Russia Ukraine War : रशियाने कीव शहरातील TV टॉवरवर हल्ला चढवला, 5 जणांचा मृत्यू, सिग्नल यंत्रणेत बिघाड
रशियाने कीव शहरातील टेलिव्हिजन टॉवरवर हल्ला केलाय. यूक्रेनच्या गृहमंत्राल्याचे सल्लागार एन्टोन हेराशेंको यांनी सांगितलं रशियाच्या हल्ल्यामुळे सिग्नल यंत्रणेत बिघाड झालाय. न्यूज एजन्सी रॉयटर्सने याबाबतची माहिती दिलीय.
मुंबई : रशियन सैन्याने (Russia Military) अखेर यूक्रेनची (Ukraine) राजधानी कीव (Kyiv) शहरावर हल्ला चढवलाय. रशियाने कीव शहरातील टेलिव्हिजन टॉवरवर हल्ला केलाय. या हल्ल्यात 5 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. यूक्रेनच्या गृहमंत्राल्याचे सल्लागार एन्टोन हेराशेंको (Anton Herashchenko) यांनी सांगितलं रशियाच्या हल्ल्यामुळे सिग्नल यंत्रणेत बिघाड झालाय. न्यूज एजन्सी रॉयटर्सने याबाबतची माहिती दिलीय. या हल्ल्याचा एक व्हिडीओही समोर आलाय. स्थानिक पत्रकार इलिया पोनोमारेंको यांनी सांगितलं की स्थानिक अधिकाऱ्यांनी टॉवरची दुरुस्ती आणि प्रसारण सुरु करण्याचं आश्वासन दिलंय. दरम्यान, हल्ल्यापूर्वी रशियाने कीव शहरातील नागरिकांना शहर सोडून जाण्याची सूचना केली होती.
रशियाच्या हल्ल्यानंतरही टेलिव्हिजन टॉवर अद्यापही उभा आहे. मात्र, सिग्नल बाधित झाल्यामुळे कामकाज प्रभावित झालं आहे. या हल्ल्यामुळे झालेल्या धमाक्याचा आवाज संपूर्ण शहरात ऐकायला मिळाला. तसंच टॉवरजवळ मोठ्या प्रमाणात धुराचं साम्राज्य पसरल्याचं दिसून आलं. दरम्यान, रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी घोषणा केली होती की, रशियाविरोधात माहिती दडपण्याच्या कारणामुळे कीवमध्ये 72व्या ‘मेन सेंटर ऑफ इन्फोर्मेशन सायकोलॉजिकल ऑपरेशन’ आणि यूक्रेनच्या सुरक्षा सेवा सुविधेवर हल्ला करणार आहे. या इमारतींच्या आसपास राहणाऱ्या लोकांनी घराबाहेर पडण्याची सूचना रशियाने केलीय.
Russian forces have attacked a television tower in Ukraine’s capital Kyiv, potentially disrupting its signal, Ukrainian Interior Ministry adviser Anton Herashchenko says: Reuters #RussianUkrainianCrisis
— ANI (@ANI) March 1, 2022
यूरोपियन यूनियनमध्ये जेलेन्स्की यांना स्टॅन्डिंग ओवेशन
यूक्रेनचे पंतप्रधान वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी मंगळवारी यूरोपीय यूनियनमध्ये संबोधित केलं. आपल्या संबोधनात दरम्यान जेलेन्स्की भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. आपल्या संबोधनात जेलेन्स्की म्हणाले की स्वत:ला यूरोपियन यूनियनमध्ये पाहून आनंद झाला. आपल्याला इथं येण्यासाठी एवढी किंमत मोजावी लागेल हा विचार केला नव्हता. रशिया आमच्या रहिवासी भागाला निशाणा बनवतोय. आम्ही हजारो यूक्रेनी नागरिकांना गमावलं आहे, अशी खंत जेलेन्स्की यांनी व्यक्त केलीय. महत्वाची बाब म्हणजे यूरोपियन यूनियनमध्ये जेलेन्स्की यांना संबोधनानंतर स्टॅन्डिंग ओवेशन मिळाली.
Ukraine President Volodymyr Zelenskyy received a standing ovation after his address at European Parliament, said, “We’re fighting for our land & our freedom despite the fact that all our cities are now blocked. Nobody is going to break us, we’re strong, we’re Ukrainians.” he said pic.twitter.com/7JEU2Da9xd
— ANI (@ANI) March 1, 2022
इतर बातम्या :