Narendra Modi: रशिया-युक्रेन युद्धात कोणीच जिंकणार नाही; संवादातूनच तोडगा निघणार, मोदींचे रशियाला आवाहन
नवी दिल्लीः युरोप दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जर्मनीत (German) भाषण करताना त्यांनी रशिया-युक्रेन युद्धाबाबत (Russia-Ukraine War) मोठे वक्तव्य केले. याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, या युद्धात कोणीही जिंकणार नाही, मात्र यावर उपाय काढायचा असेल तर संवादातूनच युद्धावर तोडगा निघणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी हे ही सांगितले की, या युद्धात […]
नवी दिल्लीः युरोप दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जर्मनीत (German) भाषण करताना त्यांनी रशिया-युक्रेन युद्धाबाबत (Russia-Ukraine War) मोठे वक्तव्य केले. याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, या युद्धात कोणीही जिंकणार नाही, मात्र यावर उपाय काढायचा असेल तर संवादातूनच युद्धावर तोडगा निघणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी हे ही सांगितले की, या युद्धात कोणाचाही पक्ष जिंकणार नाही, असा आमचा विश्वास आहे, त्यामुळे आम्ही शांततेच्या बाजूने राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. रशिया-युक्रेन युद्धासंदर्भात मी याआधीही युद्धबंदीचे आवाहन केले होते.
My remarks after talks with Chancellor @OlafScholz. https://t.co/fs0L2E2bFa
— Narendra Modi (@narendramodi) May 2, 2022
यावेळी रशिया-युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर भारताकडून युक्रेनला मानवतावादीदृष्टीकोनातून आम्ही मदत पाठवल्याचेही सांगितले. तसेच आमच्या मित्र राष्ट्रांनाही आम्ही मदतीसाठी त्यांना आवाहन केले आहे. जगाची शांतता आणि स्थिरता नाजूक आहे. जगात तेलाच्या किंमती गगनाला भिडत आहेत. युद्धामुळे सर्वांनाच त्रास होत असून हे युद्ध लवकरात लवकर संपवण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, जगात अन्नधान्य आणि खतांचा तुटवडा आहे, यामुळे जगातील प्रत्येक कुटुंबावर आर्थिक ताण पडत आहे, परंतु विकसनशील आणि गरीब देशांवर त्याचा गंभीर परिणाम होत आहे.
काही वर्षांत उल्लेखनीय प्रगती
लोकशाही म्हणून भारत आणि जर्मनीमध्ये अनेक समान मूल्ये आहेत. या सामायिक मूल्ये आणि समान हितसंबंधांवर आधारित, आमच्या द्विपक्षीय संबंधांनी गेल्या काही वर्षांत उल्लेखनीय प्रगती केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की दोन्ही देशांदरम्यान अनेक महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
भारत जागतिक पातळीवर आधारस्तंभ
कोविड नंतरच्या काळात, इतर मोठ्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारताची सर्वात वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की, भारत जागतिक पातळीवर एक महत्त्वाचा आधारस्तंभ बनणार आहे. अलीकडेच आम्ही UAE आणि ऑस्ट्रेलियासोबत फार कमी कालावधीत व्यापार करार केले आहेत.
…तेव्हापासून जगात महत्त्वाचे बदल
यावेळी त्यांनी सांगितले की, शेवटची आयजीसी 2019 मध्ये झाली होती, तेव्हापासून जगात महत्त्वाचे बदल झाले असून कोरोनाच्या महामारीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर विध्वंसक परिणाम झाला आहे.तसेच यावेळी त्यांनी हवामान क्षेत्रात केलेल्या मदतीबद्दल जर्मनीचे आभार मानले.
व्लादिमीर पुतीन यांना आवाहन
जर्मनच्या ओलाफ यांनी रशिया-युक्रेन युद्ध लवकर संपवण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी व्लादिमीर पुतीन यांना आवाहन केले की, हे युद्ध लवकर संपवा व युक्रेननही त्यांचे सैनिक मागे घ्यावी अशी विनंती केली. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाला दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. या युद्धात दोन्ही देशांचे मोठे नुकसान झाले आहे. युक्रेनपेक्षा रशियाचे कमी नुकसान झाले आहे ही दुसरी बाब आहे. रशिया सुरुवातीपासूनच युक्रेनवर हल्ले करत आहे. या दिवसांच्या युद्धात रशियाने युक्रेनमधील अनेक शहरे उद्ध्वस्त केली आहेत. लाखो लोक युक्रेन सोडून गेले असल्याचेही त्यांनी सांगितले.