राजकारणी येतात जातात, माझा मुक्काम कायम ! कोण आहे PM हाऊसची परमानंट मेंबर

राजकारणाशी तिचा काही संबंध नाही. परंतू पंतप्रधानाच्या अधिकृत सरकारी निवासस्थानातील ती परमानंट मेंबर आहे. तिने आतापर्यंत चार पंतप्रधान पाहीले आहेत कोण आहे ती ?

राजकारणी येतात जातात, माझा मुक्काम कायम ! कोण आहे PM हाऊसची परमानंट मेंबर
rishi sunakImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Sep 24, 2023 | 3:29 PM

नवी दिल्ली | 24 सप्टेंबर 2023 : 10 डाऊनिंग स्ट्रीट ( 10 Downing Street ) ब्रिटीश पंतप्रधानांचे अधिकृत निवास स्थान आहे. जेव्हा सत्ता बदलते तेव्हा मावळत्या पंतप्रधानांना येथून सैनिक सलामी देत निरोप देतात. नंतर नविन पंतप्रधान येथे रहायला येतात. परंतू एक पाहूणा असाही आहे, ज्याचा 10 डाऊनिंग स्ट्रीट परमानंट एड्रेस आहे. गेल्या 12 वर्षांत त्याच्यासमोर चार पंतप्रधान आले आणि गेलेही. परंतू ही पाहूणी कायम राज्य करीत आहे. हा कोणी माणूस नाही तर एक मांजर आहे जिचे नाव ‘लॅरी’ आहे.

लॅरी नावाची मांजर खास ब्रिटीश पंतप्रधानाच्या निवासस्थानातील अधिकृत ‘चीफ माऊसर’ आहे. साल 2010 रोजी ती चार वर्षांची असताना तिला ‘बेटर- सी डॉग्स एण्ड कॅट्स होम’ येथून रेस्क्यू करून येथे आणले होते. लॅरी उंदरांना पकडण्यात माहीर आहे तिच्या याच केलेमुळे तिची पीएम हाऊसला एण्ट्री झाली होती. 10 डाऊनिंग स्ट्रीटच्या वेबसाईटवर दिलेल्या माहीतीनूसार, ‘लॅरीची अधिकृत ड्यूटी पंतप्रधान निवास येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करणे आणि उंदरांवर लक्ष ठेवणे हे आहे.

पंतप्रधानांच्या निवासातील लॅरी ही काही पहिली मांजर नाही. 95 वर्षांपासून येथे मांजरांना अधिकृतपणे पाळले जाते. ही प्रथा Henry VIII च्या काळापासून सुरु आहे. हेनरीच्या काळात कार्डिनल वूल्शी त्यांचे लॉर्ड चान्सलर होते. ते त्यांच्याजवळ एक मांजर ठेवायचे. ते जेथे जायचे मांजर त्यांच्यासोबत असायची. साल 1929 पहिल्यांदा ब्रिटीश सरकारने पीएम निवासस्थानातील मांजरीची जबाबदारी अधिकृतरित्या त्याच्या अधिपत्याखाली घेतली. प्रसिद्ध पत्रकार करण थापर यांनी हिंदूस्थान टाईम्सच्या एका लेखात लिहीले आहे की तेव्हा मांजरीच्या देखभालीसाठी एक पेनी रक्कम राखीव ठेवली जायची. हळूहळू ही रक्कम वाढविली गेली. 21 शतक येता येता ही रक्क सुमारे 100 पाऊंड म्हणजे वार्षिक 10 हजार रुपये झाली.

लॅरी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे स्वागत करताना –

साल 2011 नंतर 10 डाऊनिंग स्ट्रीटमध्ये चार पंतप्रधान डेव्हीड कॅमरुन, थेरेसा मे, लिज ट्रस आणि बोरीस जॉनसन आले आणि गेले. ऋषि सुनक पाचवे पंतप्रधान आहेत. परंतू लॅरी अजून येथे कायम आहे. डेव्हीड कॅमेरुन लॅरीला खूप पसंद करायचे. त्यांच्या सोबतच्या अनेक छायाचित्रात लॅरी सोबत दिसते. त्यांनी 2016 मध्ये संसदेत लॅरीला सिव्हीस सर्व्हंट म्हणून दर्जा मिळावा अशी मागणी केली होती. काही लोकांशी लॅरीशी पटलेही नाही. डेविड कॅमरुन यांची पत्नी सामांथा कॅमरुन यांच्या तिचे पटले नाही. तिच्या केसांचा सामांथा यांनी इतका धसका घेतला की तिची पंतप्रधानांच्या फ्लॅटमध्ये एण्ट्री बंद केली. ट्वीटर लॅरी नावाचे खातेही आहे. तिचे 8.32 लाखाहून फॉलोअर आहेत. यावरुन नेहमी पोस्ट टाकल्या जातात.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.