Russia Ukraine युद्धात USA ची एंट्री? रशियाने अमेरिकेच शक्तीशाली फायटर विमान पाडलं

Russian Fighters shoot down American Reaper Drone : कुठे झाली ही कारवाई? अमेरिका-रशियाच सैन्य अलर्टवर. दरम्यान आता या युद्धाला एक वेगळं वळणं लागू शकतं.

Russia Ukraine युद्धात USA ची एंट्री? रशियाने अमेरिकेच शक्तीशाली फायटर विमान पाडलं
Russia vs AmericaImage Credit source: AFP
Follow us
| Updated on: Mar 15, 2023 | 8:03 AM

Russian Fighters shoot down American Reaper Drone : सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये भीषण युद्ध सुरु आहे. हे युद्ध जिंकण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आपली पूर्ण ताकत पणाला लावली आहे. या युद्धात रशियाला यश मिळू नये, यासाठी अमेरिका पडद्याआडून प्रयत्न करतेय. त्यांनी युक्रेनला अनेक घातक शस्त्रांचा पुरवठा केलाय. त्यामुळे युक्रेन या युद्धात अजून तग धरुन आहे. रशियाला युक्रेन विरोधात पूर्ण विजय मिळवता येत नाहीय. दरम्यान आता या युद्धाला एक वेगळं वळणं लागू शकतं.

कदाचित रशिया-युक्रेन युद्धात अमेरिकेची थेट एंट्री होऊ शकते किंवा अमेरिका युक्रेनला फायटर जेट्सचा पुरवठा करेल. त्यामुळे दोन्ही देशात शांतता निर्माण होण्याऐवजी युद्ध आणखी भडकू शकतं.

अमेरिकेच कुठलं विमान पाडलं?

रशिया-.युक्रेन युद्धा दरम्यान युक्रेनच्या सीमेजवळ ब्लॅक सी मध्ये अमेरिका आणि रशियाची फायटर विमानं आमने-सामने आली. त्यावेळी रशियन फायटर जेट्सनी अमेरिकेच MQ-9 रीपर ड्रोन पाडलं. MQ-9 रीपर ड्रोन हे अमेरिकेच शक्तीशाली विमान आहे. टेहळणी बरोबरच जमिनीवर असलेल्या शत्रूवर हवाई हल्ले करण्यासाठी अमेरिकेकडून या ड्रोनचा वापर करण्यात येतो.

आकाशात काय घडलं?

ब्लॅक सी मध्ये रशियन रडारने अमेरिकन ड्रोनला ट्रॅक केलं. ब्लॅक सी मध्ये दोन्ही देशांची फायटर विमानं आमने-सामने आल्यानंतर रशियन फायटर जेट्सनी ड्रोनला धडक दिली. त्यामुळे MQ-9 रीपर ड्रोनच्या प्रोपेलरचा नुकसान झालं. परिणामी अमेरिकेच हे विमान काळ्या समुद्रात कोसळलं. अमेरिकेने आपलं ड्रोन पाडल्याच मान्य केलं असून रशिया-अमेरिका दोन्ही देशांच सैन्य अलर्ट मोडवर आहे. अमेरिकी अधिकाऱ्याने काय सांगितलं?

अमेरिकी रीपर ड्रोन आणि रशियाच्या दोन फायटर जेट्सच SU-27 ब्लॅक सी मधील आंतरराष्ट्रीय हवाई हद्दीत उड्डाण सुरु होतं. त्यावेळी एक जेट जाणूनबुजून ड्रोनच्या समोर आलं व त्यांनी तेल फेकण्यास सुरुवात केली. त्यानंतर जेटने रीपर ड्रोनच्या प्रोपेलरच नुकसान केलं. हा प्रोपेलर ड्रोनच्या मागच्या बाजूला असतो, असं अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितलं. या धडकेमुळे अमेरिकन ड्रोन काळ्या समुद्रात कोसळलं.

'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.