मॉरीशसमध्ये नरेंद्र मोदींकडून वृक्षरोपण, आईच्या नावाने लावले रोप
भारताचा प्रभाव जगभरात वाढत आहे. 'एक पेड़ मां के नाम' असा उपक्रम मोदींनी सुरु केला आहे. त्यात जगभरातील 136 देशांमध्ये एकूण 27,500 पेक्षा जास्त झाडे लावण्यात आली आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: दोन देशांमध्ये वृक्षारोपण केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या मॉरिशस दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी मॉरिशस येथील सर शिवसागर रामगुलाम बोटॅनिकल गार्डनमध्ये ‘एक झाड आईच्या नावावर’ लावले. गयाना दौऱ्यातही त्यांनी असाच पुढाकार घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे या उपक्रमानंतर भारतात 1 अब्जाहून अधिक झाडे लावण्यात आली आहेत.
भारताचा प्रभाव जगभरात वाढत आहे. ‘एक पेड़ मां के नाम’ असा उपक्रम मोदींनी सुरु केला आहे. त्यात जगभरातील 136 देशांमध्ये एकूण 27,500 पेक्षा जास्त झाडे लावण्यात आली आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: दोन देशांमध्ये वृक्षारोपण केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मॉरिशसचा सर्वोच्च पुरस्कार ‘द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार एंड ऑफ द इंडियन ओशन’ जाहीर झाला आहे. असा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच भारतीय आहे.
12 मार्च रोजी मॉरीशसचा राष्ट्रीय दिवस आहे. पीएम नरेंद्र मोदी या राष्ट्रीय दिवसाच्या समारंभात सहभागी होणार आहे. मॉरीशस भारताचा मित्र आणि शेजारी देश आहे. मॉरीशसची लोकसंख्ता 1.2 मिलियन आहे, त्यातील 70% भारतीय वंशाचे आहेत. ब्रिटीशांची सत्ता येण्यापूर्वी मॉरिशस हा फ्रेंच वसाहतीचा देश होता. जवळजवळ एक शतक फ्रेंच राजवटीत (1700 च्या दशकात), भारतीयांना प्रथम कारागीर आणि गवंडी म्हणून काम करण्यासाठी पुडुचेरी प्रदेशातून मॉरिशसमध्ये आणले गेले होते.
ब्रिटिशांची राजवट 1834 आणि 1900 च्या सुरुवातीच्या काळात सुमारे अर्धा दशलक्ष भारतीय कामगार मॉरिशसमध्ये आले. यातील सुमारे दोन तृतीयांश कामगार मॉरिशसमध्ये स्थायिक झाले आहेत. मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाचाही भारताशी एक मनोरंजक संबंध आहे. 1901 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतताना महात्मा गांधी मॉरिशसमध्ये काही काळ राहिले. त्यांनी भारतीय कामगारांना तीन परिवर्तनात्मक संदेश दिले. शिक्षणाचे महत्त्व, राजकीय सशक्तीकरण आणि भारताशी जोडलेले राहणे. यामुळे गांधींजींना श्रद्धांजली म्हणून मॉरीशस 12 मार्च राष्ट्रीय दिवस साजरा करतो. या दिवशी महत्वा गांधी यांनी दांडी यात्राही काढली होती.