पाकिस्तानच्या फरार दहशतवाद्यावर अमेरिकेकडून 21 कोटींचं इनाम, अफगाणिस्तानात असा झाला शेवट

अमेरिकेने 30 लाख डॉलरचं बक्षीस लावलेला मंगल बाग हा दहशतवादी अफगाणिस्तानात बॉम्बस्फोटात मारला गेला आहे. ( Pakistan Mangal Bagh Afghanistan )

पाकिस्तानच्या फरार दहशतवाद्यावर अमेरिकेकडून 21 कोटींचं इनाम, अफगाणिस्तानात असा झाला शेवट
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Jan 29, 2021 | 10:30 AM

पेशावर: पाकिस्तानातून फरार झालेला दहशतवादी मंगल बाग अफगाणिस्तानात एका बॉम्बस्फोटात मारला गेला आहे. अमेरिकेसाठी मंगल बाग हा मोस्ट वाँटेड दहशतवादी होता. मंगल बागवर अमेरिकेने 30 लाख अमेरिकन डॉलर म्हणजेच 21 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केले होते. अफगाणिस्तानातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं माध्यमांतील वृत्तांच्या आधारानं ही बातमी दिली आहे.(Pakistans top fugitive terrorist commander Mangal Bagh died in bomb blast at roadside in Afghanistan)

बंदी घालण्यात आलेल्या लष्कर-ए- इस्लाम या आतकंवादी संघटनेचा अशी मंगल बागची ओळख होती. तो अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होता. एक्सप्रेस ट्रिब्यूननं दिलेल्या वृत्तानुसार अफगाणिस्तानातील नांगरहार प्रांताचे गवर्नर जियाउलहक अमरखिल यांनी मंगल बागच्या मृत्यूची बातमी दिली. नांरहारमधील आकिन जिल्ह्यातील बंदर दारा भागात एका रस्त्यांच्या बाजूला झालेल्या अपघातात मंगल बागचा त्याच्या दोन साथीदारांसह मृत्यू झाला आहे.

मंगल बाग दहशतवादाकडे वळण्यापूर्वी ट्रकवर क्लीनर म्हणून काम करायचा. मंगल बाग त्यानंतर प्रतिबंधित तहरीक-ए-तालिबाल पाकिस्तान या दहशतवादी संघटनेशी जोडला गेला होता. तो पाकिस्तानातील खैबर जिल्ह्यातील रहिवासी होता. पाकिस्तानी सैन्यानं सर्च ऑपरेशन सुरु केल्यानंतर मंगल बाग फरार झाला होता. तो गेल्या काही वर्षांपासून अफगाणिस्तानात राहत होता.

मंगल बागची दहशतवादी संघटना खैबरमधील बारा तालुक्यामध्ये 2008 पर्यंत कार्यरत होती. पाकिस्तान सरकारनं त्याच्यावर 20 लाखांचं बक्षीस जाहीर केले होतं. खैबरमध्ये मंगल बाग स्वत: न्यायालय चालवतं असे. 2006 पासून तो लष्कर-ए-इस्लाम या संघटनेचे नेतृत्व करत होता. तो पाकिस्तान आणि अफगाणिस्तानाच्या काही भागात कार्यरत होता. अंमली पदार्थांची तस्करी, खंडणी, अपहरण याद्वारे त्याची संघटना पैसा कमवतं होती.

अफगाणिस्तानात दहशतवादी हल्ले सुरुच

अफगाणिस्तानातील काबूल शहरातील पीडी 7 मधील दोघाबाद येथे 22 डिसेंबरला सकाळी 7.33 वाजता दहशतवाद्यांनी आत्मघातकी बॉम्बस्फोट झाला होता . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुल-ए-चकरी कारागृहात काम करणाऱ्या डॉक्टरांच्या वाहनाला बॉम्बद्वारे उडवण्यात आले. इस्तकबाल रुग्णालयाने या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता.

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये 20 डिसेंबरला दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला. अतिरेक्यांनी यावेळी खासदार हाजी खान मोहम्मद वरदक यांच्या कारवर निशाणा साधला. या हल्ल्यात खासदार वरदक गंभीर जखमी झाले होते. यामध्ये 15 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. काबूल शहरातील पीडी 5 क्षेत्रातील स्पिन ब्लॅक चौकात ही दुर्घटना घडली आहे.

संबंधित बातम्या:

अफगाणिस्तानात दहशतवादी हल्ले सुरुच, बॉम्बस्फोटात डॉक्टरांसह 5 जण ठार

काबूलमध्ये दहशतवादी हल्ला, तीन महिन्यात 37 आत्मघातकी हल्ले, अफगाणिस्तान का धुमसतंय?

(Pakistans top fugitive terrorist commander Mangal Bagh died in bomb blast at roadside in Afghanistan

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.