AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Donald Trump Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा ‘यु-टर्न’, भारताला दिलासा, चीनला मात्र शिक्षा

Donald Trump Tariff : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे सुरु झालेलं टॅरिफ वॉर आता थोडं शांत होण्याची चिन्ह आहेत. ट्रम्प यांनी आपल्या निर्णयावरुन मोठा 'यु-टर्न' घेतला आहे. त्यांनी भारताला दिलासा दिला आहे. पण चीनला मात्र मोठी शिक्षा दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्षपदाचा हा दुसरा कार्यकाळ आहे.

Donald Trump Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा 'यु-टर्न', भारताला दिलासा, चीनला मात्र शिक्षा
Donald TrumpImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 10, 2025 | 9:45 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर मोठा आर्थिक प्रहार केला आहे. चिनी उत्पादनांवर त्यांनी 125 टक्के आयात शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. त्याआधी अमेरिकेने हा दर वाढवून 104 टक्के केला होता. त्यानंतर चीननेही अमेरिकेतून येणाऱ्या उत्पादनांवर आयात शुल्क वाढवून 84 टक्के केलं होतं. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन घोषणा केली आहे. त्यांनी भारतासह 75 देशांना हुए ‘रेसिप्रोकल टॅरिफ’मधून 90 दिवसांसाठी दिलासा दिला आहे. या कालावधीत फक्त 10 टक्के शुल्क लागू राहीलं.

जगातील अनेक बड्या देशांमध्ये व्यापारी तणावाने टोक गाठलेलं असताना हा निर्णय आला आहे. जागतिक मंदीची भिती व्यक्त होत आहे. ट्रम्प यांच्या निर्णयाकडे चीनवर दबाव टाकण्याची रणनिती म्हणून पाहिलं जात आहे. दुसरीकडे टीकाकारांच म्हणणं आहे की, जागातील बाजारांच कोसळणं आणि मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या टीकेमुळे ट्रम्प यांनी हा ‘यु-टर्न’ घेतला आहे. “मी 90 दिवसांसाठी PAUSE घेतला आहे. या दरम्यान अन्य देशांसाठी ‘रेसिप्रोकल टॅरिफ’ कमी करुन 10 टक्के करतोय. तात्काळ प्रभावाने हा निर्णय लागू होत आहे” असं ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Truth Social वर म्हटलं आहे.

‘शोषण आता सहन करणार नाही’

चिनी वस्तुंच्या आयातीवर 125 टक्के कर आकारणीचा डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय हे आतापर्यंतच सर्वात आक्रमक पाऊल मानलं जातय. “चीनने जागतिक बाजाराप्रती सन्मान दाखवलेला नाही. त्या बदल्यात अमेरिका आता 125 टक्के शुल्क वसूल करेल. चीनने ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की, अमेरिका आणि अन्य देशांचे शोषण आता सहन करणार नाही” असं ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलय.

त्यांच्यासाठी हे इनाम

अमेरिकेने सुरु केलेल्या या टॅरिफ अभियानात भारतासह 75 देशांना दिलासा मिळाला आहे. या देशांवर नवीन टॅरिफ दर लागू होणार नाही. त्यांना 90 दिवसांची सवलत देण्यात आली आहे. या अवधीत फक्त 10 टक्के शुल्क आकारलं जाईल. “ज्या देशांनी अमेरिकेविरोधात प्रत्युत्तराची कारवाई केली नाही, त्यांच्यासाठी हे इनाम आहे” असं अमेरिकेचे ट्रेजरी सचिव बेसेंट यांनी सांगितलं. मॅक्सिको आणि कॅनडा या देशांचा सुद्धा 10 टक्के टॅरिफ स्लॅबमध्ये समावेश करण्यात आला आहे.

3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.