विश्वास बसणार नाही, पण अलास्कातील ‘या’ शहरात आता थेट 2021 मध्ये सूर्योदय होणार

अलास्कामधील एका शहरात आता पुढचा सूर्योदय थेट 2021 मध्येच होणार आहे. दररोज सूर्योदय आणि सूर्यास्त बघायची सवय असणाऱ्या तुम्हाला हे वाचून नक्कीच लगेच विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे.

विश्वास बसणार नाही, पण अलास्कातील 'या' शहरात आता थेट 2021 मध्ये सूर्योदय होणार
Follow us
| Updated on: Nov 20, 2020 | 11:50 PM

जुनो : अलास्कामधील एका शहरात आता पुढचा सूर्योदय थेट 2021 मध्येच होणार आहे. दररोज सूर्योदय आणि सूर्यास्त बघायची सवय असणाऱ्या तुम्हाला हे वाचून नक्कीच लगेच विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. अलास्कातील Utqiagvik नावाच्या शहरात तब्बल 66 दिवसांनी सूर्योदय होणार आहे. या शहरातील या वर्षीचा शेवटचा सूर्यास्त 18 ऑक्टोबर रोजी झालाय. अनेक लोकांनी या वर्षीच्या शेवटच्या सूर्यास्ताचा व्हिडीओ आणि फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत (Polar night Alaska city Utqiagvi will see sunrise after 66 days photos and videos).

दरवर्षी होणाऱ्या या बदलाला ‘पोलर नाईट’ असं म्हणतात. या भागात 23 जानेवारी 2021 पर्यंत सूर्योदय होणार नाही. मात्र, त्याचा अर्थ असाही नाही की त्या काळात फक्त अंधारच राहिल. या ठिकाणी दिवसातून काही तास प्रकाश असेल, फक्त आकाशात सूर्य तळपताना अथवा चमकताना दिसणार नाही.

इंस्टाग्रामवर kirsten_alburg यांनी सूर्यास्ताचा एक छोटासा व्हिडीओ शेअर केलाय. यात त्यांनी म्हटलं आहे की हा Utqiagvik मधील वर्ष 2020 चा शेवटचा सूर्यास्त आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी हा क्षण पाहताना डोळे ओले झाल्याचंही म्हटलं.

शाळेच्या दिवसांमध्ये अनेकांनी वाचलं असेल की पृथ्वी आपल्या अॅक्सिसवर तिरकी उभी आहे. त्यामुळे पृथ्वीची दोन्ही ध्रुव (पोल्स) म्हणजेच उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवावर सूर्याचा प्रकाश एकाचवेळी पडत नाही. यामुळेच उत्तर ध्रुवातील या भागात 6 महिने दिवस असेल, तर दक्षिण ध्रुवावर त्या काळात रात्र असते.

उत्तर ध्रुवाला आर्कटिक सर्कल म्हणतात. दुसरीकडे दक्षिण ध्रुवाला अंटार्कटिक सर्कल म्हणतात. अलास्काचं Utqiagvik शहर आर्कटिक सर्कलमध्ये येतं. त्यात हे छोटंसं शहर इतर शहरांच्या तुलनेत जास्त उंचीवर आहे. अशात 18 नोव्हेंबरनंतर या शहराच्या आकाशात सूर्य नसल्यात जमा आहे.

नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत Utqiagvik मध्ये कडाक्याची थंडी पडते. या काळात येथील तापमान मायनस 23 डिग्रीपर्यंत खाली जाते. याशिवाय येथील दृष्यता देखील प्रचंड कमी होते.

हेही वाचा :

अवघ्या 3 दिवसात संपूर्ण जगाची भटकंती, महिलेचा विक्रम, कोण आहेत ख्वाला-अल-रोमेथी?

…म्हणून जपानची राजकन्या वारंवार मोडते लग्न, 7 वर्षांपासून एकाच तरुणाला करतेय डेट

मार्क झुकरबर्गलाही मागे टाकत टेस्लाचे सीईओ मस्क जगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत, एकूण संपत्ती किती?

Polar night Alaska city Utqiagvi will see sunrise after 66 days photos and videos

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.