Russia Ukraine : तिरंगा हाती धरला अन् विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण, पहिली तुकडी रोमानियाच्या बॉर्डरकडे रवाना
रशिया आणि यूक्रेन यांच्यात युद्ध सुरु झालंय. यामुळं भारताचे हजारो विद्यार्थी यूक्रेनमध्ये अडकले आहेत. रशियानं यूक्रेन विरोधात सुरु केलेल्या हल्ल्यांचा आज दुसरा दिवस आहे.
नवी दिल्ली: रशिया (Russia) आणि यूक्रेन (Ukraine) यांच्यात युद्ध सुरु झालंय. यामुळं भारताचे हजारो विद्यार्थी (Indian Students) यूक्रेनमध्ये अडकले आहेत. रशियानं यूक्रेन विरोधात सुरु केलेल्या हल्ल्यांचा आज दुसरा दिवस आहे. रशियानं यूक्रेनच्या हवाई ठिकाणांवर हल्ले केलेले आहेत. रशियाच्या हल्ल्यात प्रवासी विमानावर हल्ला होऊ शकतो आणि जीवितहानी होऊ शकते या कारणामुळं यूक्रेनची एअरस्पेस बंद करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी यूक्रेनमध्ये गेलेले हजारो विद्यार्थी मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारनं प्रयत्न सुरु केले आहेत. केंद्र सरकारनं यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दुसरीकडे यूक्रेनच्या चेरनिवत्सीतून विद्यार्थ्याची पहिली तुकडी यूक्रेन रोमानिया बॉर्डरकडे रवाना झाली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं ल्यीव आणि चेरनिवत्सीमध्ये कॅम्प लावला आहे.
एएनआयचं ट्विट
The first batch of Indian students have left Chernivtsi for the Ukraine-Romania border
MEA Camp Offices are now operational in Lviv and Chernivtsi towns in western Ukraine. Additional Russian speaking officials are being sent to these Camp Offices. pic.twitter.com/OvRlqA8Q4t
— ANI (@ANI) February 25, 2022
भारतीय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या विभागाचे अधिकारी ल्यीव आणि चेरेनीवत्सीमध्ये उपलब्ध असतील, असं सांगण्यात आलं आहे. तर, रशिया भाषा बोलता येणाऱ्या अधिकाऱ्यांना पश्चिम यूक्रेनमध्ये पाठवण्यात येईल, असं सांगण्यात आलं आहे. भारतीय विद्यार्थ्यांचे कॅम्प जिथं आहेत. तिथं भारतीय अधिकारी पोहोचतील.
भारतीय विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद
भारतीय विद्यार्थ्यांच्या सूटकेसाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. भारतीय विद्यार्थ्यांना हंगेरी आणि रोमानियामार्गे यूक्रेनमधून सुरक्षित मायदेशी आणण्यात येणार आहे. यूक्रेनमधून रोमानियाकडे रवाना होताना भारतीय विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. भारतीय विद्यार्थ्यांनी तिरंगा हातात धरुन आनंद व्यक्त केला.
उदय सामंत यांचं नरेंद्र मोदी यांना पत्र
महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका करावी या मागणीसाठी पत्र लिहिलं असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. राज्य सरकारचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग केंद्र सरकारशी याबाबत पाठपुरावा करणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी टीव्ही 9 मराठीला माहिती दिली आहे. यूक्रेनमध्ये अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी उदय सामंतांनी पुढाकार घेतला आहे.
इतर बातम्या:
Russia Ukraine War Live : यूक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या सूटकेसाठी IMA चं मोदींना पत्र