श्रीलंकेत भारताचा मोठा डाव, UAE सोबत मिळून प्लॅन, चीनची झोप उडणार
PM Modi Sri Lanka Visit: हिंद महासागरात चीनचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी भारत आणि संयुक्त अरब अमीरात (यूएई) एकत्र आले आहे. या दोन्ही देशांनी श्रीलंकेतील त्रिंकोमाली ऊर्जा केंद्राचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे.

PM Modi Sri Lanka Visit: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनची झोप उडवणारी रणनीती तयार केली. मोदी यांनी श्रीलंकेच्या सरकारने ‘मित्र विभूषण’ पुरस्कार देऊन गौरवले आहे. त्याचवेळी मोदी यांनी अनेक द्विपक्षीय करारावर स्वाक्षरी केली. संरक्षण क्षेत्रात सहकार्य करण्याचे ठरवले. हा संरक्षण करार दोन्ही देशांमधील संबंध मजबूत करण्याच्या दिशेने एक पाऊल असल्याचे म्हटले जात आहे. भारताने श्रीलंकेत शांती सेना पाठवल्याच्या घटनेस चार दशक झाल्यानंतर हा लष्करी करार झाला आहे.
3.2 अब्ज डॉलर तेल रिफायनरी
हिंद महासागरात चीनचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी भारत आणि संयुक्त अरब अमीरात (यूएई) एकत्र आले आहे. या दोन्ही देशांनी श्रीलंकेतील त्रिंकोमाली ऊर्जा केंद्राचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. तिन्ही देशांच्या पंतप्रधानांनी श्रीलंका दौऱ्यात या करारावर सह्या केल्या. या करारामुळे भारताची चीनसोबत स्पर्धा वाढली आहे. चीनची सरकारी उर्जा कंपनी सिनोपेकने श्रीलंकेतील दक्षिणी बंदरावर 3.2 अब्ज डॉलर तेल रिफायनरी बनवण्यासाठी करार केला आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती दिसानायके यांनी सामपूर सौर ऊर्जा योजनेचे डिजिटल माध्यमातून उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, सामपूर सौर उर्जा संयंत्र श्रीलंकेच्या उर्जा सुरक्षेसाठी महत्वाचे आहे. बहु उत्पादन पाइपलाइनची निर्मिती आणि त्रिंकोमाली उर्जा केंद्राच्या विकासामुळे श्रीलंकेतील सर्व लोकांना फायदा होणार आहे. दोन्ही देशांमधील ग्रिड करारामुळे श्रीलंकेत वीज निर्यातीचा पर्याय उपबल्ध होणार आहे. भारताच्या शेजारी पहिले धोरण आणि व्हिजिन महासागर धोरणात श्रीलंकेला महत्वाचे स्थान आहे.




परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी सांगितले की, श्रीलंकेच्या पूर्वेकडील नैसर्गिक बंदर असलेल्या त्रिंकोमाली या रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या शहरामध्ये ऊर्जा केंद्राच्या उभारणीमध्ये बहु-उत्पादन पाइपलाइनच्या बांधकामाचा समावेश असणार आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील टँक फार्मचाही समावेश असू शकतो. त्याचा काही भाग इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या श्रीलंकेच्या उपकंपनीच्या मालकीचा आहे. भारत आणि श्रीलंकाने पॉवर ग्रिड कनेक्टिव्हीटी, डिजिटलीकरण, सुरक्षा आणि आरोग्य सेवा यासंदर्भातील करारावर सह्या केल्या.