AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुतिन यांची सीजफायरची घोषणा,सणापुरती युद्धबंदी, यूक्रेनला ईस्टर ब्रेक

रशिया आणि युक्रेन युद्धादरम्यान आता रशियाने युद्धबंदीची घोषणा केली आहे. युद्धविरामाची ही घोषणा मानवीय दृष्टीकोनातून आणि ख्रिस्ती बांधवाच्या सणा निमित्त घेतलेली आहे. या आंतरराष्ट्रीय समुदायाकडून याकडे रशियाने शांततेसाठी उचलले एक पाऊल म्हणून पाहीले जात आहे

पुतिन यांची सीजफायरची घोषणा,सणापुरती युद्धबंदी, यूक्रेनला ईस्टर ब्रेक
| Updated on: Apr 19, 2025 | 9:57 PM
Share

रशिया आणि युक्रेन घमासाम युद्ध सुरु असतानाच एक दिलासादायक वृत्त आले आहे. ईस्टर सणाच्या निमित्ताने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युद्धविरामाची घोषणा केली आहे. हा निर्णय अशा क्षणी घेतला आहे ज्यावेळी दोन्ही देशांतील तणाव परमोच्च पातळीवर पोहचला असून रशियाने नुकत्याच केलेल्या क्षेपणास्र हल्ल्यात अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. युद्धविरामाचा हा निर्णय मानवी सहाय्यता आणि धार्मिक सणाच्या पार्श्वभूमीवर घेतलेला आहे. ज्यास आंतरराष्ट्रीय समुदायाने शांततेचा एक प्रयत्न म्हणून पाहात आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी शनिवारी रात्री ८.३० वाडल्यापासून ते रविवारीच्या मध्यरात्रीपर्यंत युद्धविरामाची घोषणा केली आहे.

पुतीन यांनी का केली सीजफायरची घोषणा

राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी संपूर्णत:मानवी दृष्टीकोनातून हा निर्णय घेतलेला आहे. गुड फ्रायडे नंतर ईस्टर सण्डे हा धार्मिकदृष्ट्या महत्वाचा सण मानला जात आहे. परंतू हा युद्धविराम काही तासांचा आहे. परंतू युद्धाने थकलेल्या लोकांसाठी हा महत्वाचा निर्णय मानला जात आहे.

युद्धविरामाची ही घोषणा मानवीय दृष्टीकोनातून आणि ख्रिस्ती बांधवाच्या दृष्टीकोनातून घेतलेला आहे. या आंतरराष्ट्रीय समुदायाकडून याकडे रशियाने शांततेसाठी उचलले एक पाऊल म्हणून पाहीले जात आहे. काही दिवसांपूर्वी रशियाने मोठा हल्ला करीत युक्रेनच्या रहिवासी इमारतींना लक्ष्य केले होते. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी शनिवार रात्री ८.३० वाजल्यापासून ते रविवारी रात्री उशीरापर्यंत युद्धविराम जाहीर केला आहे.

पुतीन यांनी आशा व्यक्त केली आहे की युक्रेनने देखील या पावलाचे स्वागत करुन त्यांच्याकडूनही युद्धविरामाची घोषणा केली पाहीजेत अशी आशा पुतीन यांनी व्यक्त केली आहे. ते पुढे म्हणाले की जर युक्रेनला खरंच शांतता हवी असेल तर त्यालाही रशियासारखे युद्धविरामाची घोषणा करायला हवी. पुतीन म्हणाले की ईस्टर हा केवळ सण नाही तर दयाळूपणा, आणि अस्तित्वाचे प्रतिक आहे. या निमित्ताने शस्रांना शांत ठेवणेच सर्वात उपयुक्त निर्णय असल्याचेही पुतीन यांनी म्हटले आहे.

युक्रेनने युद्धबंदीचे उल्लंघन केले तर..

पुतीन यांनी यावेळी असाही इशारा दिला की जर युक्रेनकडून युद्धबंदीचे उल्लंघन झाले तर रशियन सैन्य तात्काळ कारवाई करेल असेही पुतिन यांनी स्पष्ट केले आहे. पुतीन यांनी आपल्या लष्करी कमांडरना सैन्याला पूर्णपणे सतर्क ठेवण्याचे आणि कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. याचा अर्थ असा की युद्धबंदी ही एकतर्फी नसते, तर ती परस्पर संमती आणि आदरभाव यांच्यावरच आधारित आहे असेही पुतीन यांनी म्हटले आहे.

युक्रेनकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही

या युद्धबंदीच्या घोषणेनंतर, आता सर्वांच्या नजरा युक्रेनकडे लागल्या आहेत. युक्रेनची कीव सरकार याच दृष्टीने युद्धविराम करीत शांततेसाठी आपला हात पुढे करेल का?, की ही शस्रसंधी देखील पूर्वीसारखीच अयशस्वी ठरेल? रशियाच्या या पावलांवर युक्रेनकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही, परंतु पाश्चात्य देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी या युद्धबंदीकडे संभाव्य चर्चेची सुरुवात म्हणून पाहत आहेत.

मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.