Vladimir Putin | मोठी बातमी! रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन बेडरुममध्येच कोसळले, एकच खळबळ

Vladimir Putin | इस्त्राईल-हमास युद्धामुळे तसेच रशिया-युक्रेन युद्धामुळे जाग तिसऱ्या युद्धाकडे सरकत आहे. त्यातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे त्यांच्या बेडरुममध्येच कोसळल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यामुळे जगभरात एकच खळबळ उडाली आहे. पुतीन यांच्या युक्रेन युद्धाला खुद्द रशियातील जनतेचा विरोध आहे. दरम्यान ही बातमी समोर आली आहे.

Vladimir Putin | मोठी बातमी! रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन बेडरुममध्येच कोसळले, एकच खळबळ
Follow us
| Updated on: Oct 24, 2023 | 3:03 PM

नवी दिल्ली | 24 ऑक्टोबर 2023 : सध्या जगाच्या चर्चेचा केंद्रबिंदू अमेरिका, रशिया, चीनसोबत भारत हा आहे. रशियाने गेल्या वर्षी युक्रेनवर हल्ला चढवला. तर आता इस्त्राईल-हमास युद्धामुळे जग तिसऱ्या महायुद्धाच्या भीतीच्या छायेखाली वावरत आहे. रशियाने युक्रेनला नाटोचे सदस्यत्व घेण्यास विरोध केला होता. युक्रेनने नकार दिल्याचे परिणाम गेल्या 20 महिन्यांपासून दिसत आहे. तर इकडे इस्त्राईल-हमासच्या युद्धात अमेरिकेने लुडबूड न करण्याचा इशारा रशियाने दिला आहे. त्यातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे त्यांच्या बेडरुममध्येच कोसळल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. काय आहे ही बातमी …

हृदयविकाराचा आला झटका

रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा दावा करण्यात येत आहे. ‘General SVR’ या टेलिग्राम चॅनलने हा दावा केला आहे. ही घटना रविवारी, 22 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजता बेडवरुन खाली पडल्याचा आवाज आला. त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी त्यांच्या बेडरुममध्ये धाव घेतली. त्यावेळी पुतीन हे खाली कोसळलेले दिसले. तातडीने डॉक्टरांना पाचरण करण्यात आले. त्यांना विशेष उपचारांसाठी रुग्णालयात हलविण्यात आले. वृत्तानुसार, या घटनेनंतर क्रेमलिनने लागलीच अलर्ट जारी केला आहे. पुतीन यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु असल्याचे वृत्तात म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

काय झाले नेमके, कळले तरी काय

राष्ट्राध्यक्ष पुतीन हे त्यांच्या बेडरुममध्ये पोहचले. बेडरुममधील टेबलसमोरील खुर्चीत बसले. पण त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांनी टेबलवरील डीश जमिनीवर लोटल्या. त्या पडल्याचा आवाज झाल्याने बाहेरील सुरक्षा रक्षक धावून आले. पुतीन हे जमिनीवर कोसळलेले आढळले. त्यांनी तातडीने तैनात डॉक्टर्सला बोलवले. त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले. तातडीने मदत पोहचल्याने लागलीच उपचार करण्यात आले. त्याचा अनुकूल परिणाम दिसला. पुतीने यांचे हृदय पुन्हा सुरु झाले आणि पुतीन हे शुद्धीत आल्याचा दावा या चॅनलने केला आहे.

बॉडी डबलचा वावर

वृत्तातील दाव्यानुसार, अशात अनेकदा व्लादिमीर पुतीन यांची प्रकृती नाजूक असल्याचे समोर आले आहे. काही व्हिडिओत तर ते अत्यंत थकलेले दिसल्याचा दावा करण्यात येत आहे. युक्रेन युद्ध, बंडखोरीचे पीक, अनेक जवानांची नाराजी यामुळे सध्या पुतीन तणावात असल्याचा दावा करण्यात येत आहे. हुबेहुब त्यांच्यासारखी दिसणारी काही माणसं पुतीन यांची जागा घेत असल्याचा दावा करण्यात येत आहे. या बॉडी डबलचा वावर अनेक ठिकाणी करण्यात येत असल्याचे जागतिक तज्ज्ञांचे मत आहे. ‘General SVR’ या टेलिग्राम चॅनलचा पडताळा करण्यात आलेला नाही.

Non Stop LIVE Update
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.