AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंग्लंडमध्ये पुन्हा कडक लॉकडाऊन, बोरिस जॉन्सन यांची घोषणा

कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराने इंग्लंडमध्ये थैमान घातलं आहे. त्यामुळे इंग्लंडमध्ये पुन्हा एकदा कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

इंग्लंडमध्ये पुन्हा कडक लॉकडाऊन, बोरिस जॉन्सन यांची घोषणा
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द
| Updated on: Jan 05, 2021 | 6:45 AM
Share

लंडन: इंग्लंडमध्ये पुन्हा एखदा लॉकडाऊनची घोषणा पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी केली आहे. कोरोनाच्या नव्या प्रकाराने इंग्लंडमध्ये थैमान घातलं आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. जॉन्सन यांनी देशवासियांना संबोधित केलं. त्यावेळी हा लॉकडाऊन बुधवारपासून लागू होईल अशी घोषणा केली आहे. तसंच लॉकडाऊनच्या काळात जवळपास 56 मिलियन लोक इंग्लंडमध्ये परततील असं जॉन्सन म्हणाले. (PM Boris Johnson announces another lockdown in England)

कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराने इंग्लंडमध्ये थैमान घातलं आहे. त्यामुळे इंग्लंडमध्ये पुन्हा एकदा कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सोमवारी ही घोषणा केली आहे. स्कॉटलंडने लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर जॉन्सन यांनीही संपूर्ण इंग्लंडमध्ये लॉकडाऊनची घोषणा केलीय. बुधवारपासून हा लॉकडाऊन लागू होणार आहे. त्यामुळे बुधवारपासून इंग्लंडमधील सर्व शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत.

पहिल्या टप्प्यापेक्षा 40 टक्के अधिक रुग्णसंख्या

इंग्लंडमध्ये कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे इंग्लंडमधील एक तृतीयांश म्हणजे जवळपास 44 बिलीयन नागरिक अनंत अडचणींचा सामना करत आहेत. इंग्लंडमधील विविध रुग्णालयात सोमवारी जवळपास 27 हजार कोरोनाबाधित रुग्ण दाखल झाले आहेत. हा आकडा कोरोनाच्या पहिल्या टप्प्यातील रुग्णांपेक्षा 40 टक्के अधिक आहे. गेल्या मंगळवारी अवघ्या 24 तासांत 80 हजाराहून अधिक नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याचंही जॉन्सन यांनी सांगितलं.

आता अधिक परिश्रमाची गरज- जॉन्सन

इंग्लंडमध्ये आता लागू करण्यात आलेला लॉकडाऊन हा गेल्यावर्षी मार्च ते जून दरम्यान लावण्यात आलेल्या लॉकडाऊनप्रमाणेच असेल, असं जॉन्सन यांनी स्पष्ट केलं आहे. इंग्लंडमधील अधिकाधिक प्रदेशात सध्या कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. कोरोनाच्या नव्या प्रकाराचा सामना करण्यासाठी आपल्याला अधिक मेहनत घ्यावी लागणार हे स्पष्ट असल्याचंही जॉन्सन म्हणाले.

इंग्लंडमध्ये कोणत्या कामांसाठी बाहेर पडता येणार?

इंग्लंडमध्ये लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर जॉन्सन यांनी नागरिकांना काहीसा दिलासाही देऊ केला आहे. अतंत्य गरजेच्या कामासाठी नागरिकांना घराबाहेर पडण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यात गरजेचं काम, कार्यालयात जाण्यासाठी, वर्क फ्रॉम होम करु शकत नसाल तर, व्यायाम, मेडिकल आणि कौटुंबिक हिंसेपासून वाचण्यासाठी तुम्ही घराबाहेर पडू शकता, असंही जॉन्सन यांनी स्पष्ट केलं आहे.

संबंधित बातम्या:

2021 मध्येही कोरोना काही थांबेना, बँकॉकमध्ये शाळा आणि बाजारपेठांमध्ये कडकडीत बंद

आनंदाची बातमी: कोरोनाच्या नव्या रुपामुळे धास्तावलेल्या ब्रिटनला दिलासा; कोरोनाच्या आणखी एका लशीला मंजुरी

PM Boris Johnson announces another lockdown in England

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.