Russia Ukraine Crisis : युद्धाच्या हाहाकारात यूक्रेनंचं एक पाऊल मागे, रशियासोबत चर्चेसाठी तयार, मात्र ठेवली ‘ही’ अट
यूक्रेनचे राष्ट्रपती वोल्दिमीर जेलेंस्की यांचे सल्लागार मायखाइलो पोडोलियाक यांनी सांगितलं की, कीवच्या तटस्थतेबद्दल युक्रेन रशियाशी चर्चा करण्यास तयार आहे, मात्र सुरक्षेची हमी मिळायला हवी. रशियाचे सैन्य यूक्रेनच्या प्रमुख शहरांवर सातत्याने हल्ला चढवत आहेत. त्यामुळे संपूर्ण देशात भीतीचं वातावरण आहे. रशियन सैन्यानं चर्नोबेल परिसरावर आपला ताबा मिळवला आहे.
मुंबई : रशिया आणि यूक्रेनमधील युद्धानं आता जगभरात खळबळ माजली आहे. येत्या 96 तासात रशिया यूक्रेनवर ताबा मिळवेल अशी भीती यूक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी व्यक्त केलीय. अशावेळी यूक्रेननं एक पाऊल मागे घेतल्याचं पाहायला मिळत आहे. यूक्रेन रशियासोबत चर्चा (Russia-Ukraine Talks) करण्यास तयार आहे असं यूक्रेननं जाहीर केलंय. दरम्यान, राष्ट्रपती वोल्दिमीर जेलेंस्की (Volodymyr Zelenskyy) यांचे सल्लागार मायखाइलो पोडोलियाक (Mykhailo Podoliak) यांनी सांगितलं की, कीवच्या तटस्थतेबद्दल युक्रेन रशियाशी चर्चा करण्यास तयार आहे, मात्र सुरक्षेची हमी मिळायला हवी. रशियाचे सैन्य यूक्रेनच्या प्रमुख शहरांवर सातत्याने हल्ला चढवत आहेत. त्यामुळे संपूर्ण देशात भीतीचं वातावरण आहे. रशियन सैन्यानं चर्नोबेल परिसरावर आपला ताबा मिळवला आहे.
रशियन सैन्य आता कीववर चाल करुन जात आहे. अशावेळी यूक्रेन सैन्य कीवच्या उत्तर-पश्चिम भागात रशियन सैन्यासोबत जीवाची बाजी लावून लढाई लढत आहे. या लढाईत कीवच्या वायव्येला जवळपास 60 किलोमीटर अंतरावील इव्हांकिवमधील नदीवरील पूल शुक्रवारी सकाळी उडवण्यात आलाय. यूक्रेनमधील गृह मंत्रालयाचे सल्लागार अँटोन गेराशेन्को यांनी टेलिग्रामवर सांगितलं की, ‘आजचा दिवस सर्वात कठीण आहे’. रशियाचे सैन्य इव्हान्कीव्ह आणि चेर्निहाईव्ह मार्गे टँकमधून प्रवेश करण्याच्या प्रयत्नात आहेत. आमच्या अँटी टँक मिसाईलला आदळून रशियाचे टँक जळून राख होतात. दरम्यान, रशियाने काल मिसाईल हल्ल्याद्वारे यूक्रेनवर हल्ला चढवला आहे.
????? Destroyed Russian tank near Kharkov city. Reportedly targeted by an Ukrainian Javelin anti-tank missile.?#Ukraine #Russia pic.twitter.com/AGjpmxHfoM
— Turkey In The World (@TRintheworld) February 24, 2022
स्नेक बेटावर नेमकं काय घडलं?
रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धादरम्यान एक भावूक करणारी घटना समोर आली आहे युक्रेनच्या स्नेक आयलँड (Snake Islands) वरील ही घटना आहे रशिया समोर शरण येण्यास नकार देणाऱ्या 13 सैनिकांचा हत्या करून रशियाने त्या बेटावर कब्जा मिळवला आहे रशियाने युक्रेन च्या सैनिकांना शरण येण्यास सांगितलं होतं त्यानंतर रशियाच्या सैन्याला युक्रेनचा त्या तेरा बॉर्डर गार्डन नकार दिला यानंतर रशियाने त्या जवानांची हत्या केली युक्रेनच्या त्या तेरा सैनिकांच्या शौर्यासाठी युक्रेन युक्रेन या किताब देऊन त्यांचा गौरव केला आहे.
Snake Island ला Zmiinyi Island या नावावं देखील ओळखलं जातं. हे बेट ओडेसाशाच्या दक्षिणेला काळ्या समुद्रात आहे. रशियाच्या सैनिकांनी तिथं पोहोचून प्रथम यूक्रेनच्या 13 बॉर्डर गार्डसला धमकी देत शरण येण्यास सांगितलं. यूक्रेनच्या तिथं उपस्थित असलेल्या सैन्यानं रशियाच्या जवानांना शिवीसह प्रत्युत्तर दिलं आणि शरण येण्यास नकार दिला. यानंतर रशियानं त्यांना मारून टाकंल आहे.
A group of Ukrainian border guards were stationed on Snake Island, in the Black Sea south of Odessa, when a Russian warship ordered them to surrender under threat of attack.
Their response: “Russian warship, go fuck yourself.”
They held their ground. All 13 were killed. pic.twitter.com/GMRsXQRSX0
— Alejandro Alvarez (@aletweetsnews) February 25, 2022
इतर बातम्या :