AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर राहुल गांधी यांचा अमेरिकेतून प्रहार, म्हटले, ‘निवडणूक प्रक्रियेत गंभीर…’

राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, निवडणूक आयोगाने तडजोड केली आहे. हे आमच्यासाठी अगदी स्पष्ट झाले. व्यवस्थेत खूप गडबड आहे. हे मी अनेक वेळा सांगितले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर राहुल गांधी यांचा अमेरिकेतून प्रहार, म्हटले, 'निवडणूक प्रक्रियेत गंभीर...'
Rahul Gandhi
Follow us
| Updated on: Apr 21, 2025 | 7:32 AM

लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा मुद्दा उपस्थित केला. भारतातील निवडणूक प्रक्रिया गंभीर समस्या असल्याचा हल्ला राहुल गांधी यांनी केला. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे उदाहरण दिले. ते बोस्टनमधील विद्यापीठात एका चर्चासत्रात बोलत होते.

राहुल गांधी म्हणाले, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत मतदारांपेक्षा तरुण मतदान करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. निवडणूक आयोगाने आम्हाला संध्याकाळी ५:३० वाजेपर्यंतचा मतदानाचा डेटा दिला. परंतु त्यानंतर संध्याकाळी ५:३० ते ७:३० वाजेपर्यंत जेव्हा मतदान संपायला हवे होते, तेव्हा ६५ लाख मतदारांनी मतदान केले. हा प्रकार अचंबित करणार आहे. अशक्य आहे. कारण एका मतदाराला मतदान करण्यासाठी सुमारे ३ मिनिटे लागतात. मग तुम्ही गणना केली तर याचा अर्थ असा होईल की मतदार पहाटे २ वाजेपर्यंत रांगेत उभे होते. म्हणजेच महाराष्ट्रातील निवडणुकीत रात्रभर मतदान सुरु होते. प्रत्यक्षात तसे झाले नाही.

राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत व्हिडिओ चित्रिकरणचा मुद्दाही मांडला. ते म्हणाले, आम्ही निवडणूक आयोगाला विचारले की, व्हिडिओग्राफी होत आहे का? त्यांनी केवळ व्हिडिओग्राफीला नकार दिला नाही, तर कायदाही बदलला, म्हणून आता तुम्ही व्हिडिओग्राफीची मागणी करू शकत नसल्याचे सांगितले.

राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, निवडणूक आयोगाने तडजोड केली आहे. हे आमच्यासाठी अगदी स्पष्ट झाले. व्यवस्थेत खूप गडबड आहे. हे मी अनेक वेळा सांगितले आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले.

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक नोव्हेंबर २०२४ मध्ये झाली होती. या निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक २३२ पेक्षा जास्त जागांवर विजय मिळाला. भाजपला सर्वाधिक १३२ जागा मिळाल्या आहेत. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ५७ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागांवर विजय मिळाला आहे. महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला २०, काँग्रेसला १६ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला १० जागा मिळाल्या होत्या.

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.