Video : युक्रेनच्या बॉर्डरवर भारतीयांना मारहाण, लाथा, बुक्क्या घालतानाचे व्हिडिओ व्हायरल

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मारहाण होत असल्याचे धक्कादायक व्हिडिओ समोर आल्याने खळबळ माजली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या काही विद्यार्थ्यांकडून हे व्हिडिओ ट्विट करण्यात आले आहेत.

Video : युक्रेनच्या बॉर्डरवर भारतीयांना मारहाण, लाथा, बुक्क्या घालतानाचे व्हिडिओ व्हायरल
युक्रेनच्या सीमेवर भारतीयांना मारहाणImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Feb 27, 2022 | 11:48 PM

युक्रेनमध्ये युद्धाच्या (Russia Ukraine War) तडाख्यात अनेक भारतीय (Indian Students in Ukraine) अडकले आहेत. भारतीयांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आता सोशल मीडियावर आणि माध्यमापर्यंत काही असे व्हिडिओ पोहोचले आहेत, जे पाहून काळजाचा थरकाप उडेल. कारण युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मारहाण होत असल्याचे धक्कादायक व्हिडिओ समोर आल्याने खळबळ माजली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या काही विद्यार्थ्यांकडून हे व्हिडिओ ट्विट करण्यात आले आहेत. त्यामुळे भारतीयांची चिंता आणखी वाढली आहे. फक्त स्थानिक नागरिकांना प्रवेश देत पोलंड बॉर्डरवर (Poland Border Video) भारतीयांना बाजुला काढण्यात येत आहे. एवढेच नाही तर त्यांना लाथा, बुक्क्यांनी मारहाणही करण्यात येत आहे. जे भारतीय स्थलांतर करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यावर सैन्य आणि स्थानिक पोलिसांकडून लाठीमार करण्यात आल्याच्याही घटना समोर आल्या आहे. ही मारहाण विद्यार्थ्यांच्या घरच्यांनाही अस्वस्थ करणारी आहे. प्रशासनाने तातडीने यावर मार्ग काढत विद्यार्थ्यांची सुटका करावी, अशा याचना करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण आहे.

मारहाणीचे व्हिडिओ

सैन्याला विनवण्या करूनही मारहाण

हे व्हिडिओ समोर आल्यानंतर खळबळ माजली आहे. हा संघर्ष आणि ही मारहाण युक्रेन आणि पोलंडच्या बोर्डरवरील असल्याचे अडकलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले आहे. यात फक्त मुलांनाच नाही तर भारतीय मुलींनाही मारहाण करण्यात आली आहे. पोलंडमध्ये केवळ युक्रेनच्या नागरिकांनाच सध्या प्रवेश दिला जातोय. भारतीयांना सैन्याकडून प्रवेश नाकारण्यात येत आहे. सैन्याला विनवण्या केल्यानंतरही सैन्याकडून मारहाण झाल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले आहे. यावेळी युक्रेनचे नागरिक आणि रशियन सैन्य असाही लढा होताना पहायला मिळत आहे. युक्रेनच्या नागरिकांकडून रशियन सैन्याला घेराव घालण्यात येत आहे. युक्रेनकडून रशियाच्या चर्चेचा प्रस्ताव स्वीकर झाल्याने आता तरी हे युद्ध संपेल अशी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

चर्चेचा मार्ग मोकळा

तातडीने बाहेर काढण्याच्या याचना

आजच दिल्लीत युक्रेन आणि रशिया युद्धाच्या पार्श्वभूमिवर मोदींनी तातडीची बैठक घेतली आहे. यात भारतींना तातडीने परत आणण्याबाबात चर्चा झाली आहे. अनेक भारतीयांना सुखरुप परत आणण्यात यशही आले आहे. मात्र अजूनही मोठ्या संख्येने लोक युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यात अनेक महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. सोशल मीडिया वर इतर मार्गाने संपर्क साधण्याचा प्रयत्न हे विद्यार्थी करत आहेत. मात्र या युद्धाच्या विध्वंसात अनेकांचे मोठे हाल होत आहेत. अनेकांना अन्न, पाण्यावाचून भटकंती करावी लागत आहे. सैन्याच्या अत्याचाराचा सामना करावा लागत आहे. यातून सुटका करण्याची याचना या विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

मोदींनी घेतली बैठक

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.