जो बायडन यांचा ऐतिहासिक निर्णय, कृष्णवर्णीय व्यक्तीला पहिल्यांदा मिळणार संरक्षणमंत्रिपद?
जो बायडन यांनी अमेरिकेच्या संरक्षण मंत्रिपदावर सेवानिवृत्त जनरल लॉयड आस्टिन यांची नियुक्ती करणार असल्याची माहिती आहे. Joe Biden Lloyd Austin
वॉशिंग्टन: अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांनी अमेरिकेच्या संरक्षण मंत्रिपदावर सेवानिवृत्त जनरल लॉयड आस्टिन यांची नियुक्ती करणार असल्याची माहिती आहे. अमेरिकन माध्यमांनी याबाबत वृत्त प्रकाशित केले आहे. मात्र, अधिकृतरित्या याबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही. लॉयड ऑस्टिन यांची संरक्षण मंत्रिपदावर नियुक्ती झाल्यास ही घटना अमेरिकेसाठी ऐतिहासिक ठरणार आहे. (Reports claims that Joe Biden has chosen Lloyd Austin as US defence secretary)
लॉयड ऑस्टिन यांच्या नावाला सिनेटनं मंजुरी दिल्यास ते अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय संरक्षणमंत्री ठरतील. ऑस्टिन हे आफ्रिकन वंशांचे अमेरिकी नागरिक आहेत. मात्र, जो बायडन यांच्या कार्यालयाकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. जो बायडन ख्रिसमसपूर्वी संरक्षणमंत्र्याच्या नावाची घोषणा करु शकतात.
अमेरिकेतील पॉलिटिकोच्या वृत्तानुसार लॉयड ऑस्टिन यांना संरक्षणमंत्रिपदावर काम करण्यासाठी निवडण्यात आले आहे. बायडन यांच्या मंत्रिमंडळात ऑस्टिन संरक्षणमंत्री बनण्याची शक्यता कमी होती. सीएनएनने देखील अमेरिकेच्या संरक्षण मंत्रिपदी लॉयड ऑस्टिन यांची निवड करण्यात आल्याचे म्हटले आहे.
लॉयड ऑस्टिन 2016 मध्ये अमेरिकेच्या सैन्यातून निवृत्त झाले होते. बायडन यांचे सहकारी बेन्नी थॉमसन यांनी देखील ऑस्टिन देशाच्या दक्षिण भागातील आहेत. संरक्षणमंत्रिपदासाठी ते योग्य व्यक्ती आहेत, असं म्हटलं. ऑस्टिन यांची कामगिरी शानदार राहिल्याचेही थॉमसन म्हणाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कठिण प्रसंगातही परिस्थिती सांभाळण्याच्या कौशल्यामुळे जो बायडेन यांनी ऑस्टिन यांची संरक्षणमंत्रिपदावर निवड करण्यात आली आहे. ऑस्टिन यांनी यापूर्वी जो बायडन यांच्या सोबत काम केले आहे.(Reports claims that Joe Biden has chosen Lloyd Austin as US defence secretary)
बायडन यांच्या मंत्रिमंडळात भारतीय वंशाच्या दोघांना संधी?
अमेरिकेचे निर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांच्या कॅबिनेटमध्ये भारतीय वंशाच्या विवेक मूर्ती आणि प्रा. अरुण मजुमदार यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील माजी सर्जन जनरल विवेक मूर्ती आणि प्रा. अरुण मजुमदार यांना बायडन यांच्या कॅबिनेटमध्ये महत्वाची खाती मिळणार असल्याचे वृत्त अमेरिकेतील माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. वाशिंग्टन पोस्ट आणि पॉलिटिको यांनी याविषयी माहिती दिली आहे.
जो बायडन भारतीय वंशाचे विवेक मूर्ती यांना कोरोना विषाणू संसर्गाचा सामना करण्यासाठी आरोग्य आणि मानव सेवा मंत्रिपदावर संधी देऊ शकतात. तर, स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे प्रा. अरुण मजुमदार यांना उर्जामंत्रिपदावर संधी मिळण्याची शक्यता आहे.
Mount Everest | जगातले सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्टची उंची आता 8848.86 मीटरhttps://t.co/pN9IlBAA4k#mounteverest #mountains #mountains
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 8, 2020
संबंधित बातम्या:
अमेरिकेच्या नियोजित अध्यक्षांकडून भारतीयांना दीपावलीच्या शुभेच्छा, जो बायडन म्हणाले…
(Reports claims that Joe Biden has chosen Lloyd Austin as US defence secretary)