AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जागतिक महायुद्धाकडे वाटचाल, रणगाडे आणि क्षेपणास्त्रांनी सज्ज रशियाने युक्रेनला घेरलं, अमेरिकेचीही उडी

रशियाने युरोपमधील दुसऱ्या क्रमांकाच्या युक्रेन (Ukraine) देशाला चारही बाजूंनी घेरलंय. रशियाचे हजारो रणगाडे आणि क्षेपणास्त्र युक्रेनभोवती तैनात करण्यात आलेत.

जागतिक महायुद्धाकडे वाटचाल, रणगाडे आणि क्षेपणास्त्रांनी सज्ज रशियाने युक्रेनला घेरलं, अमेरिकेचीही उडी
| Updated on: Apr 13, 2021 | 2:35 AM
Share

Russia Ukraine Tension मॉस्को : रशियाने युरोपमधील दुसऱ्या क्रमांकाच्या युक्रेन (Ukraine) देशाला चारही बाजूंनी घेरलंय. रशियाचे हजारो रणगाडे आणि क्षेपणास्त्र युक्रेनभोवती तैनात करण्यात आलेत. सातत्याने बिघडत असलेल्या परिस्थितीमुळे युरोपमध्ये सध्या हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. जर्मनीने रशियाला सैन्य मागे घेण्याचं आवाहन करुनही रशियाने आपलं सैन्य मागे घेतलेलं नाही (Russia Ukraine at War). रशियाची आक्रमक भूमिका पाहून अमेरिकेने देखील यात उडी घेतलीय. अमेरिका पुढील आठवड्यात काळ्या समुद्रात आपल्या दोन युद्धनौका पाठवण्याची तयारी करतोय (Russia Ukraine Donbass). त्यामुळे एकूणच जागतिक महायुद्धासारखी परिस्थिती तयार झालीय (Russia Ukraine in war mode America is going to participate situation of world war).

रशियाने पूर्व यूरोपमधील डोनबास या वादग्रस्त भागात आपलं सैन्य तैनात केलंय. या भागावर 2014 मध्ये रशिया समर्थक बंडखोरांनी ताबा घेतला आहे (Russia Ukraine Conflict 2014). सॅटेलाईट आणि सोशल मीडियावरील फोटोंवरुन हे स्पष्ट आहे की रशियाने पूर्व डोनबासच्या वोरोनेक आणि क्रासनोडरमध्ये रणगाडे तैनात केले आहेत. क्रेमलिन प्रवक्ता दमित्री पेस्कोव म्हणाले, “पू्र्व यूक्रेनमध्ये परिस्थिती खूप ‘अस्थिर’ आहे. यामुळे युद्धाचा धोका वाढलाय. अमेरिकेने युक्रेनच्या सीमेवर रशियाचे सैनिक असल्याबद्दल चिंता व्यक्त केलीय.” दुसरीकडे रशियानं आम्ही काहीही चूक करत नसल्याचा दावा केलाय.

जेलेंस्की फ्रंटलाईनवर पोहचले

या तणावपूर्ण स्थितीत यूक्रेनचे राष्ट्रपती व्लोदिमीर जेलेंस्की (Volodymyr Zelenskiy) गुरुवारी थेट फ्रंटलाईनवर आले आणि त्यांनी एकूणच परिस्थितीची पाहणी केली. दुसरीकडे पुतिन यांच्या वरिष्ठ सहकाऱ्याने युक्रेनला इशारा दिलाय. युक्रेनने रशियाच्या कोणत्याही नागरिकावर अत्याचार करण्यास सुरुवात केल्यास तो ‘युक्रेनचा शेवट होण्याची सुरुवात असेल (Russia Ukraine Border Crisis).” रशियाचे राष्ट्रपती प्रशासनाचे उप प्रमुख दमित्री कोजाक म्हणाले, “रशिया पहिल्यांदा हल्ला करणार नाही. मात्र, युक्रेनने रशियाविरोधात पाऊल उचललं तर युक्रेनच्या पायावर नाही तर तोंडावर गोळ्या झाडल्या जातील.”

अमेरिकेने तुर्कीकडून परवानगी मागितली

अमेरिकेने आपले युद्ध जहाज तुर्कीच्या हद्दीतून पाठवण्यासाठी परवानगी मागितली आहे. बोसफोरसच्या मार्गे अमेरिका हे जहाज पाठवणार आहे. तुर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयाने याला दुजोरा दिलाय. अमेरिकेचे जहाजं 14 आणि 15 एप्रिलला तुर्कीतून जातील. नुकतेच युक्रेनने नाटोमध्ये सहभागी होण्यासाठी प्रयत्न वाढवले आहेत. त्याला अमेरिकेने पाठिंबा दिलाय. यावर रशियाने नाराजी व्यक्त केलीय (Russia Ukraine Relations).

हेही वाचा :

History : 19 वर्षे सुरु राहिलेला रक्तरंजित संघर्ष, 20 लाखांहून अधिक लोकांचे बळी, अखेर ‘या’ देशातून अमेरिका बाहेर पडला

4 लाख मुलांचा मृत्यू होण्याची शक्यता, 12 लाख गरोदर महिलांवरही संकट, UN चा गंभीर इशारा

‘या’ देशात 5 लाख लोकांचा बळी, आता कुपोषणाचं संकट, भारताचा मदतीचा हात

व्हिडीओ पाहा :

Russia Ukraine in war mode America is going to participate situation of world war

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.