हल्ल्याचा संबंध सरळ पाकिस्तानशी जोडला, हा आरोप आम्ही नाकारतो.”

दुसरीकडे, पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा सर्वत्र निषेध होतो आहे. पाकिस्तानवरही टीका केली जात आहे. पाकिस्तानने दहशतवाद्यांचे समर्थन करणे थांबवावे. तसेच, त्यांच्या देशातून या कारवाया पार पाडणाऱ्या दहशतवाद्यांचा आता खात्मा करावा अशी मागणी जगभरातून होत आहे.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी सीआरपीएफच्या ताफ्यावर मोठा दहशतवादी हल्ला झाला. या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे 42 जवान शहीद झाले. उरीमध्ये सप्टेंबर 2016 मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर हा आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. जैश-ए-मोहम्मद संघटनेशी संबंधित दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ ​​वकासनं सुसाईड बॉमर बनून हा भ्याड हल्ला केला.

उरी हल्ल्यानंतर सर्वात मोठा हल्ला

उरीमध्ये (Uri Attack) सप्टेंबर 2016 मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर हा आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. गुरुवारी श्रीनगर-जम्मू हायवेवर अवंतीपोरा भागात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हा हल्ला केला. हल्ल्यानंतर दक्षिण काश्मीरमधील अनेक भागांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या : 

Pulwama Attack : पाकची 9 तासांनंतर प्रतिक्रिया, इम्रान खान अजूनही चिडीचुप

Pulwama Attack : पुलवामा हल्ल्याचा जगभरातून तीव्र निषेध

Pulwama Attack : पुलवामात दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला

पाकिस्तानविरोधात एकत्र या, भारताचं जगाला जाहीर आवाहन

Pulwama Attack : हल्ला झालेल्या बसमधील जवानांच्या नावाची यादी

पुलवामा हल्ला हा मुस्लीमविरोधी राजकारणाचा परिपाक : जितेंद्र आव्हाड

गेल्या पाच वर्षातले आतापर्यंतचे मोठे दहशतवादी हल्ले

पुलवामा हल्ला : भारत पुन्हा एकदा घरात घुसून मारणार?

Pulwama attack : शहिदांचा आकडा 44 वर पोहोचला

आमच्या शहिदांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही : पंतप्रधान मोदी

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.