AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Russia Ukraine War Live Video: यूक्रेनला बेचिराख करणारी रशियन विमानांचे हल्ले पाहिलात? धमाके, दहशत आणि युद्ध

रशियानं (Russia) यूक्रेनवर जोरदार हल्ले सुरु केले आहेत. रशियन फौजांनी (Russian Troops) यूक्रेनला चारी बाजूनं घेरलं आहे. रशियाचं सैन्य यूक्रेनची (Ukraine) राजधानी किव जवळ पोहोचलं आहे.

Russia Ukraine War Live Video: यूक्रेनला बेचिराख करणारी रशियन विमानांचे हल्ले पाहिलात? धमाके, दहशत आणि युद्ध
यूक्रेन रशिया युद्ध
| Updated on: Feb 24, 2022 | 8:46 PM
Share

नवी दिल्ली : रशियानं (Russia) यूक्रेनवर जोरदार हल्ले सुरु केले आहेत. रशियन फौजांनी (Russian Troops) यूक्रेनला चारी बाजूनं घेरलं आहे. रशियाचं सैन्य यूक्रेनची (Ukraine) राजधानी किव जवळ पोहोचलं आहे. यूक्रेनच्या राजधानीपासून रशियाचं सैन्य 75 किमीवर पोहोचलंय. रशियानं यूक्रेनवर हवाई हल्ले केले असून बॅलेस्टिक मिसाईडल डागल्या आहेत. तर, लोक वास्तव्याला असलेल्या भागात हल्ले करत नसल्याचं रशियाचं म्हणनं आहे. रशियानं पॅराशूटद्वारे सैन्य यूक्रेनमध्ये उतरवायला सुरुवात केलीय. यूक्रेनची राजधानी किव जवळ एक लढाऊ विमान क्रॅश झालं आहे. त्या विमानातून 14 जण प्रवास करत होते, अशी माहिती आहे. रशियाच्या आक्रमणानंतर यूक्रेनच्या राष्ट्रपतींकडून मार्शल लॉ लागू केला आहे. रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत यूक्रेनचे 300 लोक मारले गेले आहेत.

पाहा व्हिडीओ :

रशियाचं सैन्य सामान्य नागरिकांवर हल्ला करणार नसल्याचा दावा करतंय. मात्र, प्रत्यक्षात यूक्रेनच्या नागरिकांना टार्गेट केलं जात आहे. रशियानं यूक्रेनच्या 11 शहरांवर हल्ला केला आहे. कीव, खार्किव, चिशिनाओ या शहरांचा समावेश आहे. यूक्रेनच्या काही शहरांमध्ये रशियानं बॅलेस्टिक मिसाईल डागल्या आहेत. काळ्या समुद्रावरील ओडेशामध्ये मोठे स्फोट झाले आहेत. क्रामटोरस्क, बर्डियास्क, निकोलेव या शहरांमध्येही हल्ले झालेत.

पाहा व्हिडीओ

रशियाच्या सैन्यानं यूक्रेनच्या सैन्याचा तळ असलेल्या सर्व ठिकाणांवर हल्ला केलेल आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान ओडेसा इथं झालं आहे. रशियाकडून यूक्रेनच्या सैन्याची क्षमता नेस्त्नाबूत करण्याची योजना आहे.

युद्धाची दहशत दाखवणारा आणखी एक व्हिडीओ

रशियानं आतापर्यंत यूक्रेनवर 203 विमान हल्ले केले आहेत. यूक्रेनची समी बॉर्डर गार्ड कमिटीनं रशियाचं सैन्य क्रिमियातून सीमा पार करत असल्याचं दिसून आलं होतं. रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्यानंतर युद्धाचा लाल सायरन वाजवण्यात आला. युक्रेनच्या किव शहरात सायरन वाजवण्यात आला. नागरिकांना सुरक्षित जागी राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. कुणीही घराबाहेर न पडण्याचं नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे. सुरक्षा यंत्रणांना सहकार्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

पाहा व्हिडीओ

इतर बातम्या :

Russia Ukraine Crisis : रशिया आणि यूक्रेनमध्ये युद्धाचा भडका, अहमदनगरचे 40 विद्यार्थी यूक्रेनमध्ये अडकले! पालकांमध्ये भीतीचं वातावरण

Russia Ukraine Crisis : जगाला अणु युद्धाचा धोका! रशियाच्या यूक्रेनवरील हल्ल्यातनंतर माजी NATO चीफ यांचा इशारा

Russia Ukraine Crisis Watch video of Russian Troopers in Ukraine war terror and fear

भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.