सावधान, कोरोनापासून वाचवणारं सॅनिटायझर तुमच्या मुलाला आंधळं करु शकतं, धक्कादायक खुलासा

कोरोनापासून वाचण्यासाठी सॅनिटायझर वापरणाऱ्यांना धोक्याचा इशारा आहे. नुकताच जागतिक पातळीवर प्रकाशित झालेल्या एका अहवालात सॅनिटायझरच्या धोक्यांचा खुलासा करण्यात आलाय.

सावधान, कोरोनापासून वाचवणारं सॅनिटायझर तुमच्या मुलाला आंधळं करु शकतं, धक्कादायक खुलासा
Follow us
| Updated on: Jan 24, 2021 | 12:04 AM

नवी दिल्ली : कोरोना (Corona) साथीरोगामुळे लोकांच्या दैनंदिन जगण्यात अनेक बदल झालेत. आधी लोक प्रदुषण आणि धुळीपासून संरक्षण करण्यासाठी तोडाला रुमाल बांधायचे. मास्क तर केवळ रुग्णालयांमध्ये डॉक्टरच वापरताना दिसायचे. मात्र, कोरोनामुळे मास्क सर्वसामान्य नागरिकांच्याही आयुष्याचा भाग झालाय. याच प्रकारे सॅनिटायझर (Sanitizer) देखील मोठ्या प्रमाणात वापरलं जातंय. शहरापासून अगदी ग्रामीण भागापर्यंत लोक अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर (Alcohol) वापरत आहेत (Sanitizer eye contact may cause children blind).

असं असलं तरी कोरोनापासून वाचण्यासाठी सॅनिटायझर वापरणाऱ्यांना धोक्याचा इशारा आहे. नुकताच जागतिक पातळीवर प्रकाशित झालेल्या एका अहवालात सॅनिटायझरच्या धोक्यांचा खुलासा करण्यात आलाय. यानुसार हे सॅनिटायझर तुमच्या मुलांना कायमचं अंधत्व देखील आणू शकतं. त्यामुळे मुलांसह संपूर्ण कुटुंबाने सॅनिटायझर वापरताना खूप काळजी घेण्याची गरज आहे.

फ्रांसमध्ये नुकताच यावर एक अहवाल प्रकाशित झालाय. यात 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये सॅनिटायझरमुळे अधिक प्रमाणात मुलं जखमी झाल्याचं समोर आलंय. यातील अनेकांचे डोळे खराब झालेत. त्यामुळेच संशोधकांनी सॅनिटायझर वापरताना काळजी घेण्यास सांगत ते डोळ्यात गेल्यावर अंधत्व येऊ शकतं असा इशारा दिलाय.

फ्रेंच पॉईझन कंट्रोल सेंटरच्या आकडेवारीनुसार, 1 एप्रिला 2020 ते 24 ऑगस्ट 2020 च्या दरम्यान सॅनिटायझरमुळे दुखापत झालेल्यांची संख्या 232 होती. त्याचा विचार करता मागील वर्षी हाच आकडा 33 होता. कोरोनामुळे लोक मोठ्या प्रमाणात सॅनिटायझर वापरत आहेत. यातील 70 टक्के सॅनिटायझर अल्कोहोलयुक्त आहे.

हेही वाचा :

Hand Sanitizer | ‘या’ सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवा ‘हँड सॅनिटायझर’, खर्चातही होईल बचत!

तुम्ही सॅनिटायझरचा जास्त वापर करता, ‘थांबा’ मग हे वाचा अगोदर! 

मेणबत्तीच्या उजेडात सॅनिटाईझ करताना भडका, नाशकात महिलेचा मृत्यू

व्हिडीओ पाहा :

Sanitizer eye contact may cause children blind

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.