Russia Ukraine War Live : रशिया आणि यूक्रेन यांच्यातील चर्चा स्थगित, उद्या पुन्हा चर्चेला सुरुवात
Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूजसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर
युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये युद्ध सुरूच आहे. आज या युद्धाचा 19 वा दिवस आहे. रशियाकडून युक्रेनमध्ये करण्यात येत असलेल्या हल्ल्यात युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. युक्रेनमधील अनेक मोठी शहरं ओस पडली आहेत. युद्धाच्या भीतीपोटी बारा लाखांहून अधिक नागरिकांनी स्थलांतर केले आहे. अनेक युक्रेनियन नागरिक शेजारच्या पोलंडच्या आश्रयाला गेले आहेत. या युद्धात जीवित आणि वित्तीहानी देखील मोठ्याप्रमाणात झाली आहे. दरम्यान सयुक्त राष्ट्र संघाने केलेल्या दाव्यानुसार या युद्धात आतापर्यंत 596 सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर 1,067 पेक्षा अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.
LIVE NEWS & UPDATES
-
रशिया आणि यूक्रेन यांच्यातील चर्चा स्थगित, उद्या पुन्हा चर्चेला सुरुवात
रशिया आणि यूक्रेन यांच्यातील चर्चा आज देखील कोणत्याही निर्णयाशिवाय संपली. यूक्रेन आणि रशिया यांच्यातील चर्चा उद्या पुन्हा सुरु होईल. बेलारुसच्या सीमेवर तीन वेळा चर्चा निष्फळ ठरली होती. त्यानंतर 10 मार्चला दोन्ही देशात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झाली होती.
-
रशिया आणि यूक्रेन यांच्या चर्चा सुरु, इस्त्राईल मध्यस्थी करणार
रशिया आणि यूक्रेन यांच्यात चर्चा सुरु झाली आहे. रशिया आणि यूक्रेन वादात आता इस्त्राईल मध्यस्थी करणार आहे.
-
-
रशियाचे यूक्रेनवर हल्ले सुरुच, मारियुपोलमध्ये 2200 जणांचा मृत्यू
रशियाकडून यूक्रेनवर हल्ले सुरु आहेत. मारियुपोल शहरावर हल्ले करण्यात आले आहेत. मारियुपोलमध्ये 2200 लोक मारले गेले आहेत, अशी माहिती समोर आली आहे.
-
रशियाचा पुन्हा एकदा कीवमधील रहिवासी इमारतीवर हल्ला, एक ठार
रशियाने पुन्हा एकदा कीवमधील रहिवासी इमरतीवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात इमारातीचे मोठे नुकसान झाले असून, एक जण ठार तर तीन जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
At least one person was killed and three injured when a shell hit a residential building in Ukraine’s Kyiv today morning: Reuters
(Photo source: Reuters) pic.twitter.com/n8hThxEeTU
— ANI (@ANI) March 14, 2022
-
युक्रेनची राजधानी कीव ताब्यात घेण्याच्या रशियन सैनिकांच्या हालचालींना वेग
रात्रभर कीववर मिसाईल आणि बॉम्बहल्ले
नागरिक दहशतीखाली, बंकरमध्ये घेतला आश्रय
कीवमध्ये रेड अलर्ट, युद्धाचे सायरन सुरूच
-
-
पुतीन यांच्या मुलीच्या घरात अज्ञात व्यक्तींचा प्रवेश
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची मुलगी फ्रान्समध्ये वास्तव्यास आहे. युक्रेन रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर काही अज्ञात व्यक्तींनी पुतीन यांच्या मुलीच्या घरात प्रवेश केला व त्यांनी युक्रेनमधून फान्समध्ये आलेल्या शर्णार्थींना घरात आश्रय देण्याची मागणी केली.
-
अमेरिकेकडून रशियाने केलेल्या हल्ल्याचा निषेध
रशियाकडून पोलंडच्या सीमेजवळील यव्होरीव्ह येथील इंटरनॅशनल सेंटर फॉर पीसकीपिंग अँड सिक्युरिटीवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्याचा अमेरिकेने निषेध केला असून, रशियाने ही क्रुरता थांबवावी असे म्हटले आहे.
-
युक्रेनच्या खारकीव शहरात रशियाकडून बॉम्ब हल्ले
युक्रेनच्या खारकीव शहरात रशियाकडून बॉम्ब हल्ले, मानवी वस्तीत बॉम्बस्फोट
-
रशिया, युक्रेन युद्धाबाबत अमेरिका आणि फ्रान्समध्ये चर्चा
रशिया, युक्रेन युद्धाबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यामध्ये चर्चा झाली असून, यावेळी दोनही नेत्यांनी रशियाचा निषेध केला. त्याचबरोबर युक्रेनला पाठिंबा असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले, अशी माहिती व्हाईट हाऊसकडून देण्यात आली आहे.
-
रशियन सैनिकांचे युक्रेनमध्ये हवाई हल्ले सुरूच
रशियन सैनिकांचे युक्रेनमध्ये हवाई हल्ले सुरूच
19 शहरांमध्ये रेड अलर्ट
युक्रेन सैनिकांचे रशियन सैनिकांना प्रत्युत्तर
Published On - Mar 14,2022 6:14 AM