Covid-19 Vaccine | फायझर लशीला परवानगी मिळणार? कोरोना लस पूर्णपणे सुरक्षित, अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाचा अहवाल
फायझर-बायोएनटेक कोव्हिड-19 लशीच्या चाचणीत सहभागी होणाऱ्या 38 हजार लोकांच्या डेटा विश्लेषणानुसार, या लशीच्या सुरक्षेबाबत कुठल्याही प्रकारची संशा नाही.
वॉशिंग्टन : औषध निर्माता कंपनी फायझर (Pfizer) आणि बायोएनटेकच्या (BioNTech) प्रायोगिक (Pfizer-BioNTech Covid-19 Vaccine Is Completely Safe) कोव्हिड-19 च्या इमरजेन्सी वापराची परवानगी मिळावी यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने (US Food And Drug Administration) मंगळवारी एक परिपत्रक जारी करत सांगितलं की फायझर-बायोएनटेक कोव्हिड-19 लस हा पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावशाली आहे. ही लस इमरजेन्सी वापरासाठी तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं (Pfizer-BioNTech Covid-19 Vaccine Is Completely Safe).
एफडीएने परिपत्रकात काय सांगितलं?
“फायझर-बायोएनटेक कोव्हिड-19 लशीच्या चाचणीत सहभागी होणाऱ्या 38 हजार लोकांच्या डेटा विश्लेषणानुसार, या लशीच्या सुरक्षेबाबत कुठल्याही प्रकारची संशा नाही. ही लस 95 टक्के प्रभावी आहे आणि प्रत्येक वयोगटातील आणि गंभीर स्थिती असलेल्या रुग्णांवर प्रभावीपणे कार्य करते.”
कोव्हिड-19 च्या इमरजेन्सी उपयोग प्राधिकरणाच्या विनंतीवर चर्चा करण्याच्या दोन दिवसांपूर्वी एफडीएच्या विशेषज्ज्ञांच्या समुहाने या लशीचा अहवाल दिला. फायझर आमि बायोएनटेकने 20 नोव्हेंबरला युएस एफडीएने आपल्या अन्वेषक कोव्हिड-19 लशीच्या इमरजेन्सी वापरासाठी परवानगीची मागणी केली आहे (Pfizer-BioNTech Covid-19 Vaccine Is Completely Safe).
ब्रिटनमध्ये लसीकरणाला सुरुवात
दुसरीकडे, ब्रिटनने आधीच इमरजेन्सी वापरासाठी लशीला मंजुरी दिली आहे. मार्गरेट किनन नावाच्या एका 90 वर्षीय महिलेला मंगळवारी पहिली लस टोचण्यात आली. लसीकरण कार्यक्रमात फायझर-बायोएनटेकची कोव्हिड-19 ही लस घेणारी ते जगातील पहिली व्यक्ती ठरली.
कोरोना लशीच्या नोंदणीसाठी ‘हे’ अॅप लोकांना मदत करणार, आरोग्य मंत्रालयाची माहितीhttps://t.co/7ADHctUvfI#CoronaVirus #CoronaVaccine
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 9, 2020
Pfizer-BioNTech Covid-19 Vaccine Is Completely Safe
संबंधित बातमम्या :
लस प्रभावी आहे हे कसं समजतं? भारतासाठी कोणती लस चांगली?
कोव्हॅक्सिनसाठी भारत बायोटेकची गुंतवणूक किती? जाणून घ्या सर्व माहिती
केंद्र सरकारचा कोरोना लसीचा मेगा प्लॅन तयार, पहिल्या टप्प्यात 30 कोटी नागरिकांना लस?