AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

stinger missile च्या जोरावर युक्रेन म्हणतोय “झुकेगा नहीं साला”,  कसं आहे रशियाचं कंबरडं मोडणारं मिसाईल?

ज्याच्यापुढे रशियाची बलाढ्या आणि आधुनिक मिसाईलही सध्या फिकी पडली आहे. या ब्रम्हास्त्राचे नाव आहे stinger missile ज्याने रशियालाही व्याकूळ करून सोडलंय. बलाढ्य रशियाचाही या मिसाईलपुढे नाईलाज झाला आहे.

stinger missile च्या जोरावर युक्रेन म्हणतोय झुकेगा नहीं साला,  कसं आहे रशियाचं कंबरडं मोडणारं मिसाईल?
रशियावर भारी पडणारं मिसाईलImage Credit source: Aaj Tak
| Updated on: Feb 28, 2022 | 7:51 PM
Share

युक्रेन : जगात सध्या युक्रेन आणि रशिया युद्धाचे (Russia Ukraine War) जोरदार धमाके सुरू आहेत. गेल्या अनेक दिवासापासून रशिया युक्रेनला गुडघे टेकावायला भाग पाडत आहे. मात्र तरीही न झुकता युक्रेन पुऱ्या ताकदीने रशियाला टक्कर देत आहे. युद्धात एकटा पडलेला छोटासा देश युक्रेन एवढ्या बलाढ्य, सामर्थ्यशाली रशियाशी कशाच्या जोरावर लढतोय. युक्रेनकडे नेमकं काय आहे. ज्याच्या जोरावर युक्रेन (Ukraine) अजूनही झुकला नाही. याचे उत्तर रशियासह प्रसार माध्यमेही सोधत आहे. याच प्रश्नाचे उत्तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय. युक्रेनकडे एक असे मिसाईल (stinger Missile) आहे. ज्याच्यापुढे रशियाची बलाढ्या आणि आधुनिक मिसाईलही सध्या फिकी पडली आहे. या ब्रम्हास्त्राचे नाव आहे stinger missile ज्याने रशियालाही व्याकूळ करून सोडलंय. बलाढ्य रशियाचाही या मिसाईलपुढे नाईलाज झाला आहे.

मिसाईलचे किती प्रकार?

स्टिंगर मिसाईल एक मॅन-पोर्टेबल एअर डिफेन्स सिस्टम (MANPADS) आहे. हे इन्फ्रारेड होमिंग सरफेस टू एअर मिसाइल (SAM) आहे. याच्या मदतीने तुम्ही हेलिकॉप्टर, फायटर जेट, टँक किंवा कोणत्याही प्रकारचे वाहन उडवू शकता. स्टिंगर मिसाईलचे सध्या 13 प्रकार आहेत. जे वेगवेगळ्या प्रकारे वापरले जातात. पण प्रामुख्याने वापरात तीनच प्रकार आहेत. पहिला – स्टिंगर बेसिक, दुसरा – स्टिंगर पॅसिव्ह ऑप्टिकल सीकर टेक्निक (POST) आणि तिसरा – स्टिंगर – रीप्रोग्रामेबल मायक्रोप्रोसेसर. हे मिसाईल एवढे खररनाक आहे की ज्याने रात्रीच्या अंधारातही त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो. त्यामुळेच रशियाशी टक्कर देणे युक्रेनला शक्य झाले आहे.

मिसाईलची खासियत काय?

हे मिसाील हताळायला अतिशय छोटे आणि हलके आहे. त्यामुळे सैनिकांना याचा कुठेही वापर करताना जास्त अडचण येत नाही. त्यामुळे रात्रीच्या अंधारातही रशियावर युक्रेनचे सैनिक हल्ला चढवत आहेत. याचे बेसिक मॉडेल केवळ 15 किलो वजनाचे आहे. ज्यात मिसाईलचे वजन हे फक्त 10 किलो आणि लॉन्चरचे वजन हे 5 किलो आहे. एक सैनिक हे मिसाईल खांद्यावर घेऊन कुठेही फिरू शकतो. या मिसाईलला जगातील सगळ्यात खतनाक हत्यावर मानलं जातं. हे सर्वात यशस्वी ठरलेलं ब्रम्हास्त्र आहे, असे युक्रेनियन सैन्याचे सांगणे आहे. हे मिसाईल सुपसॉनिक स्पीडने टार्गेटवर हल्ला करते. हे मिसाईल कोणत्याही लढाऊ विमानाला पाडू शकते. कारगिल युद्ध, अफगाणिस्तान युद्ध, इराक युद्ध, सीरिया युद्ध, आखाती युद्ध, श्रीलंका गृहयुद्ध, फॉकलँड युद्ध, लिबिया युद्ध, युगोस्लाव युद्ध, चेचेन युद्ध आणि आता रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धात स्टिंगर मिसाईल्सचा वापर केला जात आहे. हेच मिसाईल सध्या प्रामुख्याने युक्रेनला तारत आहे.

‘ब्लादिमीर पुतिन कधीही अणुबॉम्ब टाकू शकतात, 3 देशांना सर्वात मोठा धोका’, जेलेन्स्की यांच्या माजी प्रवक्त्याचा दावा

Russia Ukraine War : रशियाला रोखण्यासाठी युक्रेनचा मास्टर स्ट्रोक, जेलमधील कैदी उतरणार युद्धभूमिवर

बेलारूसची रशियाला मदत; रशिया बेलारूसमध्ये अण्वस्त्रे तैनात करणार? युक्रेनचे टेन्शन वाढले

300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.