Earthquake | ‘हा’ देश शक्तीशाली भूकंपाने हादरला, अनेक इमारती जमीनदोस्त, आतापर्यंत 296 जणांचा मृत्यू, Video
Earthquake | भूकंपामुळे मोठी वाताहात झाली आहे. भूकंपानंतर काहीवेळात रस्त्यावर रुग्णवाहिकांचे आवाज येऊ लागले. लोक पुन्हा घरात पाऊल ठेवायला घाबरत आहेत. काही लोकांनी आसपासच्या कॅफेमध्ये रात्र घालवली.

नवी दिल्ली : काहीवेळा भूकंपाचे सौम्य झटके येतात. काहीवेळा भूकंपाची तीव्रता मोठी असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी होते. भूकंपामध्ये क्षणार्धात होत्याच नव्हतं होतं. अनेकांची स्वप्न, वर्षानुवर्ष मेहनतीने जमवलेला संसार मोडून पडतो. असाच एक भूकंपाचा मोठा झटका आला. 6.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झालीय. या भूकंपात जवळपास 300 लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक घर जमीनदोस्त झाली आहेत. ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची शक्यता आहे. रात्री उशिरा भूकंप झाला. त्यावेळी अनेक लोक गाढ झोपेत होते. मोरक्को या आफ्रिकन देशात भूकंपामुळे मोठं नुकसान झालय. मोरक्कोच्या मराकेश शहरापासून 71 किलोमीटर लांब अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं आहे. मदत आणि बचाव कार्य सुरु आहे.
भूकंपाचे झटके इतके तीव्र होते की, मोरक्कोमधील अनेक इमारतींना तडे गेले आहेत. काही इमारती पूर्णपणे कोसळल्या आहेत. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. जमीनदोस्त इमारतींचा ढिगारा त्यामध्ये दिसतोय. रिपोर्ट्सनुसार ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची भीती आहे. भूकंपाचे धक्के जाणवताच स्थानिकांमध्ये एकच घबराट पसरली. पळापळ सुरु झाली. लोक घराबाहेर आले. भूकंपानंतर काहीवेळात रस्त्यावर रुग्णवाहिकांचे आवाज येऊ लागले, असं एका स्थानिक व्यक्तीने न्यूज एजन्सीशी बोलताना सांगितलं. ज्या इमारती कोसळल्या आहेत, त्याखाली अनेक लोक अडकल्याची शक्यता आहे.
🚨 URGENT
Les premières vidéos des dégâts du séisme commencent à être publiées ! 😥🇲🇦
— TFT MOROCCO (@TFT_Morocco) September 8, 2023
लोकांच्या मनात बसली भीती
न्यूज एजन्सीशी बोलताना एका व्यक्तीने सांगितलं की, “भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की, लोकांनी एकच आरडाओरडा सुरु केला. भूकंपानंतर लोकांच्या मनात भीती आहे. लोक पुन्हा घरात पाऊल ठेवायला घाबरत आहेत. काही लोकांनी आसपासच्या कॅफेमध्ये रात्र घालवली” मोरक्कोमध्ये सहसा अशा प्रकारचे भूकंपाचे धक्के जाणवत नाहीत. मागच्या 120 वर्षात असा भूकंप झालेला नाही. याधी मोरक्कोच्या पूर्व भागात अशा प्रकारचा भूकंप झाला आहे.