नरेंद्र मोदींनी डेन्मार्कमधील भारतीयांकडून एक वचन घेतले आहे, आणि त्यांनी ते वचन एकाच सुरात दिलेही…
मी पहिल्यांदाच डेन्मार्कला आलो आहे. मी तुमच्याकडून काय मागू शकतो, असं बोलत त्यांनी तेथील जनतेशी थेट संवाद साधत त्यांना ते म्हणाले मी काही मागितले तर ते तुम्ही मला देणार ना. त्यावेळी तेथील नागरिकांकडून त्यांच्या या हाकेला साथ देत उपस्थितांनी एकाच आवाजात हो म्हणाले.
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डेन्मार्कमध्ये भारतीय नागरिकांना (Indian nationals in Denmark) संबोधित करताना त्यांच्याकडून वचन घेतना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) म्हणाले की, दरवर्षी तुम्ही 5 परदेशी मित्रांना भेटायला पाठवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी डेन्मार्कमधील कोपनहेगन येथे भारतीय वंशाच्या नागरिकांना संबोधित केले. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि डेन्मार्कमधील ऐतिहासिक द्विपक्षीय संबंध तसेच दोन्ही देशातील वाढत्या संबंधांबाबत चर्चा केली.
Grateful to the Indian community in Denmark for their warm reception. Addressing a programme in Copenhagen. https://t.co/PCjwh3ZM9p
— Narendra Modi (@narendramodi) May 3, 2022
तसेच सहभाग आणि त्याच्या शक्यतांबद्दल त्यांनी यावेळी त्यांच्याशी चर्चा केली. भारतीय वंशाच्या लोकांना संबोधित करताना, मोदींनी भारताच्या वैशिष्ट्यांबद्दल तेथील नागरिकांना माहिती दिली. यावेळी त्यांनी भारतीय वंशाच्या लोकांना एक टास्कही दिला होता.
नरेंद्र मोदींच्या हाकेला साथ
भारतीयांना संबोधित करताना त्यांनी सांगितले की, आज देश स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त भारत अमृत महोत्सव साजरा करत आहे. ते म्हणाले की, मी पहिल्यांदाच डेन्मार्कला आलो आहे. मी तुमच्याकडून काय मागू शकतो, असं बोलत त्यांनी तेथील जनतेशी थेट संवाद साधत त्यांना ते म्हणाले मी काही मागितले तर ते तुम्ही मला देणार ना. त्यावेळी तेथील नागरिकांकडून त्यांच्या या हाकेला साथ देत उपस्थितांनी एकाच आवाजात हो म्हणाले. त्यावेळी नरेंद्र मोदी त्यांना म्हणाले की, तुमच्यापैकी अनेक जणांचे परदेशी मित्र असतील तर आजपासून एक संकल्प करा की, आपल्या मित्रांपैकी पाच परदेशी मित्रांना तुम्ही भारत पाहण्यासाठी पाठवा.
तुम्ही देशाचे लाखो राष्ट्रदूत
यावेळी नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, आपण आपल्या परदेशी मित्रांना भारतातील वेगवेगळ्या राज्यांबद्दल माहिती सांगून त्यांना ती ठिकाणे बघण्यासाठी प्रेरणा द्या. हे काम कोणताही राजदूत करु शकणार नाही मात्र तुमच्यासारखे लाखो राष्ट्रदूत ही गोष्ट सहज करु शकतात. तेथील भारतीयांशी संवाद साधताना आपल्या पंतप्रधानांनी उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत सगळ्या भारतातील प्रदेशांची, प्रादेशिक सौंदर्याची विशेष गोष्टी सांगितल्या.
भारताला गौरवशाली इतिहास
या दौऱ्यावेळी नरेंद्र मोदी यांनी भारताचा गौरवशाली भूतकाळही सांगितला, भारताच्या गौरवशाली भूतकाळाची चर्चा करताना सांगितले की, पूर्वी भारत बघण्यासाठी लोक चालत चालत भारतात येत होते. यावेळी त्यांनी चलो इंडिया हा नारा देऊन पुढे सांगितले की, जर आपण एका एका भारतीयाने पाच पाच परदेशी लोकांना जर भारतात पाठवला तर जगात एकाच डेस्टिनेशन असेल ते म्हणजे चलो इंडिया.