कतारच्या कोर्टाने भारतीय नौदलाच्या 8 माजी सैनिकांना फाशीची शिक्षा सुनावली, इस्रायलशी कनेक्शन

भारताच्या माजी नौसैनिकांच्या सुटकेसाठी कायदेशीर पावले उचलण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. हे जवान पूर्वी भारतीय नौदलात सेवा बजावत होते. ते सध्या दहरा ग्लोबल कंपनीसाठी काम करीत होते. त्यांच्या सुटकेसाठी सर्व पर्याय वापरले जातील असे म्हटले जात आहे.

कतारच्या कोर्टाने भारतीय नौदलाच्या 8 माजी सैनिकांना फाशीची शिक्षा सुनावली, इस्रायलशी कनेक्शन
Representation purpose only
Follow us
| Updated on: Oct 26, 2023 | 8:06 PM

मुंबई | 26 ऑक्टोबर 2023 : भारतीय नौदलाच्या आठ माजी सैनिकांना कतारच्या कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. कतार सरकारने गेल्या एक वर्षांपासून या भारतीय जवानांना कैदेत ठेवले आहे. भारताने या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. या निकाला आव्हान देणार असल्याचे भारताने म्हटले आहे. एवढेच नाही तर भारताने याबाबत सर्व पर्याय खुले असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी भारताने या नौसैनिकांवर दया दाखवित त्यांना माफ करावे असे कतारला आवाहन केले होते. हे भारतीय जवान इस्रायलसाठी एजंट म्हणून गुप्त माहीती पुरवित होत असा आरोप करीत कतारने त्यांना अटक केली होती.

भारत सरकारने या माजी नौसैनिकांच्या सुटकेसाठी कायदेशीर पावले उचलण्याचा विचार केला आहे. हे जवान पूर्वी भारतीय नौदलात सेवा बजावत होते. ते सध्या दहरा ग्लोबल कंपनीसाठी काम करीत होते. ही कंपनी एक प्रायव्हेट कंपनी असून ती कतारच्या सैन्याला प्रशिक्षण देण्याचे काम करते. इटालियन छोटी स्टेल्थ पाणबुडीच्या ( U212 ) देखरेखीचे काम करणाऱ्या एका फर्मबरोबर ते काम करीत होते. या भारतीय नागरिकांच्या दया याचिकेला अनेकदा फेटाळण्यात आले आहे. कतारच्या अधिकाऱ्यांनी भारताच्या अपिलाला फेटाळत या माजी सैनिकांच्या सुटकेस नकार दिला आहे.

कतार या प्रकरणात हा पहिला निकाल दिला आहे. भारताचे एक पत्रकार या प्रकरणाचे वार्तांकन करत होते. त्यांनाही देश सोडण्यास सांगितले आहे. या फाशीच्या निकालामुळे भारत आश्चर्यचकीत झाला असून आम्ही विस्तृत निकालाची वाट पहात आहोत असे भारताने म्हटले आहे. आम्ही या सैनिकांशी आणि त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क ठेवून असल्याचे सांगतानाच सर्व पर्यायांचा विचार करण्यात येईल असे भारताने म्हटले आहे.

नेमके आरोप सांगितले नाहीत

या प्रकरणाला आपण खूप महत्व दिले असून त्याकडे बारीक लक्ष ठेवूनच असल्याचे भारताने म्हटले आहे. भारतीय नागरिकांना सर्व प्रकारचे काऊंसलर पुरविणे आणि कायदेशीर मदत देण्याचे आश्वासन भारताने दिले आहे. या प्रकरणाचा पाठपुरावा कतार सरकारकडे करणार असल्याचे भारताने म्हटले आहे. कतारमधील भारतीय राजदूत आणि त्यांच्या डेप्युटी अधिकाऱ्यांनी 1 ऑक्टोबर रोजी तुरुंगात या माजी नौदल अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. कतारने यांच्या काऊंसर नियुक्तीला परवानगी दिली होती, कतारने कधीच भारतीय नागरिकांवर नेमके काय आरोप लावले आहेत त्याची माहीती पुरविलेली नाही.

हे आहेत आठ अधिकारी

या माजी नौदल अधिकाऱ्यात कॅप्टन नवतेज सिंह गिल, कॅप्टन बीरेंद्र कुमार वर्मा, कॅप्टन सौरभ वशिष्ठ, कमांडर अमित नागपाल, कमांडर पुरेनेंदू तिवारी, कमांडर सुगुनकर पाकला, कमांडर संजीव गुप्ता आमि नाविक रागेश यांना कतारच्या गुप्तचर एजन्सीने 30 ऑगस्ट 2022 रोजी दोहा येथून अटक केली होती. आठ वेळा त्यांचा जामिन फेटाळण्यात आला आहे. आरोपनिश्चिती शिवायच त्यांना तुरुंगत ठेवल्याचा आरोप आहे.

'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका
'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका.
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर.
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी.
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे.
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे.
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे.
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?.
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता.
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे.
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?.