AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या देशाच्या पंतप्रधानांनी जपली भारतीय संस्कृृती, मोदींच्या स्वागतासाठी जे केलं त्या गोष्टीने वेधलं जगाचं लक्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रत्येक परदेश दौरा हा खास राहिला आहे. या यादीत आणखी एका देशाचा समावेश झाला आहे. पहिल्यांदाच कोणते भारतीय पंतप्रधान या देशाच्या दौऱ्यावर गेले आहेत.

या देशाच्या पंतप्रधानांनी जपली भारतीय संस्कृृती, मोदींच्या स्वागतासाठी जे केलं त्या गोष्टीने वेधलं जगाचं लक्ष
Follow us
| Updated on: May 21, 2023 | 10:57 PM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रत्येक परदेश दौरा वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत असतो. पंतप्रधान मोदी रविवारी पापुआ न्यू गिनी येथे पोहोचताच त्यांना एक वेगळा अनुभव आला. पोर्ट मोरेस्बी विमानतळावर हा दुर्मिळ क्षण जगाने पाहिला. कारण पहिल्यांदाच असं काहीतरी घडलं. पीएनजीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी विमानतळावर पंतप्रधान मोदींचं स्वागत तर केलंच पण सोबत त्यांना मोदींच्या पायाला स्पर्श करत त्यांचे आशीर्वाद ही घेतले.

पंतप्रधान मोदी ज्या देशात जातात तेथे त्यांचं जोरदार स्वागत होतं. त्या देशात राहणारे भारतीय देखील मोठ्या संख्येने उपस्थित असतात. मोदींचा प्रत्येक परदेश दौरा हा आतापर्यंत खास राहिला आहे. पंतप्रधान मोदी हे जगातील सर्वात प्रभावी नेते आहेत. त्यांचा करिष्मा अजूनही कायम आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन होताच त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आला. पंतप्रधान मोदी हे पहिल्यांदा पीएनजीच्या दौऱ्यावर गेले आहेत. पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधानांनी इंडो-पॅसिफिक देशाचा केलेला हा पहिला दौरा आहे. महत्त्वाचं म्हणजे पापुआ न्यू गिनी सूर्यास्तानंतर येणाऱ्या कोणत्याही नेत्याचे औपचारिक स्वागत करत नाही. परंतु पंतप्रधान मोदींसाठी हा अपवाद ठरला. त्यांना मोदींचे जोरदार स्वागत केले.

FIPIC शिखर परिषदेत 14 देशांचे नेते सहभागी होणार आहेत. कनेक्टिव्हिटी आणि इतर समस्यांमुळे हे देश एकत्र येणार आहेत. 2014 मध्ये PM मोदींच्या फिजी दौऱ्यादरम्यान FIPIC लाँच करण्यात आले होते. FIPIC गुंतवणुकीव्यतिरिक्त, PM मोदी पापुआ न्यू गिनीचे गव्हर्नर-जनरल सर बॉब डाडे, पंतप्रधान मारापे आणि शिखर परिषदेत सहभागी होणार्‍या काही PIC नेत्यांशी देखील द्विपक्षीय संवाद साधतील.

पापुआ न्यू गिनी दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्या निमंत्रणामुळे सिडनीला देखील जाणार आहेत.रविवारी पंतप्रधान मोदी जपान दौरा संपवून पापुआ न्यू गिनीला रवाना झाले.

पंतप्रधान मोदी 19 ते 24 मे दरम्यान या तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. जपान, पापुआ न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलिया नंतर पंतप्रधान मोदी देशात परतणार आहेत. या पण या दरम्यान अनेक महत्त्वाचे करारांवर चर्चा होणार आहे.

कांदा उत्पादनाला अवकाळीचा फटका; शेतकऱ्यांवर आर्थिक संकट
कांदा उत्पादनाला अवकाळीचा फटका; शेतकऱ्यांवर आर्थिक संकट.
हिंदीची सक्ती नाही, मग तसा जीआर काढा; सुभाष देसाई यांची मागणी
हिंदीची सक्ती नाही, मग तसा जीआर काढा; सुभाष देसाई यांची मागणी.
पाकिस्तानचे 35 ते 40 सैनिक, अधिकारी मारले; लेफ्टनंट जनरल घईंची माहिती
पाकिस्तानचे 35 ते 40 सैनिक, अधिकारी मारले; लेफ्टनंट जनरल घईंची माहिती.
पाकिस्तानी ऑफिशियल भिखमंगे; ओवेसींनी पुन्हा पाकिस्तानची लक्तरं काढली
पाकिस्तानी ऑफिशियल भिखमंगे; ओवेसींनी पुन्हा पाकिस्तानची लक्तरं काढली.
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.