Russia-Ukraine War : रशियाच्या हल्ल्यात एका माणसाचा मृत्यू, पण पुतिन यांची बदला घेण्याची पद्धत त्याहीपेक्षा भयानक
Russia-Ukraine War : मागच्या आठवड्यात रशियातील कजान शहरावर युक्रेनने 9/11 सारखा भीषण हल्ला केला होता. रशियाने आठवड्याभराच्या आतच या हल्ल्याचा बदला घेतला आहे. रशियाच्या या हल्ल्यात फक्त एका माणसाचा मृत्यू झाला. पण राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची बदला घेण्याची पद्धत त्याहीपेक्षा भयानक आहे.
युक्रेनने शनिवारी रशियावर 9/11 सारखा भीषण हल्ला केला होता. युक्रेनी सैन्याने कजानमधील 6 इमारतींवर ड्रोन हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर कजानमध्ये भिती, दहशतीच वातावरण निर्माण झालं होतं. हल्ल्यानंतर इमारती, शाळा रिकाम्या करण्यात आल्या होत्या. आठवड्याभराच्या आतच रशियाने या हल्ल्याचा बदला घेतला आहे. रशियाने या हल्ल्यासाठी जी वेळ निवडली, ज्या पद्धतीने हा हल्ला केला, त्यावरुन रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यावर टीका सुरु आहे. कितीही शत्रुत्व असलं, तरी सणाच्या दिवशी एक माणुसकी धर्म पाळण्याची पद्धत आहे. पण रशियाने नाताळ सणाच्या दिवशी युक्रेनवर भीषण हल्ला केला.
युक्रेनच्या पावर ग्रिडवर रशियाने मिसाइल आणि ड्रोनद्वारे हल्ला केला. युक्रेनचे राष्ट्रपती वलोदिमीर झेलेंस्की यांनी यावरुन पुतिन यांच्यावर निशाणा साधलाय. ‘पुतिन यांनी हल्ला करण्यासाठी जाणूनबुजून नाताळचा दिवस निवडला’ असं झेलेंस्की यांनी म्हटलं आहे. रशियाने नाताळच्या दिवशी युक्रेनच्या पावर ग्रिडवर 170 पेक्षा अधिक मिसाइल आणि ड्रोन्स डागले. या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. पण मोठ्या प्रमाणात ब्लॅक आऊट झाला. झेलेंस्की यांनी या हल्ल्याला अमानवीय म्हटलं आहे.
170 पेक्षा अधिक मिसाइलने हल्ला
“पुतिन यांनी हल्ल्यासाठी जाणूनबुजून नाताळचा दिवस निवडला. यापेक्षा अमानवीय काय असू शकतं?. बॅलेस्टिक मिसाइलसह 70 पेक्षा अधिक मिसाइल आणि शंभरपेक्षा अधिक ड्रोन्सद्वारे हल्ला करण्यात आला. त्यांचं टार्गेट आमची एनर्जी सिस्टिम होती” असं झेलेंस्की म्हणाले. युक्रेनच्या एअर फोर्सने 50 पेक्षा अधिक मिसाइल्स पाडली. पण काही मिसाइल्सनी लक्ष्यभेद केला. “दुर्देवाने काही मिसाइल्सनी हिट केलं. अनेक क्षेत्रांमध्ये यामुळे ब्लॅकआऊटची स्थिती आहे” असं झेलेंस्की म्हणाले.
‘हे एक दृष्ट आणि वाईट कृत्य’
या हल्ल्यात थर्मल पावर प्लांट्सच्या उपकरणांच मोठ नुकसान झालय असं युक्रेनच्या डीटीईके एनर्जी कंपनीने सांगितलं. डीटीईकेचे सीईओ मॅक्सिम टिमचेंको यांनी मित्र देशांना अजून एअर डिफेन्स पाठवण्याची विनंती केली आहे. “नाताळ सण साजरा करणाऱ्या लाखो लोकांना विजेपासून वंचित ठेवणं हे एक दृष्ट आणि वाईट कृत्य आहे. याच उत्तर दिलं पाहिजे” असं ते म्हणाले.
‘हल्लेखोर देशासाठी काही पवित्र नाही’
युक्रेनमधील इंजिनिअर्स युक्रेनमधील विद्युत प्रवाह सुरळीत करण्याच्या कामाला लागले आहेत. इवानो-फ्रॅकिव्स्क क्षेत्राचे प्रमुख स्वितलाना ओनिशचुक म्हमाले की, ‘ख्रिसमसच्या सकाळी पुन्हा एकदा दिसलं, हल्लेखोर देशासाठी काही पवित्र नाही’