AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेत आजपासून नागरिकांना मिळणार फायझर लस, पहिल्या फेरीत 30 लाख डोस

लशीच्या 30 लाख डोसेजची पहिली खेप या आठवड्याच्या अखेरपर्यंत सगळ्या राज्यांना पाठवण्यात येणार असल्याचंही यावेळी त्यांनी म्हटलं.

अमेरिकेत आजपासून नागरिकांना मिळणार फायझर लस, पहिल्या फेरीत 30 लाख डोस
Follow us
| Updated on: Dec 14, 2020 | 7:18 AM

वॉशिंग्टन : अमेरिकेत (United States) फायझर लसीच्या (Pfizer vaccine) तातडीच्या वापरासाठी परवानगी मिळाल्यानंतर आजपासून नागरिकांना ही लस मिळण्यास सुरुवात होणार आहे. कोरोना (Corona) लशीच्या पुरवठ्याचं काम पाहत असलेल्या गुस्ताव पर्ना यांनी याबाबत अधिक माहिती दिली. लशीच्या 30 लाख डोसेजची पहिली खेप या आठवड्याच्या अखेरपर्यंत सगळ्या राज्यांना पाठवण्यात येणार असल्याचंही यावेळी त्यांनी म्हटलं. (Pfizer vaccine available to citizens in the United States from today 30 million doses in the first round)

फायझर कंपनीची कोरोना व्हायरसवरची लस 95 टक्के प्रभावी असल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे कोरोनाचा धोका टाळण्यासाठी अमेरिकेच्या अन्न, औषध प्रशासन विभागाने ही लस सुरक्षित असल्याचं मान्य केलं आहे. खरंतर, मागील गुरुवारीच, अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफडीए) सल्लागार पॅनेलवरील फायझर-बायोनोटेकच्या सल्लागार एक्सपर्ट पॅनेलने यावर बैठक घेत हा महत्त्वाचा निर्णय दिला होका. अमेरिकामध्ये सतत वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या घटना रोखण्यासाठी लसीचा तातडीने ​वापराला परवानगी देण्यात आली.

अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने फायझर-बायोटेक कोविड -19 या लसीच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिल्यामुळे कोरोनाने त्रस्त रुग्णांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या निर्णयासाठी घेण्यात आलेल्या एफडीए पॅनेलमध्ये लस सल्लागार, वैज्ञानिक, संसर्गजन्य रोग डॉक्टर आणि तज्ञांचा समावेश होता. न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, ही लस 16 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांवर आपत्कालीन परिस्थिती वापरावी असं या पॅनलमध्ये ठरवण्यात आलं आहे.

अमेरिकेत मागच्या आठवड्यामध्ये बुधवारी कोरोनामुळे तीन हजारांहून अधिक मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे आता लस मंजूर झाल्यानंतर, देशातील कोरोना परिस्थिती नियंत्रित येते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. गुरुवारी आठ तासाच्या महत्त्वाच्या बैठकीत एफडीए पॅनेलच्या सदस्यांनी फायझर लसीच्या वापराला पाठिंबा दिला. त्यामुळे ब्रिटन, कॅनडानंतर तात्काळ अमेरिकेतही या लसीच्या वापरास परवानगी देण्यात आली आणि आज या लसीचे डोस नागरिकांना देण्यात येणार आहे. (Pfizer vaccine available to citizens in the United States from today 30 million doses in the first round)

इतर बातम्या –

मोठी बातमी ! कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशात जानेवारीपासून लसीकरण?, आदर पुनावाला यांचे संकेत

कोरोना विषाणू फुफ्फुसांना कसा पोखरतो? वैज्ञानिकांना महत्त्वपूर्ण माहिती मिळाली

(Pfizer vaccine available to citizens in the United States from today 30 million doses in the first round)

5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला.
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री.
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं.
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी.
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले.
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.
पाकिस्तानच्या 12 शहरांमध्ये भारताकडून 50 ड्रोन हल्ले
पाकिस्तानच्या 12 शहरांमध्ये भारताकडून 50 ड्रोन हल्ले.