Russia Ukrane War : …तर, अख्खा युरोप ‘गॅस’वर, कच्च्या तेलाचा भाव 300 डॉलर; रशियाची आगपाखड!

रशियाची आर्थिक कोंडी करण्यासाठी अमेरिकासहित युरोपीय राष्ट्रांनी धोरणात्मक पावलं उचलली आहेत. अमेरिका, युरोप आणि अन्य राष्ट्रे एकत्रित येऊन रशियाच्या उर्जा पुरवठ्याला ब्रेक लावण्याच्या तयारीत आहेत.

Russia Ukrane War : …तर, अख्खा युरोप 'गॅस'वर, कच्च्या तेलाचा भाव 300 डॉलर; रशियाची आगपाखड!
रशियाची आर्थिक कोंडी करण्यासाठी अमेरिकासहित युरोपीय राष्ट्रांनी धोरणात्मक पावलंImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 08, 2022 | 6:32 PM

नवी दिल्ली : रशिया-युक्रेन वाद (Russia-Ukraine crisis) दिवसागणिक चिघळत चालला आहे. आगामी काळात नव्या समस्यांना तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रशियाची आर्थिक नाकेबंदी करण्यासाठी युरोपीय राष्ट्रांनी उचललेल्या पावलांवर रशियानं अख्खा जगालाच गर्भित इशारा दिला आहे. रशियाच्या उर्जा पुरवठ्यावर बंदी आणण्याचा प्रयत्न केल्यास पश्चिमीय राष्ट्रांना 300 डॉलर प्रति बॅरेल (Crude oil price) भावाने कच्चे तेल खरेदी करावे लागेल असे इशारा रशियानं दिला आहे. रशिया-जर्मनी गॅस पाईपलाईन (RUSSIA-GERMANY PIPELINE) बंद करण्याचा देखील इशारा रशियाच्या उच्चपदस्थांनी दिला आहे. रशियाची आर्थिक कोंडी करण्यासाठी अमेरिकासहित युरोपीय राष्ट्रांनी धोरणात्मक पावलं उचलली आहेत. अमेरिका, युरोप आणि अन्य राष्ट्रे एकत्रित येऊन रशियाच्या उर्जा पुरवठ्याला ब्रेक लावण्याच्या तयारीत आहेत. सर्व आंतरराष्ट्रीय घडामोडींचे पडसादामुळे वर्ष 2008 नंतर कच्च्या तेलाचे भाव पहिल्यांदाच 130 डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचले आहेत.

रशियासाठी तेलच सर्वस्व

रशियाचे उपप्रंतप्रधान नोवक यांचं विधान समोर आलं आहे. रशियन तेलाच्या खरेदीला ब्रेक लागल्यास गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेलं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीचा आगडोंब उसळेल असे नोवक यांनी म्हटलं आहे. रशियाने कच्च्या तेलाची कोठारं सवलतीच्या दरात खुली केली आहेत. मात्र, युरोपीय राष्ट्रांच्या दबावामुळं तेलाची खरेदी करण्यासाठी कोणतेही राष्ट्र पुढं धजावत नाही. रशियाची अर्थव्यवस्था कच्च्या तेलाच्या निर्यातीवर अवलंबून आहे. कच्च्या तेलाच्या निर्यातीला ब्रेक लागल्यास रशियाची अर्थव्यवस्था डळमळू शकते.

युरोप रशियाचा आयातदार

रशियामधून रशियासाठी कच्चा तेलाची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. रशिया सर्वात मोठा तेल उत्पादक देश मानला जातो. रशियात दररोज 11 मिलियन बॅरेल तेलाचं उत्पादन घेतलं जातं. त्यापैकी अर्धा भाग निर्यात केला जातो. निर्यातीच सर्वाधिक प्रमाण युरोपीय राष्ट्रात आहे. रशियातून युरोपला दररोज नियमित स्वरुपात 2.5-3 बॅरेल तेल निर्यात केलं जातं. त्यामुळे रशियानं तेलाची निर्यात बंद केल्यास युरोपला मोठ्या संघर्षझळा सोसाव्या लागू शकतात असा इशारा नोवक यांनी दिला आहे.

जर्मनीचा रेड सिग्नल:

उपपंतप्रधान नोवक यांनी केवळ तेलच नव्हे तर युरोपला रशियातून गॅस पुरवठा केला जातो. त्यामुळे रशियावर निर्बंध लादल्यास जगाला परिणामांना सामोरं जावं लागेल असे नोवक यांनी म्हटलं आहे. युक्रेन विवादामुळं जर्मनीनं गेल्या महिन्यात रशियाला नॉर्ड स्ट्रीम-2 गॅस पाईपलाईनला सर्टिफिकेशन देण्यास नकारघंटा दर्शविली होती.

संबंधित बातम्या :

रशियाने युक्रेनवर टाकला 500 किलोचा बॉम्ब, युक्रेनच्या मंत्र्यांचा खळबळजनक दावा

आठवड्याभरात रशियाच्या दोन अधिकाऱ्यांना मारल्याचा युक्रेनचा दावा, अधिका-यांनी युद्धात बजावली होती महत्त्वाची भूमिका

यूक्रेनच्या पाटलाची तऱ्हा न्यारी, मायदेशी जाईन तर बिबट्या आणि पँथरसह!, भारत सरकारसमोर पेच

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.