Russia Ukraine War : गुगलने रशियाच्या नाड्या आवळल्या, बंद केले हे सरकारी मीडिया अॅप

युद्ध थांबवण्यासाठी रशियावर दबाव टाण्याचा जोरदार प्रयत्न अमेरिकेकडून (Us)होत आहे. मात्र रशिया काही केल्या नरमाईची भूमिका घ्यायला तयार होत नाहीये. त्यामुळे आता अमेरिकेने रशियाची कोंडी करण्याचा घाट घातला आहे.

Russia Ukraine War : गुगलने रशियाच्या नाड्या आवळल्या, बंद केले हे सरकारी मीडिया अॅप
यूक्रेन-रशियाच्या युद्ध स्थितीच्या केंद्रस्थानी आहेत रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन. Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Mar 02, 2022 | 4:03 PM

रशियायुक्रेन युद्धाची (Russia Ukraine War) दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. युद्ध थांबवण्यासाठी रशियावर दबाव टाण्याचा जोरदार प्रयत्न अमेरिकेकडून (Us)होत आहे. मात्र रशिया काही केल्या नरमाईची भूमिका घ्यायला तयार होत नाहीये. त्यामुळे आता अमेरिकेने रशियाची कोंडी करण्याचा घाट घातला आहे. आता गुगलने (Google App) रशियातील अनेक सरकारी मीडिया अॅप बंद केली आहे. त्यामुळे रशियाच्या नाड्या आवळल्या गेल्या आहे. रशियन नागरिकांना आणि सैन्याला याचा मोठा फटका बसत आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात गुगलने रशियन मीडिया चॅनेल ब्लॉक केले आहेत. गुगलने ही माहिती दिली आहे. कंपनीने Google Play Store वर RT News आणि Sputnik शी संबंधित मोबाईल अॅप्स ब्लॉक केले आहेत. याआधी यूट्यूबने या दोन्ही माध्यमांशी संबंधित यूट्यूब चॅनेलवर बंदी घातली होती. त्यामुळे रशियाच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहेत.

मुस्कटदाबीने रशिया नमणार?

अनेक टेक कंपन्यांनी सरकारी मीडिया अॅप बंद केले आहेत. गुगलप्रमाणचे अॅप्पलनेही रशियाशी कठोर भूमिका घेतली आहे. अॅप्पलनेही हे चॅनल त्यांच्या प्ले स्टोरवरून हटवले आहेत. हे चॅनल बंद करताना चुकीची माहिती पुरवल्याचा आरोप यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणावर RT चे उपसंपादक-इन-चीफ अण्णा बेल्किना यांनी सांगितले की, टेक कंपन्यांनी कोणत्याही पुराव्याशिवाय त्यांच्या मीडिया आउटलेटवर बंदी घातली आहे. मात्र, स्पुतनिकने याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. गुगलने या दोन्ही न्यूज साइट्सचे अॅप युरोपमधील प्ले स्टोअरवर ब्लॉक केले आहेत.

यूट्यूबकडूनही रशियाची कोंडी

दुसरीकडे यूट्यूबही यांची अशाच प्रकारे कोंडी करत आहे. YouTube ने जाहिरातींद्वारे त्यांची कमाई थांबवली होती. फेसबुकच्या मेटा कंपनीनेही अशी पावले उचलली आहेत. मेटाने माहिती दिली होती की युरोपीय देशांच्या मागणीनुसार रशियन मीडियाला युरोपमधील त्यांच्या सर्व प्लॅटफॉर्मवर ब्लॉक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय गुगलने युक्रेनमध्ये गुगल मॅपचे लाईव्ह ट्रॅफिक फीचर बंद केले आहे. Apple ने Apple Maps चे ट्रॅफिक आणि लाइव्ह घटना दिसण्याचे बंद केले आहे. याशिवाय अॅपलने रशियामध्ये आपल्या उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घातली असून अॅपल पेची सेवाही बंद केली आहे.

Breaking News: तिसरं महायुद्ध हे अणूयुद्ध असेल, पुतिनचे इरादे रशियाच्या परराष्ट्र मंत्र्याकडून जाहीर

Video: तिरंगा आहे तर सुरक्षा आहे, यूक्रेनमध्ये जेव्हा तुर्की, पाकिस्तान्यांनाही तिरंग्यानं वाचवलं !

Russia-Ukraine War: रशियात नोटाबंदी सारखी स्थिती, एटीएम, बँका बंद; पैसे काढण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.